सोनल चितळे

Sagittarius Yearly Horoscope 2024 Predictions in Marathi: धनु राशीचा स्वामी गुरू आहे. गुरू म्हणजे मोठा, महान, देणारा, दाता. उदार, उदात्त वृत्तीच्या गुरुची धनु रास देखील दिलदार असते. यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना आपले कौतुक प्रिय असते. त्यांच्या मानसन्मानाच्या कल्पना आणि अपेक्षा भारी असतात. त्यामुळे अनेक कारणांनी त्यांचा अपमान होऊ शकतो. ज्ञानासह त्यांना अध्यात्माचीदेखील आवड असते. इतरांना मदतीचा हात पुढे करण्यात या व्यक्ती कधीही मागे नसतात. दुसऱ्यांवर अधिकार गाजवण्याची त्यांची सुप्त इच्छा अनेकदा उफाळून वर येते. अशा या धनु राशीच्या व्यक्तींना २०२४ हे वर्ष कसे जाईल याचा आढावा घेऊया.

Biggest Graha Gochar In Scorpio In 2024 How Will Vruschik Rashi Earn More Money Health Defeat Enemies Till 31 st December Astrology
वृश्चिक राशीत यंदा सर्वात मोठा ग्रहबदल! ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत धनलाभ, हितशत्रू व आरोग्याची स्थिती कशी असेल, वाचा
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
umber gets the blessings of Goddess Lakshmi
Numerology: ‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांवर असते माता लक्ष्मीची कृपा, कधीही कमी पडत नाही पैसा
Diwali 2024 - Shukra & Shani Create Wealth for 3 Lucky Zodiac Signs
३१ ऑक्टोबरला निर्माण होणार शनि -गुरुचा दिव्य योग, ‘या’ तीन राशींना मिळणार पैसाच पैसा
shukra guru gochar 2024 in dhanu vrushabha astrology
७ नोव्हेंबरनंतर ‘या’ तीन राशींचे नशीब उजळणार, गुरु शुक्राच्या राशी बदलाने मिळणार भरपूर सुख अन् आर्थिक लाभ
shani dev margi 2024 today horoscope
१५ नोव्हेंबरनंतर शनिदेव ‘या’ राशींवर करणार धन अन् सुखाची बरसात; शनी मार्गी होताच मिळेल बक्कळ पैसा अन् यश
Devendra Fadnavis On Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojna : लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली मोठी माहिती
ketu nakshatra parivartan 2024
आजपासून ‘या’ ३ राशींची चांदी; केतूच्या नक्षत्र परिवर्तनाने कमावणार भरपूर पैसा आणि मानसन्मान

यंदा संपूर्ण वर्षभर शनी आपल्या तृतीय स्थानातील कुंभ राशीतून भ्रमण करणार आहे. लहान मोठे प्रवासयोग येतील. नवे करार कराल. एप्रिल अखेरीपर्यंत गुरू पंचमातील मेष राशीतून भ्रमण करेल. तोपर्यंत गुरुबल उत्तम असेल. शैक्षणिक प्रगती, संतानप्राप्ती असे याचे फळ असेल. १ मे रोजी गुरू षष्ठ स्थानातील वृषभेत प्रवेश करेल. गुरुबल थोडे कमजोर झाले तरी अनेक कामात यश देईल. मे अखेरीपर्यंत हर्षल पंचमातील मेष राशीतून भ्रमण करेल. १ जूनला तो षष्ठ स्थानातील वृषभ राशीत प्रवेश करेल. अनपेक्षित गोष्टींना चालना मिळेल. हितशत्रूंना तोडीसतोड उत्तरे द्याल. राहू आणि नेपच्यून चतुर्थ स्थानातील मीन राशीत वर्षभर असतील. मानसिक स्थिती दोलायमान किंवा द्विधा होण्यास हा ग्रहयोग कारणीभूत ठरेल. दशम स्थानातील कन्या राशीतून केतू वर्षभर भ्रमण करेल. अपेक्षेपेक्षा कमी प्रमाणात लाभ मिळतील. द्वितीय स्थानातील मकर राशीतून प्लुटो पूर्ण वर्ष भ्रमण करेल. कुटुंबातील सदस्यांच्या भेटीगाठी व्हाव्यात म्हणून प्रयत्नशील राहाल. अशा या महत्त्वाच्या ग्रह बदलांसह इतर ग्रहांच्या भ्रमणांचा विचार आणि अभ्यास करता २०२४ या वर्षाचे ग्रहफल धनु राशीच्या व्यक्तींना कसे असेल हे पाहूया…

