सामुद्रिक शास्त्रामध्ये शरीराच्या अवयवांची रचना आणि तीळ यांच्या आधारे मानवाच्या स्वभावाचे आणि भविष्याचे विश्लेषण केले जाते. असं मानलं जातं की, शरीरावर काही तीळ शुभ असतात तर काही अशुभ. परंतु हे सर्व तीळ शरीरावर कुठे आहे आणि त्याचा आकार, रंग काय आहे यावर अवलंबून असते.
सामुद्रिकशास्त्रानुसार कपाळावर तीळ असणे अद्भूत मानले जाते. असं म्हणतात की, खूप कमी लोक असतात, ज्यांच्या कपाळावर तीळ असतो. हा तीळ केवळ भाग्यवान लोकांच्या कपाळावर आढळतो. चला जाणून घेऊया कपाळावरील तीळ संबंधित आणखी काही खास गोष्टी…
सामुद्रिक शास्त्रानुसार ज्या लोकांच्या कपाळाच्या उजव्या बाजूला तीळ असतो, असे लोक खूप बुद्धिमान असतात. त्यांना जीवनात खूप लवकर यश मिळतं. हे लोक धाडसी, हुशार, मेहनती आणि प्रामाणिक असतात. कष्ट करून ते कोणत्याही कामात यश मिळवू शकतात. हे लोक पैसे कमवण्यावर कमी विश्वास ठेवतात. त्यांचा असा विश्वास असतो, की जीवन एकदाच दिले मिळते त्यामुळे त्याचा पुरेपूर आनंद घेतला पाहिजे.
कपाळाच्या डाव्या बाजूला तीळ:
ज्या लोकांच्या कपाळावर डाव्या बाजूला तीळ असतो, त्यांचा स्वभाव अतिशय शांत असतो, असे सामुद्रिक शास्त्राचे मत आहे. अशा लोकांना जीवनात यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात. हे लोक ऐशोआरामात जीवन जगतात. त्यांना कंजूषपणा आवडत नाही. ते ब्रँडेड गोष्टींवर भरपूर पैसे खर्च करतात.
कपाळाच्या वरच्या भागात तीळ:
कपाळाच्या वरच्या भागात तीळ असलेल्या व्यक्तीला दैवी शक्ती प्राप्त होतात. अशा लोकांना अनेक मित्र असतात. त्यांना फारसे कौटुंबिक सुख मिळत नाही. मैत्री जपण्यात हे लोक उत्तम असतात. हे लोक एखाद्याला पहिल्यांदाच भेटत असतील तरी ते नम्रतेने भेटतात. हे लोक इतरांच्या दु:खात सोबत उभे राहतात.
कपाळाच्या खालच्या बाजूला तीळ:
असं म्हणतात की ज्या लोकांच्या कपाळावर खालच्या बाजूला तीळ असतो ते खूप भावूक असतात. त्यांना जीवनात यश मिळते. आई-वडिलांचे खूप प्रेम मिळते. हे लोक त्यांचा दृष्टिकोन अतिशय प्रभावीपणे मांडतात. त्याच्या बुद्धिमत्तेमुळे लोक त्याच्याकडे नेहमीच आकर्षित होतात. तसेच हे लोक खूप मोकळे मनाचे असतात. ते नेहमी इतरांच्या मदतीसाठी पुढे उभे असतात. ते पहिल्याच भेटीतच समोरच्या लोकांना आकर्षित करतात.
कपाळाच्या मध्यभागी तीळ:
सामुद्रिक शास्त्रानुसार ज्या लोकांच्या कपाळाच्या मध्यभागी तीळ असतो ते खूप भाग्यवान असतात. त्यांना कौटुंबिक सुख, वैवाहिक सुख, जमीन सुख मिळते. मात्र त्यांची प्रकृती ठीक राहत नाही. पण हे लोक अत्यंत हुशार असतात. त्याचबरोबर हे लोक एकदा ठरवलेले काम पूर्ण करूनच दम घेतात. ते त्यांच्या सोयीसुविधांवर मोकळ्या मनाने पैसा खर्च करतात.