24th July Panchang & Rashi Bhavishya: २४ जुलै २०२४ ला आषाढ कृष्ण पक्षातील उदया तिथीनुसार तृतीया व चतुर्थी तिथी एकत्रच असणार आहे. बुधवारी सकाळी ७ वाजून ३१ मिनिटांनी तृतीया तिथी समाप्त होईल व चतुर्थीचा प्रारंभ होईल. आजच्या दिवशी सकाळी ११ वाजून १० मिनिटांपर्यंत सौभाग्य योग असणार आहे तर त्यानंतर शोभन योग लागेल. बुधवारी संध्याकाळी ६ वाजून १५ मिनिटांपर्यंत शतभिषा नक्षत्र जागृत असणार आहे. बुधवारी या महिन्यातील संकष्टी चतुर्थीचे व्रत सुद्धा केले जाईल.

२४ जुलै पंचांग व राशिभविष्य

मेष:-गेले काही दिवस झालेली चिडचिड कमी होईल. मनोरंजनात्मक वाचन होईल. आजचा दिवस चांगला जाईल. नवीन ओळखी लाभदायक ठरतील. तुमच्यातील उत्साह वाढेल.

7th September Rashi Bhavishya & Panchang
गणेश चतुर्थी, ७ सप्टेंबर पंचांग: बाप्पाच्या आगमनाने कोणत्या राशीला होणार सुवर्णलाभ? व्यापारी वर्गाची चांदी तर धनलाभाचे योग जुळणार; वाचा तुमचे भविष्य
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
Shukra Nakshatra Gochar 2024
Shukra Nakshatra Gochar : शुक्र करणार या नक्षत्रात गोचर, १३ सप्टेंबरपर्यंत ‘या’ तीन राशीच्या लोकांना मिळणार अपार धनलाभ
28th August Panchang & Marathi Rashi Bhavishya
२८ ऑगस्ट पंचांग: मृगाशिरा नक्षत्रात मेष, कन्यासह ‘या’ राशींची होणार भरभराट; आनंदवार्ता मिळणार तर प्रियजनांची भेट होणार; वाचा तुमचं राशीभविष्य
Jupiter Nakshatra Transit 202
८९ दिवसांपर्यंत गुरु देणार जगातील प्रत्येक सुख! ‘या’ राशीच्या लोकांच्या दारी येईल लक्ष्मी, मिळेल पैसाच पैसा
venus transit in kanya
२६ दिवस शुक्रदेव देणार पैसाच पैसा! ४८ तासांनी ‘या’ ४ राशींच्या आयुष्यात येणार आनंदाचे क्षण? राशी परिवर्तन होताच दारी नांदणार लक्ष्मी
Saturn transit in purva-bhadrapada nakshatra
१८ ऑगस्टपासून बक्कळ पैसा; शनीच्या नक्षत्र परिवर्तनाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात येणार सुखाचे क्षण
Surya nakshatra gochar 2024 From August 16 Sun enter in Magha Nakshatra
१६ ऑगस्टपासून नुसता पैसाच पैसा; सूर्याच्या मघा नक्षत्रातील प्रवेशाने ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींच्या मान-सन्मात अन् संपत्तीत वाढ

वृषभ:-मित्र व नातेवाईक कौतुक करतील. कामे सुरळीत पार पडतील. हस्तकलेला वाव मिळेल. सामाजिक जाणीव जागृत ठेवाल. सरकारी नोकरदारांनी वरिष्ठांची मर्जी राखावी.

मिथुन:-जिव्हाळ्याची व्यक्ति भेटेल. अनावश्यक खर्च कराल. दिवसाचा पूर्वार्ध चांगला जाईल. नोकरदारांना दिलासा मिळेल. अधिकाराचा योग्य वापर करता येईल.

कर्क:-अति घाई करू नये. जोडीदाराचा सल्ला विचारात घ्या. स्व विचारात मग्न राहाल. जवळच्या व्यक्तींशी संपर्कातून चांगला मार्ग निघेल. हौस भागवण्यावर खर्च कराल.

सिंह:-कामाचा ताण जाणवेल. योग्य गुंतवणुकीला वाव आहे. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. संपर्कातील लोकांशी चांगला संवाद साधला जाईल. सकारात्मकता अंगी बाणवा.

कन्या:-दिवस उत्तम जाईल. घरातील अडकलेली कामे मार्गी लागतील. झोपेची किरकोळ तक्रार जाणवेल. दिवसाचा पूर्वार्ध अनुकूल राहील. बोलण्यावर संयम ठेवा.

तूळ:-करमणूक प्रधान दिवस. मनातील इच्छा पूर्ण होईल. अधिकाराची महत्त्वाकांक्षा वाढीस लागेल. कौटुंबिक गोष्टी समजूतदारपणे हाताळा. लबाड लोकांपासून दूर राहावे.

वृश्चिक:-घरगुती कामे करण्यात वेळ जाईल. नवीन विचारांना चालना मिळेल. मित्रांची योग्य वेळी मदत मिळेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. मोठ्या मनाने गोष्टींकडे पहाल.

धनू:-रखडलेल्या कामात मदत मिळेल. अर्थाचा अनर्थ करू नका. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. व्यावसायिक येणी मिळतील. नवीन ओळखी होण्याची शक्यता.

मकर:-बोलण्यातून गैरसमज टाळा. घरासाठी थोडी जास्त खरेदी होईल. भावंडांशी संवाद साधावा. कौटुंबिक वातावरण सकारात्मक राहील. आपले काम भले व आपण भले असे राहावे.

कुंभ:-दिवस इच्छेप्रमाणे घालवाल. बोलण्यावर संयम ठेवा. दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल. कार्यक्षेत्रात जबाबदार्‍या वाढतील. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील.

हे ही वाचा<< ११८ दिवस ‘या’ राशीधारकांचे सोनपावलांनी नशीब उजळत जातील शनी महाराज; येणार अच्छे दिन, होऊ शकतात गडगंज श्रीमंत

मीन:-घरातील मोठ्यांचे आशीर्वाद घ्या. एखाद्या स्पर्धेत यश मिळेल. मन विचलीत होऊ शकते. उगाच त्रागा करू नका. प्रेमात संयम बाळगावा.-

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर