Vikata Sankashti Chaturthi 2024:  हिंदू कॅलेंडरनुसार, प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी तिथी असतात, एक शुक्ल पक्षात आणि एक कृष्ण पक्षात. अशाप्रकारे एका वर्षात सुमारे २४ चतुर्थी तिथी असतात. संकष्टी चतुर्थीला प्रथम पूज्य भगवान श्री गणेशाची मनोभावे, विधीपूर्वक पूजा केली जाते, व्रत ठेवले आहे. यात २४ एप्रिलपासून वैशाख महिना सुरू झाला आहे. या महिन्यात कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला विकट संकष्टी चतुर्थी असे म्हणतात. वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चौथ्या दिवशी विकट संकष्टी चतुर्थी व्रत पाळले जाते. अशा स्थितीत एप्रिल या वैशाख महिन्यातील संकष्टी चतुर्थी तिथीची योग्य तारीख काय आहे? तसेच पूजेचा शुभ मुहूर्त आणि चंद्रोदय वेळ काय आहे जाणून घेऊ….

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एप्रिल महिन्यात संकष्टी चतुर्थी कधी आहे?

पंचांगानुसार, वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी २७ एप्रिल २०२४ रोजी साजरी केली जाईल.

संकष्टी चतुर्थीची शुभ वेळ

संकष्टी चतुर्थी तिथी २७ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ०८.१७ वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी २८ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ०८.२१ वाजता समाप्त होईल.

पुजेची वेळ

सकाळी ७.२२ ते सकाळी ९.०१ पर्यंत

रात्रीची वेळ – ६.५४ ते ८.१५

संकष्टी चतुर्थी २०२४ चंद्रोदय वेळ

संकष्टी चतुर्थीला दिवसभर उपवास केल्यानंतर रात्री चंद्राला अर्घ्य देऊन उपवास तोडला जातो. विकट संकष्टी चतुर्थी व्रताच्या दिवशी रात्री १०.२३ वाजता चंद्रोदय होईल.

विकट संकष्टी चतुर्थी व्रताचे महत्त्व

हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीचे व्रत अत्यंत महत्त्वाचे मानले जाते आणि असे म्हटले जाते की, संकष्टी चतुर्थीच्या दिवशी विधीनुसार गणपतीची पूजा केल्यास सर्व संकटांपासून मुक्ती मिळते. तसेच श्रीगणेश आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. या दिवशी चंद्राची पूजा करण्याचीही परंपरा आहे आणि शास्त्रानुसार चंद्राची पूजा केल्याने चंद्रदोष दूर होतो आणि व्यक्तीला मानसिक शांती मिळते.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanakashti chaturthi vrat 2024 date puja vidhi shubhu muhurat moon rising timing mantra and significance sjr
Show comments