सोनल चितळे

Yearly Sagittarius Astrology Prediction In 2025 : धनु ही गुरुची रास आहे. प्रामाणिक, आनंदी, आशावादी, मर्यादाशील हे गुरुचे गुणधर्म धनु राशीच्या व्यक्तींमध्ये दिसतात. त्यांच्यातील उत्साह वाखाणण्याजोगा असतो. आपण कर्तव्यदक्ष आणि अधिकारप्रिय आहात. काही वेळा इतरांवर अधिकार गाजवताना त्यांच्या भावनांची कदर केली जात नाही. पण, धनु राशी दिलदार आणि उदार आहेत. शंका विचारणे, ज्ञानाची लालसा असणे हे आपल्यातील मूलभूत गुणधर्म आहेत. सर्वांना घेऊन पुढे जाणाऱ्या आणि अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या धनु राशीला २०२५ हे वर्ष कसे असेल ते पाहूया(Sagittarius Yearly Horoscope 2025)…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

धनु राशीच्या दृष्टीने या वर्षातील महत्त्वाच्या ग्रहांचे राशीबदल असे आहेत… १८ मार्चला हर्षल पंचमातून षष्ठातील वृषभ राशीत प्रवेश करेल. २९ मार्चला शनी कुंभ राशीतून चतुर्थातील मीन राशीत प्रवेश करेल. हा खडतर योग आहे. १४ मे रोजी गुरु सप्तमातील मिथुन राशीत प्रवेश करेल. गुरुबल अधिक चांगले होईल. २९ मे रोजी वक्र गतीने राहू चतुर्थातून तृतीय स्थानातील कुंभ राशीत प्रवेश करणार आहे, तर केतू दशमातून नवमातील सिंह राशीत प्रवेश करेल. हा बदल आपणास हितकारक ठरेल.

जानेवारी (January Horoscope 2025)

नव्या वर्षाची सुरुवात नव्या उत्साहात कराल. नव्या संकल्पांसह नवी धोरणे अमलात आणाल. मित्रमंडळींचे उत्तम सहकार्य मिळेल. विद्यार्थी वर्ग एकाग्रतेने अभ्यास करेल. मध्यम गुरुबल असल्याने मेहनतीचे चांगले फळ मिळेल. नोकरी व्यवसायात अपेक्षित बदल होणे कठीण आहे. मकर संक्रांतीला अस्वस्थता वाढेल. परिस्थिती स्वीकारून पुढे जात राहावे. आर्थिक नियोजन उत्तम कराल. गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळेल. विवाहोत्सुकांचे वधूवर संशोधन सुरू ठेवावे. विवाहितांचे वाद मिटतील. विचारांती योग्य निर्णय घ्याल. घर, जमीन, शेती याबाबत संबंधितांसह चर्चा कराल. व्यवहार पुढे सरकतील. परदेशातून शुभवार्ता येतील. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहील. व्यायामाचे महत्त्व पटेल. स्वतःसाठी वेळ राखून ठेवाल.

फेब्रुवारी (February Horoscope 2025)

आत्मविश्वास वाढवणारा, सन्मान मिळवून देणारा असा हा महिना असेल. आप्तजनांकडून शुभवार्ता मिळतील. विद्यार्थी वर्गाची मेहनत कौतुकास्पद असेल. अभ्यास, परीक्षेचा सराव आणि वेळेचे गणित उत्तम प्रकारे जमेल. नोकरी व्यवसायात सहकारी वर्गाची सढळ हाताने मदत कराल. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाचा लाभ होईल. विवाहोत्सुकांचे विवाह योग चांगले आहेत. मनपसंत जोडीदाराची निवड कराल. विवाहित दाम्पत्यांनी सामंजस्याने निर्णय घ्यावा. नातेसंबंध दृढ होतील. प्रॉपर्टीच्या संबंधात नवे प्रश्न, अडचणी निर्माण होतील. तज्ज्ञांची मदत घ्यावी लागेल. गुंतवणूकदारांना अपेक्षित संधी मिळेल. महाशिवरात्रीच्या आसपास आर्थिक लाभ संभवतो. मधुमेह आणि रक्तदाब याबाबत विशेष जागरूक राहावे. खाण्यावर ताबा ठेवावा लागेल.

