तारुण्यवस्थेत असणाऱ्या प्रत्येक मुलाच्या मनात अनेकदा तरी असा विचार आला असेल की, त्याला जीवनसाथी म्हणून अशी मुलगी मिळावी, जी सर्वगुणसंपन्न असेल आणि त्याच्या कुटुंबाची काळजी घेईल. जी त्याच्या कठीण काळात त्याला साथ देईल, त्याच्या मुलांवर योग्य संस्कार करेल. मात्र, अशा मुली ओळखायचा कशा? ही एक मोठी समस्या असते. सामुद्रिक शास्त्रानुसार, मुलींच्या बोटांची बनावट आणि रचना पाहून आपण त्यांच्या स्वभावाविषयी बरीचशी माहिती जाणून घेऊ शकतो.
- कल्पक आणि विश्वासार्ह
सामुद्रिक शास्त्रानुसार ज्या मुलींची बोटे पातळ आणि लांब असतात, त्या स्वभावाने खूप सर्जनशील मानल्या जातात. असे मानले जाते की अशा स्त्रिया इतर व्यक्तींवर जास्त अवलंबून नसतात आणि स्वयंपूर्ण असतात. अशा मुली नातेसंबंध टिकवून ठेवण्यासाठी विश्वासार्ह असतात. पत्नी, मित्र म्हणून त्या सर्वोत्तम असल्याचे सिद्ध होते.
- प्रामाणिक आणि गंभीर स्वभाव
ज्या मुलींचे मधले बोट इतर बोटांपेक्षा लांब आणि रुंद असते, त्यांना खूप प्रामाणिक मानले जाते. दुसरीकडे, ज्या मुलींचे मधले बोट पातळ आणि लांब असते, त्या गंभीर स्वभावाच्या मानल्या जातात. अशा मुली त्यांचे नाते गंभीरपणे आणि प्रामाणिकपणे निभावतात.
- कठीण काळाला शांतपणे सामोऱ्या जातात
ज्या मुलींची बोटे थोडी जाड असतात, त्या खूप धैर्यवान असतात. त्या छोट्या छोट्या गोष्टींवर आपला संयम गमावत नाही आणि वाईट वेळ संयमाने पार करतात. अशा मुली आपल्या कुटुंबाला सर्वाधिक प्राधान्य देतात. कुटुंबासाठी त्या कोणाशीही लढायला तयार असतात. तथापि, त्या स्वभावाने खर्चिक असतात आणि कमी बचत करतात.
- कुटुंबाचा आधार असतात
असे मानले जाते की ज्या मुलींची बोटे गोलाकार आणि लांब असतात, त्या लग्नानंतर त्यांच्या पतीसाठी भाग्यवान ठरतात. अशा मुली आपल्या पतीला प्रत्येक कामात सहकार्य करतात. परिस्थिती कशीही असो, त्या आपल्या पतीच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असतात. अशा मुलीशी लग्न करणाऱ्या व्यक्तीचे आयुष्य बदलायला वेळ लागत नाही.
- निर्मळ मनाच्या असतात
सामुद्रिक शास्त्रानुसार ज्या मुलींची बोटे लहान आणि जाड असतात, त्या मुलींचे हृदय स्वच्छ मानले जाते. त्या छळ-कपटापासून दूर राहतात आणि आपले आयुष्य आनंदाने जगतात. त्याच्यामुळे संपूर्ण कुटुंबातील वातावरण आनंदी होते. मात्र, अशा महिला त्यांच्या कामाच्या बाबतीत थोड्या निष्काळजी असतात आणि त्यांना फारसे जबाबदार मानले जात नाही.
- बचत करण्यावर विश्वास ठेवतात
ज्योतिषशास्त्रानुसार ज्या मुलींच्या बोटांचा पुढचा भाग पातळ असतो, त्यांचे वैवाहिक जीवन चांगले असते. अशा मुली सासरच्यांच्या लाडक्या असतात आणि त्यांच्या नवऱ्याच्या प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टींची त्या काळजी घेतात. त्यांचा बचत करण्यावर विश्वास ठेवते. अनावश्यक खर्चापासून त्या दूर राहतात. उधळपट्टी करणे त्यांना आवडत नाही.
(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)