धनु वार्षिक राशिभविष्य (Taurus Yearly Horoscope 2024)

जानेवारी (January Horoscope)

नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच चांगले गुरुबल असल्याने हाती घेतलेली कामे गतीने पूर्ण होतील. मोठ्या कार्याचे नेतृत्व स्वीकाराल. विद्यार्थी वर्गाच्या कष्टाचे त्यांना चांगले फळ मिळेल. आत्मविश्वासाचा अतिरेक होऊ देऊ नका. वेळेचे नियोजन करताना मन द्विधा होईल. कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यायचे हे ठरवताना गोंधळ उडेल. नोकरी व्यवसायातील कामकाजासाठी थोडे वेगळे धोरण अंगिकरावे लागेल. परदेशाशी निगडीत कामे करण्याची संधी उपलब्ध होईल. विवाहोत्सुक मुलामुलींनी जोडीदाराचे शोधकार्य सुरू ठेवावे, लवकरच यश मिळेल. विवाहित दाम्पत्यांचे सहजीवन आनंदात, उत्साहात जाईल. घराबाबतचे निर्णय लांबणीवर पडतील.गुंतवणूकदारांना विशेष खेळी खेळून लाभ कमवता येईल.

फेब्रुवारी (February Horoscope)

अधिकार गाजवताना इतरांच्या भावना दुखावणे योग्य नाही. ती वेळ निघून गेल्यानंतर आपल्यालाही याचा त्रास होत राहील. त्यापेक्षा बोलतानाच विचारपूर्वक विधाने करावीत. विद्यार्थी वर्गाच्या हिताच्या गोष्टी सांगणारे मार्गदर्शक आपल्याला खरोखर भाग्यानेच लाभतील. चुकीच्या संकल्पना पुसून टाकून नव्याने विषयाचे आकलन करता येईल. नोकरी व्यवसायात वरिष्ठ मंडळींचे सहकार्य लाभेल. काही निर्णय घेणे आपल्या हाती नाही, हे मान्य करून पुढे मार्गक्रमण करावे. विवाहोत्सुक मंडळींनी वरवधू संशोधनात विशेष रस घ्यावा. विवाहित दाम्पत्यांसाठी कौटुंबिक वातावरण चांगले असेल. जोडीदार बऱ्याच गोष्टी समजुतीने घेईल. सांधेदुखीचा त्रास वाढेल.

मार्च (March Horoscope) :

आर्थिक वर्ष संपताना कामाचा बोजा वाढेल, त्याचा ताणही वाढेल. नोकरी व्यवसायातील कामामुळे रक्तातील घटक वरखाली होतील. आरोग्याची काळजी घेणे फक्त आपल्याच हाती आहे हे ध्यानात असू द्यावे. विद्यार्थी वर्गालाही अभ्यासाचा, परिक्षेचा तणाव जाणवेल. म्हणून सुरुवातीपासूनच वेळापत्रक आखा आणि त्याचे काटेकोर पालन करा. विवाहोत्सुक मंडळींनी अतिचिकित्सा करू नये. संशोधन चालू ठेवावे. विवाहित दाम्पत्यांनी एकमेकांना लहानमोठ्या कामात मदत करावी. अशाने एकमेकांचा आधार वाटतो, नाते दृढ होते. घराच्या, मालमत्तेच्या बाबतीत कायदेशीर मार्गाने पुढे जावे. सत्याच्या बाजूने राहा. गुंतवणूकदारांनी अभ्यासपूर्वक केलेली गुंतवणूक भरपूर लाभ मिळवून देईल.

