Samsaptak Yog 2023 Effects on Zodiac: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्यदेव हा ग्रहांचा राजा मानला जातो तर शनिदेव हे न्यायाधिकारी मानले जातात. दोघांचे नाते सुद्धा पिता- पुत्राचे असल्याचे मानले जाते. ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार सूर्य गोचर करून आपल्या सिंह राशीत तर शनिदेव य या वर्षाच्या सुरुवातीलाच कुंभ राशीत स्थिर झाले आहेत. १५ ऑगस्टला शनी जागृत झाल्यामुळे आता सूर्य व शनी दोघे एकमेकांच्या राशीत ७ व्या स्थानावर आमने सामने आले आहेत. या ग्रहस्थितीमुळे सूर्य व शनीने समसप्तक राजयोग साकारला आहे. सूर्य व शनी यांच्यातील नाते हे फारसे मैत्रीपूर्ण नसल्याने या काळात काही राशींना नुकसान पोहोचू शकतो पण तीन अशा राशी आहेत, ज्यांना या काळात बंपर लाभ मिळू शकतो. या नशीबवान राशी कोणत्या हे जाणून घेऊया…

समसप्तक योग बनल्याने ‘या’ राशींना मिळणार बक्कळ धनलाभ (Samsaptak Yog 2023 Effects)

सिंह रास (Leo Zodiac Horoscope)

समसप्तक योग (Samsaptak Yog 2023 Effects) बनल्याने सिंह राशीला सूर्यामुळे तेज व शनीमुळे प्रगतीचा वेग लाभणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला एखादी नवीन सुरुवात करता येईल जेणेकरून रोजच्या रुटीनचा कंटाळा दूर व्हायला मदत होईल. प्रलंबित काम पूर्ण होईल. पगारवाढीचे योग आहेत.

कर्क रास (Cancer Zodiac Horoscope)

कर्क राशीला वाडवडिलांच्या धनसंपत्तीचा लाभ होऊ शकतो. आपल्याला नवीन व्यवसायाची सुरुवात किंवा गुंतवणूक करण्याची संधी मिळू शकते. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकते. एखाद्या जुन्या मित्राची किंवा मैत्रिणीची भेट येऊ शकते. जुन्या आठवणींना उजाळा दिल्याने तुमचा मूड उत्तम राहू शकतो.

हे ही वाचा<< शनीदेव कुंभ राशीत जागृत! सोनपावलांनी ‘या’ ४ राशींवर पाडतील पैशांचा पाऊस, तुम्ही आहात का नशीबवान?

मेष रास (Aries Zodiac Horoscope)

मेष राशीला समसप्तक राजयोग बनल्याने नशिबाची लॉटरी लागू शकते. तुमच्या आई-वडिलांसह वेळ घालवण्यासाठी एखादी संधी मिळू शकते, या संधीचे सोने करा. गुंतवणुकीवर भर द्या. वैवाहिक आयुष्यात ऊर्जा टिकवून राहण्यासाठी विशेष मेहनत घ्यावी लागू शकते पण या मेहनतीचे गोड फळ सुद्धा तुम्हाला मिळू शकते. संतती सुख नशिबात लिहिले आहे.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader