आपल्या शरीरावर अनेक ठिकाणी तीळ असतात. सामुद्रिक शास्त्रामध्ये प्रत्येक तीळाचे स्वतःचे महत्त्व आहे. तसेच प्रत्येक तीळानुसार त्या अर्थ बदलत असतो. आज आपण पायांवर असलेल्या तीळांबद्दल बोलणार आहोत. पायावर वेगवेगळ्या बोटांवर तीळ असण्याचा अर्थही वेगळा आहे. तुम्ही याचे अर्थ सामुद्रिकशास्त्राच्या मदतीने समजून घेऊ शकता.

पायाच्या करंगळीवर तीळ –

nitin raut Devendra fadnavis
गुंडांना खुद्द मुख्यमंत्र्यांचे संरक्षण, डॉ. नितीन राऊत म्हणाले…
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
importance of stability in life
सांधा बदलताना : मैत्र जीवांचे…
treatment personality disorders
स्वभाव-विभाव : विकारांतून मुक्ती
Sanjeev Abhyankar, Sanjeevan Samadhi Sohala, Mahasadhu Shree Moraya Gosavi Maharaj Sanjivan Samadhi Mandir, pimpari,
पं. संजीव अभ्यंकर यांच्या ‘स्वररंजन भक्तिरसात’ रसिकश्रोते तल्लीन
fraud with hundreds of employees by promising permanent jobs in health department
कायमस्वरूपी पदासाठी लाखो रुपये उकळले; आरोग्य कर्मचाऱ्यांची फसवणूक
Allu Arjun arrest, Pushpa 2 , Telangana Theater women Death ,
अशा दुर्घटनांना सेलिब्रिटींना जबाबदार धरायचे की नाही?
BJP akola washim district ministership cabinet expansion
समीकरण जुळवण्याच्या प्रयत्नात अकोला मंत्रिपदापासून ‘वंचित’, अपवाद वगळता मंत्रिपदाची संधी नाहीच; गृहीत धरण्याची भाजपची परंपरा

पायाच्या करंगळीवर तीळ असणारी व्यक्ती अतिशय खेळकर स्वभावाची असते. असे मानले जाते की हे लोक एकाच ठिकाणी टिकून राहू शकत नाहीत. हे लोक खूप महत्त्वाकांक्षी असतात. त्यांना महागड्या वस्तू घेण्याचा शौक असतो. ते आपले छंद पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत करतात.

अनामिकेवर असलेल्या तीळाचा अर्थ –

पायाच्या सर्वात लहान बोटाच्या जवळच्या बोटाला अनामिका म्हणतात. असे म्हणतात की ज्या व्यक्तीच्या अनामिकेवर तीळ असतो ती व्यक्ती खूप भाग्यवान असते. तसेच, या लोकांना कामाची खूप घाई असतात. या लोकांमध्ये संयमाचा अभाव आहे. त्यांच्याकडे एक खास गोष्ट आहे की ते समोरच्या व्यक्तीला खूप लवकर प्रभावित करू शकतात.

पायाच्या मध्यल्या बोटावर तीळ –

पायाच्या मधल्या बोटावर तीळ असलेला माणूस अनेक भाषांचा जाणकार होतो. अशा लोकांना लोकप्रिय होण्याची तीव्र इच्छा असते. हे लोक महान नेते होऊ शकतात. हे लोक आपल्या प्रभावी भाषणाने समोरच्याला पटकन आकर्षित करतात. मुक्तपणे जीवन जगण्यावर त्यांचा विश्वास असतो.

तर्जनीवरील तीळाचा अर्थ –

अंगठ्याच्या जवळच्या बोटाला तर्जनी म्हणतात. या बोटावर तीळ असणारी व्यक्ती खूप भाग्यवान असते. अशा व्यक्तीला जीवनात कशाचीही कमतरता नसते. हे लोक बिंदास असतात. त्यांचा फिरण्यावर विश्वास आहे. तसेच, त्यांना कंजूषपणा अजिबात आवडत नाही. हे लोक बिनधास्तपणे पैसे खर्च करण्यावर विश्वास ठेवतात.

अंगठ्यावरील तीळाचा अर्थ:

अंगठ्यावर तीळ असणाऱ्या व्यक्तीला प्रवासाची खूप आवड असते. अशा व्यक्तीला संधी मिळताच जगापासून दूर राहून स्वतःसोबत वेळ घालवायचा असतो. त्यांना शांतता आवडते. हे लोक मारामारी आणि भांडणापासून दूर राहतात. हे लोक प्रत्येक परिस्थितीत आनंदी असतात.

Story img Loader