एप्रिल (April Horoscope)

आपले काम राहिले तरी चालेल, मित्रमैत्रिणीचे आधी झाले पाहिजे या वृत्तीचा बऱ्याचदा आपल्याला अनुभव येईल. दिलदारी दिसून येईल. परंतु ‘आपल्या चांगुलपणाचा कोणी फायदा तर घेत नाही ना’ याचा आढावा जरूर घ्यावा. समाजात वावरताना व्यावहारिक दृष्टिकोन ठेवावा. विद्यार्थी वर्गाला अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल. मेहनतीला दुसरा पर्याय नाही. विवाहोत्सुक मुलामुलींना मनाजोगते स्थळ ओळखी ओळखीतून समजेल. विवाहित मंडळींच्या नात्यात समज, गैरसमज निर्माण होतील. शांत डोक्याने चर्चा करून ते दूर करावे लागतील. यात आपल्यालाच पुढाकार घ्यावा लागेल. मालमत्तेसंबंधी कामात अनेक अडथळे निर्माण होतील. थोडे धीराने घ्यावे. छातीत, पोटात वायू अडकल्याने हृदयावर जोर येईल.

हेही वाचा : ३० वर्षानंतर शनिदेव वक्री होताच ‘या’ तीन राशींना होणार अचानक धनलाभ? जाणून घ्या, त्या तीन राशी कोणत्या?

मे (May Horoscope)

१ मे रोजी महत्वाचा राशी बदल होणार आहे. गुरू षष्ठ स्थानातील वृषभ राशीत प्रवेश करेल. एकंदरीत गुरुबल थोडे कमजोर होईल. पण अनेक बाबींसाठी खूप साहाय्यकारी असेल. विद्यार्थी वर्गाला गुरुचे पाठबळ थोडे कमी झाल्याने अधिक मेहनत घ्यावी लागेल, पळवाट शोधून उपयोग नाही. नोकरी व्यवसायात हितशत्रूंना पुरेपूर शह द्याल. वरिष्ठ अधिकारी आपल्याला पाठिंबा देतील. विवाहोत्सुक मंडळींना हा गुरुबदल थोडे थांबण्याची सूचना देईल. त्यामुळे धीर धरणेच इष्ट ठरेल. विवाहितांच्या बाबतीत मनात गैरसमज निर्माण झाल्यास तो दूर करणे फार कठीण जाईल. गुंतवणूकदारांच्या पैशाचा योग्य परतावा मिळेल. उष्माघात, घशाला इन्फेक्शन होणे, डोकेदुखी असे त्रास सहन करावे लागतील.

जून (June Horoscope)

१ जूनला मंगळ आणि हर्षल यांचे राशी बदल होतील. मंगळ पंचम स्थानातील मेष राशीत प्रवेश करेल. हर्षल षष्ठ स्थानातील वृषभ राशीत प्रवेश करेल. आपल्या म्हणण्याला, मुद्द्याला आणखी जोर येईल. इतरांवर छाप पाडाल. विद्यार्थी वर्गाने शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच शिस्त अंगी बाणवावी. आवडीच्या अभ्यासक्रमात विशेष प्रगती कराल. शैक्षणिक संस्थांचे पाठबळ मिळेल. नोकरी व्यवसायातील आपले निर्णय जास्तीत जास्त लाभदायक ठरतील. वरिष्ठांकडून याची चांगली पोचपावती मिळेल. विवाहित दाम्पत्यांच्या सहजीवनाचे सूर जुळतील. एकमेकांच्या सगळ्या गोष्टी पटल्या नाहीत तरी जुळवून घेणे महत्त्वाचे असते. उत्सर्जन संस्थेवर अतिरिक्त ताण येईल. वैद्यकीय सल्ला घ्यावा.

जुलै (July Horoscope)

काही गोष्टी मागूनही मिळत नाहीत. पण या महिन्यात आपणास बऱ्याच गोष्टी न मागताच मिळणार आहेत. अशा या महत्वपूर्ण गोष्टींचा नक्कीच मान राखावा. विद्यार्थी वर्ग मन लावून अभ्यास करेल. त्यांच्या कष्टाचे चीज होईल. मनाजोगता अभ्यासक्रम/ कोर्स शिकता येईल. नोकरी व्यवसायातील खाचाखोचा, बारकावे, नियम आत्मसात कराल. याचा भविष्यात खूप लाभ होईल. विवाहित मंडळींना कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि नातीगोती उत्तम प्रकारे सांभाळता आणि जोपासता येतील. माणसांची खरी पारख करू शकाल. घर, जमीन, मालमत्ता यांच्या संबंधात अजूनही स्पष्टपणा येणार नाही. गुंतवणूकदारांनी जमिनीत पैसे गुंतवणे मोठी जोखीम ठरेल. बदलत्या हवामानाचा तब्येतीवर परिणाम होईल.

ऑगस्ट (August Horoscope)

स्वतः सावराल आणि दुसऱ्यालाही आधार द्याल. आपले नुसते ‘असणे’ देखील त्याला पुरेसे ठरेल. नोकरी व्यवसायात आपले कर्तृत्व सिद्ध करायला मिळेल. बुद्धिमत्ता आणि अनुभव यांच्या जोरावर अतिमहत्त्वाच्या मीटिंग मध्ये सगळे मुद्दे आत्मविश्वासपूर्वक मांडाल. विवाहित व्यक्तींनी जोडीदाराला फक्त गृहीत धरू नका. त्याचे मत, त्याच्या भावना यांचाही विचार करायला हवा. विद्यार्थी वर्गाच्या हिमतीला मेहनतीची जोड मिळाल्यास यशाचे शिखर लवकरच सर कराल. आत्मविश्वास बळावेल. कौटुंबिक समस्या व्यावहारिक पातळीवर सुटणार नाहीत. त्याकडे भावनिक दृष्टीनेच बघावे लागेल. नात्यातील गुंता हळुवार हाताळावा. शरीरांतर्गत उष्णतेमुळे पचनशक्तीवर परिणाम होईल.

हेही वाचा : Ayodhya Ram Mandir : मुस्लिम महिला अयोध्येतून काशीला घेऊन येतील रामज्योती, सजेल लख्ख दिव्यांची आरास

सप्टेंबर (September Horoscope)

लहान मोठे प्रवास लाभदायक ठरतील. कामानिमित्त वा वैयक्तिक स्वरूपाच्या प्रवासाचा शीण जाणवणार नाही. मनातील उत्साह आणि उमेद वाढेल. नोकरी व्यवसायातील जबाबदारी चोखपणे पार पाडाल. अडचणींवर लीलया मात कराल. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची सुवर्णसंधी मिळणार आहे. मेहनत आणि सातत्य राखून आपली स्वप्ने पूर्ण कराल. जोडीदाराच्या कामातील तणावाची छाया कौटुंबिक जीवनावर पडेल. अशा वेळी त्याला मानसिक आधार देणे गरजेचे आहे. यातूनच आपल्यातील प्रेम, नातेसंबंध दृढ होतील. गुंतवणूकदारांनी दीर्घकालीन योजनांमध्ये पैसे गुंतवावेत. अशाश्वत योजना फोल ठरतील. कामाच्या आणि कौटुंबिक धामधुमीत आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

ऑक्टोबर (October Horoscope)

