सामुद्रिक शास्त्रानुसार जेव्हा कोणतंही मूल जन्माला येते, तेव्हा त्याच्या शरीरावर जन्मापासूनच काही खुणा असतात. काही खूणा शुभ तर, काही अशुभ असतात. या खुणा एखाद्या व्यक्तीचे भाग्य आणि दुर्दैव दर्शवतात. आज आम्ही तुम्हाला अशा खुणांबद्दल सांगणार आहोत, ज्यावरून ते शुभ आहेत की अशुभ हे तुम्ही ओळखू शकता. चला जाणून घेऊया या चिन्हांबद्दल…
कपाळावर जन्मखूण असेल तर…
सामुद्रिक शास्त्रानुसार, जर एखाद्या व्यक्तीच्या कपाळावर जन्मखूण असेल तर ती व्यक्ती खूप बुद्धिमान आहे, असा त्याचा अर्थ होतो. असे लोक जीवनात खूप प्रसिद्धी मिळवतात. तसेच असे लोक जीवनात भरपूर पैसा आणि नावही कमावतात.
कपाळाच्या मध्यभागी जन्मखूण असेल तर…
जर एखाद्या व्यक्तीच्या कपाळाच्या मध्यभागी जन्मखूण असेल तर अशी व्यक्ती कलाप्रेमी असते. तसेच, अशा व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व आकर्षक असते. हे लोक संभाषणात निष्णात असतात आणि समोरची व्यक्ती लवकरच त्यांच्यामुळे प्रभावित होते. या लोकांना प्रवासाचीही आवड असते आणि ते मनसोक्त खर्च करतात.
मानेवर जन्मखूण असेल तर…
सामुद्रिक शास्त्रानुसार जर एखाद्याच्या मानेवर जन्मखूण असेल तर तर त्या व्यक्तीला करिअरमध्ये चांगले यश मिळते. तसेच असे लोक थोडे कठोर मनाचे असतात. जर एखाद्या व्यक्तीच्या मानेच्या मागील बाजूस जन्मखूण असेल तर अशी व्यक्ती धैर्यवान आणि निर्भय असल्याचं म्हटलं जातं. या लोकांना सहसा राग येत नाही, पण राग आला की त्यांना नियंत्रित करणं कठीण असतं.
गालावर जन्मखूण असेल तर…
सामुद्रिक शास्त्रानुसार, जर एखाद्या पुरुषाच्या उजव्या गालावर जन्मखूण असेल तर त्या व्यक्तीला आयुष्यात खूप संघर्ष करावा लागतो. तसेच जर एखाद्या महिलेच्या उजव्या गालावर जन्मखूण असेल तर अशा स्त्रीचा विवाह चांगल्या घरात होतो. अशा स्त्रीचा नवरा खूप श्रीमंत असतो. तसेच, तिचे वैवाहिक जीवन खूप आनंदात जाते.