ज्योतिष शास्त्रामध्ये एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये असलेल्या ग्रहांची स्थिती पाहून त्याचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व कळते. त्याचप्रमाणे सामुद्रिक शास्त्रामध्ये व्यक्तीच्या शरीराची रचना आणि शरीरावरील खुणावरून, त्याचे भविष्य आणि गुण तसेच स्वभाव जाणून घेता येतो. आज आपण पायाच्या तळव्यांबद्दल बोलणार आहोत. पायांच्या तळव्यांवरून कोणत्याही व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व जाणून घेता येते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – शुक्र ग्रह करणार सिंह राशीमध्ये संक्रमण; ‘या’ राशींना येणार अच्छे दिन, प्रत्येक कामात यशाचे योग

ज्या लोकांचे पायाचे तळवे अतिशय मऊ, गुळगुळीत आणि लाल रंगाचे असतात. असे लोक खूप भाग्यवान मानले जातात. या लोकांना पैशाची कमतरता नसते. हे लोक श्रीमंत असतात आणि त्यांना प्रवास करायला आवडतं. हे लोक थोडे विनोदी स्वभावाचेही असतात.

हेही वाचा – सामुद्रिक शास्त्र : उजव्या गालावर जन्मखूण असलेल्या तरुणीला मिळतो श्रीमंत पती; तर, कपाळावर जन्मखूण…

सामुद्रिक शास्त्रानुसार ज्या लोकांचे तळवे सपाट असतात. असे लोक मेहनतीच्या जोरावर यश मिळवतात. तसेच ते मनमोकळे असतात. असे लोक स्पष्टवक्ते असतात, त्यांना जे काही बोलायचं असेल ते तोंडावर बोलतात.

सामुद्रिक शास्त्रानुसार पायांच्या टाचांना भेगा असतील तर ते शुभ मानले जात नाही. अशा लोकांना जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पण हे लोक प्रत्येक परिस्थितीत आनंदी असतात. हे लोक त्यांच्या मनाचे मालक असतात. तसेच, हे लोक नेहमी इतरांना मदत करण्यास तयार असतात.

हेही वाचा – अशा बोटांच्या मुली खूप भाग्यवान असतात, पतीचे नशीब देखील चमकवतात!

ज्या लोकांच्या पायाचे तळवे पांढरे असतात, असे लोक योग्य निर्णय घेऊ शकत नाहीत. हे लोक इतरांनी काही सांगितलं तर लवकर विश्वास ठेवतात. ते इतरांच्या बोलण्यात फसतात. पण त्यांना स्वतंत्रपणे जगायला आवडतं.

सामुद्रिक शास्त्रानुसार, ज्या लोकांच्या तळव्यामध्ये थोडा काळेपणा असतो, अशा लोकांना जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या लोकांचे आयुष्य संघर्षात जाते. या लोकांना नशिबाची साथही मिळत नाही.