Tongue colour Samudrika Shastra : सामुद्रिक शास्त्रामध्ये व्यक्तीच्या शरीररचनेनुसार माणसाचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व जाणून घेता येते. व्यक्तीची जीभ कोणत्या रंगाची आहे किंवा जिभेची रचना कशी आहे, यावरूनही माणसाचा स्वभाव ओळखता येतो. आज आपण त्याविषयीच सविस्तर जाणून घेऊ या ….
जीभ थोडी काळी असेल तर
सामुद्रिक शास्त्रानुसार जर व्यक्तीची जीभ थोडी काळी असेल, तर त्यांना कामाच्या ठिकाणी खूप समस्यांचा सामना करावा लागू शकतो. नोकरीच्या ठिकाणी या लोकांना तणाव असू शकतो. त्यांचे मन स्थिर राहत नसल्यामुळे व्यवसायातही त्यांना वारंवार अपयश येते.
दोन रंगांची जीभ
जर व्यक्तीची जीभ एका रंगाऐवजी दोन वेगवेगळ्या रंगांची असेल, तर असे लोक खूप लवकर वाईट संगतीमुळे बिघडतात. त्यांच्याकडून नेहमी नियमांचे पालन होत नाही. त्यांना नेहमी शारीरिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
जाड जीभ
काही जणांची जीभ खूप जाड असते. हे लोक खूप कठोर बोलतात. हे लोक खूप छान स्वभावाचे असतात; पण चुकीच्या पद्धतीने बोलण्यावरून अनेक जण त्यांना चुकीचे समजतात. त्यामुळे अशा व्यक्तींनी बोलण्यापूर्वी नीट विचार केला पाहिजे.
पिवळी जीभ
सामुद्रिक शास्त्रानुसार पिवळ्या रंगाची जीभ असणे शुभ मानले जात नाही. पिवळी जीभ ही आरोग्य चांगले नसल्याचे संकेत देते. अशा लोकांची तर्कक्षमता कमकुवत असते. जर व्यक्तीची जीभ पिवळी असेल, तर आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.
हेही वाचा : Astrology : जन्मापासूनच राजयोग घेऊन येतात ‘या’ चार राशींचे लोक; बक्कळ पैसा कमवतात?
लाल जीभ
लाल रंगाची जीभ असणाऱ्या व्यक्ती खूप भाग्यवान असतात. अशा लोकांना जीवनात नेहमी यश मिळते. त्यांना नोकरीच्या ठिकाणी उच्च पद मिळते आणि व्यवसायात नफा मिळतो. त्यांचे आरोग्य नेहमी उत्तम राहते.
जिभेवर तीळ
जिभेवर तीळ असणे हा एक चांगला संकेत असतो. हे लोक खूप चांगले वक्ते असतात. राजकारणात अशा व्यक्ती चांगले करिअर घडवू शकतात; पण अनेकदा हे लोक घाई-गडबडीमुळे स्वत:चे नुकसान करून घेतात.
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)