Sankashti Chaturthi Viesh Mesh To Meen Horoscope : १७ मार्च २०२५ रोजी फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील तृतीया तिथी आहे. सोमवारी संध्याकाळी ७ वाजून ३४ मिनिटांपर्यंत तृतीया तिथी चालेल, त्यानंतर चतुर्थी तिथी सुरू होईल. ध्रुव योग १७ मार्चला दुपारी ३ वाजून ४५ मिनिटांपर्यंत जुळून येईल. तसेच चित्रा नक्षत्र दुपारी २ वाजून ४७ मिनिटांपर्यंत जागृत असेल. राहू काळ ७ वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल ते ९ वाजेपर्यंत असणार आहे. तसेच आज संकष्टी चतुर्थी असणार आहे. आजच्या दिवशी गणपती बाप्पांचा आशीर्वाद कोणत्या राशीला लाभण्याची चिन्हे आहेत हे जाणून घेऊया..

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

१७ मार्च पंचांग व राशिभविष्य:

मेष:- तुमच्या प्रसन्न व्यक्तिमत्वाची छाप पडेल. सर्वजण तुमच्याकडे आकर्षिले जातील. आल्या-गेल्याचे तुम्ही उत्तम आदरातिथ्य कराल. दिवस आपल्या मनाप्रमाणे घालवाल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल.

वृषभ:- मनाच्या चंचलतेला आवर घालावी. काही बाबींचा पुनर्विचार कराल. प्रवासात आरोग्याची काळजी घ्यावी. मोठ्या लोकांचा सहवास लाभेल.

मिथुन:- मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. कामे सुरळीत पार पडतील. तुमच्या मनातील योजना व्यवस्थित आखल्या जातील. जोडीदाराचा विचार जाणून घ्यावा. मौल्यवान वस्तु खरेदी कराल.

कर्क:- तुमच्या केलेचे योग्य मूल्यमापन केले जाईल. प्रशस्तीपत्रकास पात्र व्हाल. वरिष्ठांना खुश ठेवावे लागेल. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. नातवाईकांची मदत मिळेल.

सिंह:- आधिभौतिक गोष्टींपासून दूर राहाल. वाचनाची आवड पूर्ण कराल. कल्पनाशक्तीला चांगला वाव मिळेल. जोडीदाराचा लाडिक हट्ट पुरवावा लागेल. वरिष्ठांशी मतभेद संभवतात.

कन्या:- कमी श्रमात कामे होतील. रेस, जुगार यातून धनलाभ संभवतो. वारसाहक्काच्या कामातून फायदा होईल. अपचनाचा त्रास जाणवेल. बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे.

तूळ:- उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. जोडीदाराची उत्कृष्ट साथ मिळेल. एकमेकातील समजूतदारपणा वाढीस लागेल. दिखाऊपणाला भुलून जाऊ नये. बौद्धिक दृष्टीकोन ठेवावा.

वृश्चिक:- केलेल्या कामाचे समाधान मिळेल. लोकोपवादापासून दूर राहावे. चुकीच्या मार्गाचा अवलंब टाळावा. पारदर्शीपणाने कामे करावी लागतील. व्यसनापासून दूर राहावे.

धनू:- प्रवासात काही कारणाने अडचणी संभवतात. अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे. काही बदल मनाविरुद्ध करावे लागू शकतात. घाई घाईने कोणालाही शब्द देऊ नका. पारंपरिक कमला गती येईल.

मकर:- उतावीळपणे कोणतेही काम करू नका. कामाची धांदल उडेल. मनाची द्विधावस्था होईल. बौद्धिक चातुर्य दाखवाल. नवीन मित्र जोडावेत.

कुंभ:- सर्वांशी गोडीने बोलाल. बौद्धिक डावपेच खेळाल. गोष्टी अधिक खोलात जाऊन जाणून घ्याल. योग्य तर्काचा वापर कराल. हसत-हसत आपली मते मांडाल.

मीन:- कामाचा उरक वाढवावा लागेल. आवडी-निवडी बाबत अधिक दक्ष राहाल. आवडीचे पदार्थ बनवायला लावाल. काही वेळ स्वत:साठी देखील काढावा. लबाड लोकांपासून दूर रहा.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sankashti chaturthi vishesh mesh to meen horoscope in marathi bappa will blessed all zodiac signs asp