वैदिक ज्योतिषशास्त्राप्रमाणे, एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये स्थित ग्रहांचे विश्लेषण केले जाते आणि त्यांच्या स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वाबद्दल सांगितले जाते. त्याचप्रमाणे सामुद्रिकशास्त्रात मानवी शरीरावर उपस्थित असलेल्या अवयवांची रचना आणि त्यावरील तीळाचे अर्थ सांगितले आहेत. सामुद्रिक शास्त्रात प्रत्येक तीळाचे स्वतःचे महत्त्व आणि फळ आहे. तीळ कुठे आहे यावर ते अवलंबून असते. आज आपण कानावरील तीळ बद्दल बोलणार आहोत. सामुद्रिक शास्त्रात कानावरील तीळ अतिशय खास असल्याचे सांगितले जाते. जाणून घेऊया खास गोष्टी…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सामुद्रिक शास्त्र: शरीरावर १२पेक्षा जास्त तीळ मानले जातात अशुभ, जाणून घ्या कोणते तीळ देतात श्रीमंत होण्याचे संकेत

उजव्या कानावर तीळ –

सामुद्रिकशास्त्रानुसार उजव्या कानावर तीळ असणे हे भाग्यवान असल्याचे लक्षण आहे. हा तीळ व्यक्तीमध्ये समज, सहिष्णुता आणि भावनिकता वाढवतो. असे लोक खूप चिडतात, असं म्हटलं जातं. ते कधीकधी रागाच्या भरात स्वतःचे नुकसान देखील करतात आणि नंतर पश्चात्ताप करतात. त्यांना प्रत्येक गोष्टीची घाई असते. कोणत्याही गोष्टीसाठी ते वाट बघूच शकत नाही.

सामुद्रिक शास्त्र: नाकाचा आकार सांगतो व्यक्तीचा स्वभाव; जाणून घ्या नाक लांब असलेल्या लोकांबद्दल

डाव्या कानावर तीळचा अर्थ –

सामुद्रिकशास्त्रात डाव्या कानावर तीळ असणाऱ्यांना हुशार मानले जाते. असे म्हणतात की अशा लोकांमध्ये आत्मसन्मानाची भावना जास्त असते. कोणाकडून काहीही, भेटवस्तू, पैसे वगैरे घेणे त्यांना आवडत नाही. ते इतरांना काहीतरी देण्याचा प्रयत्न करतात पण कुणाकडून काही घेत नाहीत. असे लोक खूप आनंदी असतात. ते मुक्तपणे जीवनाचा आनंद घेतात. त्यांना कंजूषपणा आवडत नाही. त्यांना प्रवासाची आवड असते.

सामुद्रिक शास्त्र: पायाच्या ‘या’ बोटावर तीळ असणारी व्यक्ती असते भाग्यवान; वाचा सविस्तर

ऐशोआरामात जगायला आवडतं –

असे म्हणतात की ज्या लोकांच्या कानाच्या खालच्या भागावर तीळ असतो, ते लोक खूप खर्च करतात. त्यांना खरेदीची खूप आवड असतात. ते रोजचा आनंद रोज घेण्याचा प्रयत्न करतात. या लोकांना ऐशोआरामात जीवन जगणे आवडते. त्यांचे छंद हाय-फाय असतात आणि ते त्यांचे छंद पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत करतात.

सामुद्रिक शास्त्र: तळहातावर तीळ असणारे लोक असतात कलाप्रेमी; जाणून घ्या त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल

संवेदनशील असतात –

कानाच्या वरच्या भागावर तीळ असल्यास व्यक्तीमध्ये कलात्मकता वाढते. असे लोक खूप संवेदनशील असतात असे म्हणतात. ते कोणाला घाबरत नाहीत. हे लोक निडर आणि धैर्यवान असतात. व्यवसायातही ते खूप धोका पत्करतात.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samudra shastra oceanography know the meaning of mole on ear hrc