हेही वाचा…Leo 2025 Rashi Bhavishya : २०२५ मध्ये सिंह राशींना ‘हे’ महिने अत्यंत फायद्याचे; शिक्षण, नोकरी ते विवाह, कसे असेल वर्ष? जाणून घ्या १२ महिन्यांचे राशीभविष्य

मार्च (March Horoscope 2025)

नियोजन केलेल्या गोष्टी अमलात आणण्याचा हा महिना असेल. विद्यार्थी अभ्यासातील सातत्य आणि प्रामाणिकपणामुळे यशाची शिखरे गाठतील. रंगपंचमीला आनंदाची बातमी समजेल. १८ मार्चला हर्षल षष्ठ स्थानातील वृषभ राशीत प्रवेश करेल. नोकरी व्यवसायात आपल्या कामाची चांगली छाप पडेल. सहकारी वर्गाच्या सहकार्याने मोठे प्रकल्प हाती घ्याल आणि यशस्वी करून दाखवाल. विवाहोत्सुकांचे विवाह ठरतील. विवाहितांनी वादाचे लहानमोठे मुद्दे चर्चेने सोडवावेत. आपला अहंकार कुरवाळू नका. गुंतवणूकदारांनी निरीक्षण, परीक्षण करावे. घाई नको. २९ मार्चला शनी चतुर्थातील मीन राशीत प्रवेश करेल. काही कामे विलंबाने पूर्ण होतील. गुढीपाडव्याला रखडलेले काम पूर्ण झाल्याचे आणि कष्टाचे चीज झाल्याचे समाधान मिळेल.

एप्रिल (April Horoscope 2025)

अनेक व्यवधाने सांभाळून पुढे जायला लावणारा असा हा महिना असेल. विद्यार्थी वर्ग अभ्यासावर भर देईल. शाळा, कॉलेजच्या परीक्षांव्यतिरिक्त इतर कला, तंत्रज्ञानाच्या परीक्षा द्याल. नोकरी व्यवसायात सहकारी वर्गाचे विचार पटले नाहीत तरी चर्चा करून प्रश्न मिटवता येतील. हितशत्रूंचे डाव हाणून पाडाल. विवाहोत्सुकांनी वधूवर संशोधन सुरू ठेवावे. मनाजोगता जोडीदार मिळायला वेळ लागेल. विवाहितांना एकमेकांच्या साथीने प्रगती करणे शक्य होईल. घर, प्रॉपर्टीचे काम सध्यातरी ठप्प होईल. सरकारी कामे लांबणीवर जातील. अक्षय्य तृतीयेच्या सुमारास गुंतवणूकदारांची तिजोरी तुडुंब भरेल. अभ्यासपूर्वक गुंतवणूक केल्याचे समाधान लाभेल. उन्हाळी सर्दी व त्वचा विकारांवर औषधोपचार घ्यावा. घर, प्रॉपर्टीचे कागदपत्र व्यवहारापूर्वीच तज्ज्ञांकडून तपासून घ्यावेत. गुंतवणूक करताना सर्वसमावेशक विचार केल्याने नफा झाला नाही तरी तोटासुद्धा अगदी कमीतकमी सहन करावा लागेल. शिरा, नसा ताठर झाल्यास त्रास वाढेल.

मे (May Horoscope 2025)

मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी मेहनत घेण्याची तयारी ठेवाल, यामुळेच आपल्याला प्रगतीपथावर पुढे जाता येईल. विद्यार्थी वर्ग परदेशातील शिक्षणासाठी विशेष प्रयत्न करतील. उच्च शिक्षणातील संधीचे सोने कराल. बुद्ध पौर्णिमेचे चांदणे लाभदायक ठरेल. १४ मे रोजी गुरू सप्तमातील मिथुन राशीत प्रवेश करेल. अतिशय चांगले गुरुबल आपणास प्राप्त होईल. विवाहोत्सुकांचे विवाहयोग बलवान होतील. मनाजोगता जोडीदार मिळण्यास ग्रहांची साथ लाभेल. विवाहितांचे प्रश्न सुटतील. घराचे काम धीम्या गतीने मार्गी लागेल. गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणूक केल्याने त्याचा उत्तम परतावा त्यांना मिळेल. २९ मे रोजी वक्र गतीने राहू तृतीय स्थानातील कुंभ राशीत प्रवेश करेल व केतू भाग्य स्थानातील सिंह राशीत प्रवेश करेल.

जून (June Horoscope 2025)

मागील महिन्यातील गुरु व राहू, केतूचा राशी बदल या महिन्यात चांगले फळ देईल. कष्टाचे चीज झाल्यावर होणारा आनंद अवर्णनीय असेल. विद्यार्थी वर्ग आपल्यातील गुण विकसित करतील. अभ्यासासह इतर पूरक गोष्टींमध्ये सहभागी होतील. विवाहोत्सुकांचे विवाह जमण्यास वटपौर्णिमा साहाय्यकारी ठरेल. विवाहित मंडळींना कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडणे गरजेचे ठरेल. नोकरी व्यवसायात येणारे अडथळे आणि नव्या समस्या शांत डोक्याने, विचारपूर्वक पार कराल. जमीनजुमला, घर, प्रॉपर्टीचे कागदपत्र व्यवहारापूर्वीच तज्ज्ञांकडून तपासून घ्यावेत. गुंतवणूक करताना सर्वसमावेशक विचार केल्याने नफा झाला नाही तरी तोटासुद्धा अगदी कमीतकमी सहन करावा लागेल. शिरा, नसा ताठर झाल्यास त्रास वाढेल.

हेही वाचा…Virgo 2025 Horoscope : २०२५ मध्ये विद्यार्थी, नोकरदारांचे उजळणार नशीब; कन्या राशीसाठी कोणता महिना आर्थिकदृष्ट्या फायदेशीर? जाणून घ्या १२ महिन्यांचे भविष्य…

जुलै (July Horoscope 2025)

कर्तव्य पार पाडणे आपल्या हाती आहे. त्याचे फळ कसे व काय मिळेल याची चिंता करू नये. विद्यार्थी वर्ग जोमाने अभ्यासाला लागेल. शिक्षकांचा उत्तम पाठिंबा मिळेल. आषाढी एकादशीच्या सुमारास आपल्या आवडीच्या क्षेत्रात प्रवेश मिळाल्याचा आनंद काही औरच असेल. नोकरी व्यवसायात आपले अंदाज खरे ठरतील. काळाची पावले ओळखून पुढील पायरी ओलांडाल. गुरुपौर्णिमा नवी संधी घेऊन येईल. गुरुबल चांगले असल्याने विवाहोत्सुकांचे विवाह ठरतील. विवाहित दाम्पत्यांना कर्तव्यपूर्तीचा आनंद मिळेल. घराचे कामकाज तज्ञांकडून तपासून घ्यावे. खाचाखोचा समजून घ्याव्यात. गुंतवणूकदारांनी संयम ठेवावा. श्वसनास त्रास होईल. छातीत कफ दाटेल. वैद्यकीय उपचार घ्यावेत.

ऑगस्ट (August Horoscope 2025)

सण समारंभ, स्नेहसंमेलन यांमध्ये उत्साहाने सहभागी व्हाल. विद्यार्थी वर्ग अभ्यासाबरोबरच कला व क्रीडा या क्षेत्रातही आपले गुण दाखवेल. नारळी पौर्णिमेला आनंद वार्तांची भरती येईल. नोकरी व्यवसायात प्रगती कराल. आर्थिक उन्नती होईल. गुंतवणूकदारांसाठी जन्माष्टमी लाभकारक ठरेल. विवाहोत्सुक मंडळींना मनपसंत जोडीदार मिळेल. विवाहित दाम्पत्य कौटुंबिक सुखाचा आनंद घेतील. गुंतवणूकदारांनी दीर्घकालीन मुदतीसाठी गुंतवणूक करावी. जमीन, इस्टेट या बाबत वितंडवाद आणि पैसे खर्च करण्यापेक्षा तज्ज्ञ वकिलांच्या मार्गदर्शनाखाली प्रकरण निकालात काढावे. रक्तातील साखर नियंत्रणात ठेवाल. मांड्या, पोटऱ्या भरून येतील. व्यायामाने स्नायू बळकट करावेत.

सप्टेंबर (September Horoscope 2025)

एकाच वेळी बऱ्याच जबाबदाऱ्या पूर्ण करताना तारांबळ उडेल. अशा वेळी कामांची वर्गवारी कराल आणि गुंता सुटेल. विद्यार्थी वर्ग अभ्यासात मग्न असेल. नोकरी व्यवसायात मनाप्रमाणे भरारी घ्याल. पितृपक्षात पूर्वजांच्या स्मरणार्थ दानधर्म, सेवा कराल. मानसिक समाधान मिळणे महत्त्वाचे. विवाहोत्सुकांचे संशोधन फलदायी ठरेल. विवाहित दाम्पत्यांचे सूर जुळतील. नवरात्रात घराच्या व्यवहाराला चालना मिळेल. मध्यस्थी व्यक्तीवर अंधविश्वास ठेवू नका. प्रत्यक्षात शहानिशा करणे गरजेचे ठरेल. गुंतवणूकदारांचा आलेख उंचावेल. लाभाचे आकडे वाढतील. अति अपेक्षा ठेऊ नका. ऋतुमानानुसार आहारात बदल केल्यामुळे एकंदरीत प्रकृती सुधारेल. सर्दी, ताप व डोकेदुखी होऊ शकते.

ऑक्टोबर (October Horoscope 2025) :

दसरा उत्साहात साजरा होईल, पण काही कटू अनुभव पचवण्याची तयारी ठेवावी लागेल. विद्यार्थी कसून अभ्यास करतील. पळवाटा शोधण्यात अर्थ नाही. १८ ऑक्टोबरला गुरु अष्टमातील कर्क राशीत प्रवेश करेल. गुरुबल कमजोर होईल. नोकरी व्यवसायात कामकाजाच्या पद्धतीत झालेले बदल आपल्या पचनी पडणार नाही. जुळवून घ्यायला वेळ लागेल. चिडचिड वाढेल. विवाहित दाम्पत्यांनी शब्दांवर ताबा ठेवावा, तरच गैरसमज टळतील. दिवाळीच्या दरम्यान घर, जमीन याबाबत पुन्हा चर्चा सुरू होईल, पण गाडी पुढे जाणार नाही. गुंतवणूकदारांना मोठी जोखीम खाली खेचेल. सुरक्षित गुंतवणूक करावी. समाजकार्यात मन रमेल. कौटुंबिक प्रश्न अलगद सोडवावेत. हुकूमशाही कामी येणार नाही. कामाचा ताण आणि अतिश्रमाने खूप दमणूक होईल.

हेही वाचा…Number 9 Numerology Predictions: ‘या’ जन्मतारखांवर वर्षभर राहील मंगळाचा प्रभाव! उद्योगधंद्यांत यश, तर ‘या’ गोष्टी टाळणे योग्य; वाचा, उल्हास गुप्तेंची भविष्यवाणी…

नोव्हेंबर (November Horoscope 2025)

लहान मोठे प्रवास योग देणारा आणि गैरसमज दूर करणारा असा हा महिना असेल. मनावरचे ओझे कमी होईल. विद्यार्थी वर्गाला आपल्या जबाबदारीची जाणीव होईल. अनेक प्रलोभनांमुळे अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे कठीण जाईल, तरीही प्रयत्न सोडू नका. ११ नोव्हेंबरपासून गुरु वक्री होत आहे. नोकरी व्यवसायात त्रस्त होऊन नोकरी बदलाचा विचार कराल, परंतु सध्या हे योग नाहीत. हिमतीने टिकून राहणे आणि स्वतःला सिद्ध करणे इतके आपल्या हाती आहे. देव दिवाळी ते चंपाषष्ठी या शुभकाळात मनोबल वाढेल. विवाहित मंडळींनी एकमेकांचे विचार व भावना समजून घ्याव्यात. कौटुंबिक प्रश्नांना अधिक प्राधान्य द्याल. प्रॉपर्टीच्या संबंधी तज्ज्ञांकडून सल्ला घ्याल. वाहन खरेदी लांबणीवर पडेल. सांधेदुखी आणि पेटके येणे यांमुळे त्रस्त व्हाल. योग्य औषधोपचार घ्यावा.

डिसेंबर (December Horoscope 2025)

४ डिसेंबरची श्री दत्त जयंती मनाला उभारी देईल. गुरु वक्र गतीने पुन्हा मिथुन राशीत प्रवेश करत आहे. गुरुबल चांगले मिळेल. विद्यार्थी वर्गाच्या मेहनातीचे योग्य फळ मिळेल. अजून किती परिश्रम घ्यायचे आहेत याची स्पष्ट कल्पना येईल. नोकरी व्यवसायात जम बसेल. सहकारी वर्गासह सूत जुळल्याने कामाला वेग येईल. परदेशासंबंधित कामे मार्गी लागतील. विवाहोत्सुकांचे विवाह ठरतील. शुभकार्य संपन्न होतील. विवाहित दाम्पत्यांमधील संबंध सुधारतील. कौटुंबिक खर्च वाढतील. आर्थिक गणिते नव्याने मांडाल. घर, जमीन, शेत यांच्या विषयात कोर्ट कचेरीचे हेलपाटे पडतील. गुंतवणूकदार स्वतः अभ्यास करून माफक जोखीम पत्करतील. याचा उत्तम परतावा मिळेल. डोळ्यांवर अतिरिक्त ताण येईल. डोकेदुखी आणि पित्ताचा त्रास नियंत्रणात ठेवाल.

अशा प्रकारे २०२५ या वर्षात गुरुबल चांगले आहे. मार्चमधील शनी बदल काहीसा आव्हानात्मक असेल. प्रयत्नांनी अडचणी पार करून पुढे जात राहाल. संमिश्र अनुभवांनी युक्त असे हे वर्ष आपणास प्रगतीकारक मार्गाने निश्चितच पुढे घेऊन जाणारे असेल.