Sankashti Chaturthi Special Rashi Bhavishya : १६ एप्रिल २०२४ रोजी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथी आहे. तृतीया तिथी सकाळी १ वाजून १८ मिनिटांपर्यंत राहील,त्यानंतर चतुर्थी तिथी सुरू होईल. अनुराधा नक्षत्र गुरुवारी पहाटे ५ वाजून ५५ मिनिटांपर्यंत जागृत असेल. आज संपूर्ण दिवस सिद्धि योग जुळून येईल. आज राहू काळ १२ वाजता सुरु होईल ते १ वाजून ३० मिनिटांपर्यंत असणार आहे. तसेच आज संकष्टी चतुर्थी सुद्धा असणार आहे. चैत्र महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला भालचंद्र संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखले जाते. आज गणपती बाप्पाची मनोभावे पूजा केली जाते. तर आजच्या दिवशी बाप्पा तुम्हाला कोणत्या गोष्टी करण्याचे संकेत देणार हे आपण जाणून घेऊया…
१६ एप्रिल पंचांग व राशिभविष्य ( Ajche Rashi Bhavishya )
मेष राशिभविष्य (Aries Horoscope Today)
आवडी निवडीबद्दल दक्ष राहाल. कामाचा अतिरिक्त ताण जाणवेल. बदलांकडे सकारात्मकतेने पहावे. प्रेमळपणे सर्वांना जिंकून घ्याल. बोलण्यातून उत्तम छाप पाडाल.
वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope Today)
लोक तुमच्याकडे आकर्षिले जातील. भावंडांचे उत्तम सहकार्य मिळेल. दिवस मनाजोगा व्यतीत कराल. सर्व गोष्टींत मना पासून रस घ्याल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल.
मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope Today)
कौटुंबिक खर्च वाढू शकतो. व्यावहारिक दृष्टिकोन ठेवावा. काही गोष्टी उघडपणे बोलणे तळाल. आरोग्याची हयगय करू नका. नवीन मित्र जोडले जातील.
कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope Today)
तुमची समाजप्रियता वाढेल. सरकारी कामे पूर्ण होतील. स्त्री वर्गाशी मैत्री कराल. मित्रा परिवारात वाढ होईल. उत्तम व्यावसायिक कमाई करता येईल.
सिंह राशिभविष्य (Leo Horoscope Today)
तुमच्या कलेला योग्य प्रशस्ती मिळेल. औद्योगिक वातावरण चांगले राहील. इतरांची माने जिंकून घ्याल. चैनीच्या वस्तु खरेदी कराल. दिवस भाग्यकारक ठरेल.
कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope Today)
धार्मिक वृत्तीत वाढ होईल. व्यावसायिक प्रश्न मार्गी लागतील. छंद जोपासण्यात रमून जाल. नवीन विषयात रुचि दाखवाल. हातून एखादे सत्कार्य घडेल.
तूळ राशिभविष्य (Libra Horoscope Today)
कमी श्रमात कामे पार पडतील. जोडीदाराचे कौतुक कराल. शेअर्स मधून लाभ संभवतो. व्यावहारिक दृष्टीने विचार कराल.
वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope Today)
वैवाहिक सौख्यात भर पडेल. तुमच्यातील अहंमन्यता वाढीस लागेल. एकमेकांची बाजू समजून घ्याल. भागीदारीत चांगला लाभ होईल. सर्वांच्या कौतुकास पात्र व्हाल.
धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope Today)
नातेवाईकांची मदत घेता येईल. योग्य संधीची वाट पहावी लागेल. दिवस काहीसा आळसात जाईल. ऐषारामाच्या वस्तु खरेदी कराल. काटकसरी कडे लक्ष द्या.
मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope Today)
रागावर नियंत्रण ठेवावे. रेस जुगार यांतून लाभ संभवतो. मैत्रीतील घनिष्टता वाढेल. प्रेम सौख्याला बहार येईल. नातेवाईकांचे प्रश्न सामोरे येतील.
कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope Today)
हातात नवीन अधिकार येतील. जवळच्या ठिकाणच्या प्रवासाचा योग येईल. घरगुती वातावरण प्रसन्न राहील. दिवस आनंदात जाईल. जवळचे मित्र भेटतील.
मीन राशिभविष्य (Pisces Horoscope Today)
निसर्गाच्या सानिध्यात रमून जाल. हातातील कलेला वाव द्यावा. इतरांचे मनापासून कौतुक कराल. चांगली कल्पना शक्ति लाभेल. हस्त कलेचा आनंद घ्याल.
ज्योतिषी विद्याधर करंदीकर