सामुद्रिक शास्त्रानुसार शरीरावरील प्रत्येक तीळाचे वेगळे महत्त्व आणि अर्थ आहे. असे म्हटले जाते की शरीराच्या वेगवेगळ्या भागांवरील तीळ एखाद्या व्यक्तीचे नशीब किंवा त्याचे आयुष्य कसे असेल हे सांगतात. शरीराचा आकार किंवा त्यावर असलेल्या तीळाच्या खुणा पाहून भविष्याचा अंदाज सामुद्रिक शास्त्रात केला जातो. शरीराच्या कोणत्या भागावर तीळ असणे म्हणजे काय, हे या शास्त्रात सांगितले आहे. असे मानले जाते की शरीरावर १२ पेक्षा जास्त तीळ असणे शुभ नाही. जाणून घ्या सामुद्रिक शास्त्र काय सांगते…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
  • सामुद्रिक शास्त्रात असे म्हटले आहे की ज्या लोकांच्या चेहऱ्यावर तीळ असतो, ते भाग्यवान असतात. अशा लोकांकडे भरपूर पैसा असतो. असे लोक आयुष्यभर पैशाच्या तंगीचा सामना करत नाहीत.
  • ज्या व्यक्तीच्या छातीवर तीळ असतो, ती व्यक्ती आयुष्यात खूप पैसा कमावते. अशा व्यक्तीचा खिसा सतत नोटांनी भरलेला असतो. अशा लोकांवर लक्ष्मी देवीची कृपा सदैव राहते.
  • असे मानले जाते की ज्या लोकांच्या पोटावर तीळ असतो, त्यांना आयुष्यभर भरपूर पैसा मिळतो. पण त्याचबरोबर असे देखील म्हटले जाते की ज्या लोकांच्या पोटावर तीळ आहे त्यांना आरोग्याशी संबंधित अनेक समस्या असतात. त्यामुळे त्यांच्या कमावलेल्या पैशांपैकी बहुतांश रक्कम आरोग्याशी संबंधित खर्चावर खर्च होते.
  • ज्या लोकांच्या उजव्या आणि डाव्या दोन्ही हातांवर तीळ असते, अशा लोकांची आर्थिक स्थिती नेहमीच मजबूत असते. अशा लोकांना कधीही पैशाची कमतरता भासत नाही. पैशांमुळे त्याचे कोणतेही काम अडत नाही. सामुद्रिक शास्त्रात असे सांगितले आहे की ज्यांच्या हातावर तीळ आहे ते लोक आपल्या मेहनतीने पैसा कमावतात.
  • उजव्या हातावर तीळ असलेला व्‍यक्‍ती जास्त संपत्तीचा मालक बनतो. अशा लोकांची तिजोरी नेहमी पैशांनी भरलेली असते. अशा लोकांच्या वयानुसार पैसाही सतत वाढत असतो. असे म्हणतात की अशा लोकांवर देवी लक्ष्मीची कृपा नेहमीच असते.
  • सामुद्रिकशास्त्रात असे मानले जाते की ज्या व्यक्तीच्या हाताच्या सर्वात लहान बोटावर म्हणजेच करंगळीवर तीळ असतो, अशी व्यक्ती खूप श्रीमंत असते. कालांतराने, एक टप्पा येतो जेव्हा त्याची गणना करोडपतींमध्ये होऊ लागते. अशा लोकांच्या आयुष्यात दुःख येते.
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samudra shastra oceanography what is meaning having mole on body hrc