Sankashti Chaturthi 2024 : प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थ्या येतात. पहिली संकष्टी आणि दुसरी विनायक चतुर्थी. संकष्टी चतुर्थी कृष्ण पक्षात येते आणि विनायक चतुर्थी शुल्क पक्षात येते. दोन्ही चतुर्थी गणपती बाप्पाच्या पूजेसाठी समर्पित असतात. या दिवशी गणपतीची यशासांग पूजा केल्यास शुभफल प्राप्त होते, असे मानले जाते. यामुळे हिंदू पंचांगानुसार, नव्या २०२४ या वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी कधी आहे? तसेच प्रत्येक महिन्यातील संकष्टी चतुर्थीच्या तारखा आणि शुभ मुहूर्त काय आहेत? (sankasthi chaturthi shubh muhurat 2024)जाणून घेऊ…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जानेवारी २०२४ संकष्टी चतुर्थी आणि शुभ मुहूर्त

२९ जानेवारी २०२४ (सोमवार) लंबोदर संकष्टी चतुर्थी

शुभ मुहूर्त

वर्ष २०२४ मध्ये पहिली संकष्टी चतुर्थी २९ जानेवारी रोजी आहे. चतुर्थीची तिथी सकाळी ६.११ वाजता सुरू होईल आणि ३० जानेवारी रोजी सकाळी ८.५४ वाजता समाप्त होईल.

फेब्रुवारी २०२४ संकष्टी चतुर्थी आणि शुभ मुहूर्त

२८ फेब्रुवारी २०२४ (बुधवार) द्विजप्रिया संकष्टी चतुर्थी

शुभ मुहूर्त

फेब्रुवारीमध्ये संकष्टी चतुर्थी २८ फेब्रवारी रोजी आहे. तिची तिथी सकाळी १.५३ वाजता सुरू होईल आणि २९ फेब्रुवारी रोजी पहाटे ४.१८ वाजता समाप्त होईल.

मार्च २०२४ संकष्टी चतुर्थी आणि शुभ मुहूर्त

२९ मार्च २०२४ (शुक्रवार) – भालचंद्र संकष्टी चतुर्थी

शुभ मुहूर्त

वर्ष २०२४ मध्ये चैत्र महिन्यात म्हणजे मार्चमध्ये कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी २८ मार्च रोजी आहे. ही चतुर्थी तिथी संध्याकाळी ६.५७ वाजता सुरू होईल आणि २९ मार्च रोजी सकाळी ८.२१ वाजता समाप्त होईल. उदय तिथीनुसार, २९ मार्च रोजी संकष्टी चतुर्थी व्रत केले जाणार आहे.

एप्रिल २०२४ संकष्टी चतुर्थी आणि शुभ मुहूर्त

२७ एप्रिल २०२४ (शनिवार) विकट संकष्टी चतुर्थी

शुभ मुहूर्त

एप्रिल २०२४ मधील संकष्टी चतुर्थी २७ एप्रिल रोजी सकाळी ८.१८ वाजता सुरू होईल आणि २८ एप्रिल रोजी सकाळी ८.२८ वाजता समाप्त होईल.

मे २०२४ संकष्टी चतुर्थी आणि शुभ मुहूर्त

२६ मे २०२४ (रविवार) एकदंत संकष्टी चतुर्थी

शुभ मुहूर्त

वर्ष २०२४ च्या मे महिन्यात २६ मे रोजी संकष्टी चतुर्थी आहे, शुभ वेळ सकाळी ६.०६ वाजता सुरू होईल आणि २७ मे रोजी पहाटे ४.३५ पर्यंत असेल.

जून २०२४ संकष्टी चतुर्थी आणि शुभ मुहूर्त

२५ जून २०२४ (मंगळवार) कृष्णपिंगला संकष्टी चतुर्थी

शुभ मुहूर्त

आषाढ महिन्यातील संकष्टी चतुर्थी २५ जून रोजी पहाटे १.१३ वाजता सुरू होईल आणि २५ जून रोजी सकाळी ११.११ वाजता समाप्त होईल. मंगळवारी येणाऱ्या या संकष्टी चतुर्थीस अंगारिका योग असतो, त्यामुळे या चतुर्थीला अंगारिका चतुर्थी असेही म्हणतात.

जुलै २०२४ संकष्टी चतुर्थी आणि शुभ मुहूर्त

२४ जुलै २०२४ (बुधवार) गजानन संकष्टी चतुर्थी

शुभ मुहूर्त

वर्ष २०२४ मध्ये जुलै महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी २४ जुलै रोजी सकाळी ७.३० वाजता सुरू होईल आणि २५ जुलै रोजी पहाटे ४.३९ वाजता समाप्त होईल.

ऑगस्ट २०२४ संकष्टी चतुर्थी आणि शुभ मुहूर्त

२२ ऑगस्ट २०२४ (गुरुवार) हेरंब संकष्टी चतुर्थी

शुभ मुहूर्त

ऑगस्ट महिन्याची संकष्टी चतुर्थी २२ ऑगस्ट रोजी सकाळी १.४६ वाजता सुरू होईल आणि २३ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३९ पर्यंत चालू राहील.

सप्टेंबर २०२४ संकष्टी चतुर्थी आणि शुभ मुहूर्त

२१ सप्टेंबर २०२४ (शनिवार) विघ्नराज संकष्टी चतुर्थी

शुभ मुहूर्त

सप्टेंबर महिन्यात कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी २० सप्टेंबर रोजी रात्री ९.१५ वाजता सुरू होईल आणि २१ सप्टेंबर रोजी सकाळी ६.१४ वाजता समाप्त होईल.

ऑक्टोबर २०२४ संकष्टी चतुर्थी आणि शुभ मुहूर्त

२० ऑक्टोबर २०२४ (रविवार) वक्रतुंड संकष्टी चतुर्थी

शुभ मुहूर्त

ऑक्टोबर महिन्यात कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी २० ऑक्टोबर रोजी सकाळी ६.४६ वाजता सुरू होईल आणि २१ ऑक्टोबर रोजी पहाटे ४.१७ वाजता समाप्त होईल.

नोव्हेंबर २०२४ संकष्टी चतुर्थी आणि शुभ मुहूर्त

१९ नोव्हेंबर २०२४ (मंगळवार) गणाधिप संकष्टी चतुर्थी

शुभ मुहूर्त

नोव्हेंबर महिन्यात कृष्ण संकष्टी चतुर्थी १८ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६.५६ वाजता सुरू होईल आणि १९ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ५.२८ पर्यंत चालू राहील.

डिसेंबर २०२४ संकष्टी चतुर्थी आणि शुभ मुहूर्त

१८ डिसेंबर २०२४ (बुधवारी) अक्षुर्थ संकष्टी चतुर्थी

शुभ मुहूर्त

डिसेंबर २०२४ च्या शेवटच्या महिन्यात, संकष्टी चतुर्थी १८ डिसेंबर रोजी सकाळी १०.६ वाजता सुरू होईल आणि १९ डिसेंबर रोजी सकाळी १०.३ वाजता समाप्त होईल.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sankashti chaturthi 2024 sankasthi chaturthi vrat dates 2024 list year 2024 sankasthi chaturthi vrat subha muhurth sjr