ऋतुमानानुसार होणाऱ्या बदलांना सामोरे जाण्याची तयारी ठेवावी. अन्यथा अनपेक्षित आजार बळावतील. विशेष करून ताप, कणकण, पित्त आणि सर्दी-खोकला यापासून त्रास संभावेल. नोकरी व्यवसायात स्वतःला कामात झोकून द्याल. पण मन, डोकं आणि शरीर यांना विश्रांतीची गरज आहे..याची जाणीव ठेवावी. विद्यार्थी वर्गाला परीक्षेच्या दृष्टीने सज्ज राहायला हवे. वेळेचे नियोजन, मेहनातीतील शिस्त आणि सातत्य यांचा खूपच फायदा होईल. परदेशासंबंधीत कामे मार्गी लागतील. जोडीदारासह लहानमोठ्या कारणांवरून वाद होतील. शब्दाने शब्द वाढवून त्याला भांडणाचे स्वरूप देऊ नका. घर, प्रॉपर्टीच्या बाबत चर्चा करताना डोक्यात राग घालून बोलणे टाळावे.

नोव्हेंबर (November Horoscope)

ध्यानीमनी नसताना आप्तेष्ट, मित्र मैत्रिणी यांच्या गाठीभेटी ठरतील. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. त्यातील चांगल्या आठवणीच साठवा. त्रासदायक आठवणी प्रयत्नपूर्वक पुसून टाका. मन मोकळं आणि स्वच्छ कराल तरच हलके वाटेल. नोकरी व्यवसायाच्या धकाधकीत जवळच्या नात्यांकडे दुर्लक्ष होईल. प्रवास, शुभकार्य, समारंभ यानिमित्ताने ही नाती नव्याने सांधता येतील. जोडीदाराला त्याच्या कार्यक्षेत्रात उत्तम यश मिळेल. गुंतवणुकीतून खूप लाभ होईल. खर्चाच्या वाटा खुल्या होतील. अनावश्यक आणि अतिरिक्त खर्च प्रयत्नपूर्वक टाळावा. तळपायाची जळजळ होणे, पाय दुखणे, सांधेदुखी या त्रासांना सामोरे जावे लागेल.

डिसेंबर (December Horoscope)

वर्षाच्या या शेवटच्या महिन्यात आपण वर्षभराचा आढावा घ्याल. आर्थिक, भावनिक, व्यावहारिक चढ उतरांचा आलेख तपासून बघाल. विद्यार्थी वर्गाला पंचमातील हर्षलच्या वक्र गतीला सामोरे जावे लागेल. अडथळे आणि प्रलोभने दूर सारत आगेकूच करणे सोपे नाही, हिंमत हरू नका. नोकरी व्यवसायात आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवाल. परदेशातील कामांना गती मिळेल. जोडीदाराला आर्थिक साहाय्याची गरज भासेल. एकमेकांना सांभाळून घेतलेत तर प्रपंचाचा रथ सुरळीत चालेल. घराच्या, मालमत्तेच्या कामासाठी योग्य व्यक्तींकडून मार्गदर्शन मिळेल. गुंतवणूकदारांनी थोडा धीर धरावा.

अशा प्रकारे २०२४ या वर्षातील ग्रहस्थितीनुसार धनु राशींच्या व्यक्तींनी या ज्योतिषीय मार्गदर्शनाचा लाभ करून घ्यावा. गुरुबल चांगले असल्याने कामे पूर्ण होतील. एप्रिलपर्यंत गुरुबल अधिक चांगले आहे. तोपर्यंत विवाह योग जुळून येण्याची शक्यता आहे. विवाहितांना संतानप्राप्तीचे योगही आहेत. परदेश विषयक कामांना गती मिळेल. प्रगतिकाराक बऱ्याच संधी उपलब्ध होतील. कामाच्या व्यापात तब्येतीची हेळसांड करू नये, हा मोलाचा सल्ला स्वीकारलात आणि अमलात आणलात तर २०२४ हे वर्ष अतिशय सुखाचे आणि भरभराटीचे जाईल.

Story img Loader