Mesh To Meen Horoscope in Marathi: १७ जानेवारी २०२५ रोजी पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी आहे. चतुर्थी तिथी उद्या पहाटे ५ वाजून ३१ मिनिटांपर्यंत राहील. रात्री १२ वाजून ५७ मिनिटांपर्यंत पर्यंत शुभ योग जुळून येईल. तसेच मघा नक्षत्र दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांपर्यंत जुळून येईल. आज राहू काळ १० वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजेपर्यंत असणार आहे. याशिवाय आज नवीन वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी असणार आहे. तर बाप्पाच्या कृपेने कोणाच्या इच्छा पूर्ण होणार हे आपण जाणून घेऊया…

१७ जानेवारी पंचांग व राशिभविष्य (Daily Horoscope in Marathi):

मेष:- मनाची चलबिचलता जाणवू शकते. लहान प्रवास चांगला होईल. भावंडांची उत्तम साथ मिळेल. आरोग्याची काळजी घ्यावी. हातापायाच्या दुखण्यांकडे दुर्लक्ष करू नका.

Daily Horoscope 13 January 2025
१३ जानेवारी पंचांग: शाकंभरी पौर्णिमेला छोटासा बदल ‘या’ राशींसाठी ठरेल लाभदायक; कोणाची नाती घट्ट तर कोणाला होणार धनलाभ; वाचा राशिभविष्य
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Daily Horoscope 12 January 2025 In Marathi
१२ जानेवारी राशिभविष्य: रविवारी ब्रम्ह योग कोणत्या राशीसाठी ठरणार शुभ? कोणाची इच्छापूर्ती तर कोणाचे जुने प्रश्न लागतील मार्गी
Shani and shukra made dhanadhya yoga
३० वर्षानंतर धनाढ्य योगामुळे ‘या’ राशींचे नशीब चमकणार! शनी आणि शुक्राची होईल असीम कृपा
daily horoscope 6 january 2025 in marathi
६ जानेवारी पंचांग: आज शनीचा उत्तरभाद्रपद नक्षत्र १२ पैकी ‘या’ राशींना करेल श्रीमंत; तुमच्या नशिबात कसे येईल सुख?वाचा राशीभविष्य
Mangal Margi 2025 horoscope
२१ जानेवारीपासून ‘या’ राशींचे झटक्यात पालटणार नशीब; मंगळ मार्गीमुळे मिळणार बक्कळ पैसा, संपती, जबरदस्त यश
Gajakesari Raja Yoga
९ जानेवारीला निर्माण होणार शक्तीशाली गजकेसरी राजयोग! या राशीच्या लोकांचा सुरु होईल सुवर्णकाळ, पद-पैसा अन् प्रगती होण्याचे प्रबळ योग
2 January 2025 Rashi Bhavishya
३ जानेवारी पंचांग: नववर्षातील पहिली विनायक चतुर्थी! लाभ, इच्छापूर्ती ते आयुष्यात वाढेल गोडवा; वाचा तुमचा शुक्रवार कसा जाणार?

वृषभ:- आवडीचे पदार्थ खाल. कौटुंबिक वातावरण खेळकर राहील. विचारांना अधिक चालना देऊन पहावे. मित्रांशी वादाचे प्रसंग टाळावेत. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका.

मिथुन:- उगाच कोणाच्या भरवश्यावर राहू नका. आवश्यक त्या गोष्टी समजावून घ्या. कार्यालयीन सहकार्‍यांची मदत मिळेल. नवीन ओळख भविष्यात उपयोगी पडेल. व्यावसायिक गोष्टीत याच उपयोग होईल.

कर्क:- जुन्या दुखण्यांना गांभीर्याने घ्या. सामाजिक क्षेत्रात नवीन ओळखी होतील. भावनेला आवर घालावी लागेल. घरगुती प्रश्न सामोपचाराने सोडवा. कामातील निर्णय योग्य ठरतील.

सिंह:- अनोळखी लोकांशी व्यवहार टाळा. इतरांच्या मनीचे गुज जाणून घ्या. संमिश्र घटना घडू शकतात. मनातील इच्छा पूर्ण होईल. कौटुंबिक वातावरणात रमाल.

कन्या:- काही गोष्टी नरमाईने घ्या. भडक मत दर्शवू नका. तडजोडीने मार्ग काढावा. कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवा. कामाची धांदल उडू शकते.

तूळ:- अहंकाराला खतपाणी घालू नका. बोलतांना इतरांच्या भावनेचा विचार करावा. पित्त विकाराचा त्रास जाणवेल. मदतीला मागे हटु नका. कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल.

वृश्चिक:- क्रोधवृत्तीला आवर घालावी. अचानक धनलाभ संभवतो. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका. मौल्यवान वस्तु जपून ठेवा. अति विचार करू नका.

धनू:- पराक्रमाला वाव आहे. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. कामातून इतर गोष्टींकडे लक्ष जाऊ शकते. तरूणांकडून नवीन विचार जाणून घ्याल. अधिकारी वर्गाचा पाठिंबा मिळेल.

मकर:- कामातून समाधान लाभेल. नातेवाईक भेटतील. तुमची प्रतिष्ठा वाढीस लागेल. . वडीलांचे सहकार्य मिळेल.

कुंभ:- कौटुंबिक समस्या जाणून घ्याव्यात. नवीन मित्र जोडण्याचा प्रयत्न करावा. मुलांच्या खोडकरपणात रमून जाल. दिवस खेळीमेळीत जाईल.

मीन:- काहीशी मानसिक शांतता लाभेल. कोणतीही गोष्ट अविचाराने करू नका. घरगुती वातावरण हसते-खेळते राहील. जोडीदाराची चंगाली साथ मिळेल. भागीदारीत फार विसंबून राहू नका.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Story img Loader