Saphala Ekadashi 2024 : वैदिक पंचागनुसार, या वर्षी शेवटची एकादशी ही सफला एकादशी आहे. या वर्षी सफला एकादशीचा उपवास हा गुरुवार २६ डिसेंबरला असणार आहे. हिंदू पंचागनुसार, ही एकादशी पौष कृष्ण पक्षाच्या ११ व्या तिथीला साजरी केली जाणार आहे.
शास्त्रामध्ये सफला एकादशी ही अत्यंत खास मानली जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, या वर्षी शेवटची सफला एकादशीवर काही विशेष संयोग निर्माण होत आहे. या दिवशी धृति आणि सुकर्मा योग आणि स्वाती नक्षत्राचा दुर्लक्ष संयोग निर्माण होत आहे ज्यामुळे या एकादशीचे महत्त्व आणखी वाढणार आहे.
ही एकादशी चार राशींच्या लोकांसाठी अत्यंत शुभ मानली जात आहे. जाणून घेऊ या सफला एकादशी कोणत्या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे.
हेही वाचा : २०२५ वर मंगळ ग्रहाचे वर्चस्व; ‘या’ ५ राशीच्या व्यक्ती कमावणार पैसा, प्रसिद्धी आणि आत्मविश्वास
मेष राशी
ज्योतिषशास्त्रानुसार, या वर्षी शेवटची सफला एकादशी मेष राशीच्या संबंधित लोकांसाठी अत्यंत शुभ फलदायी आहे. या एकादशीपासून मेष राशीच्या लोकांना फायदा होणार आहे. नोकरी आणि व्यवसायाशी संबंधित कामांमध्ये यश मिळणार. कोणती मोठी प्रॉपर्टी खरेदी करू शकता. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य लाभेल. धन लाभाचे योग जुळून येतील. जोडीदाराबरोबर वेळ घालवण्याची संधी मिळू शकते. लक्ष्मी आणि विष्णुची विशेष कृपा दिसून येईल.
सिंह राशी
सफला एकादशी सिंह राशीच्या लोकांसाठी अत्यंक शुभ ठरणार आहे. कुटुंबातील लोकांचे सहकार्य लाभेल. व्यवसायात आर्थिक लाभ दिसून येईल. मान सन्मान मिळणार. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसंबंधीत शुभ बातमी मिळू शकते. नोकरी करणाऱ्या लोकांना आकस्मिक धन लाभ मिळू शकतो.
धनु राशी
धनु राशी संबंधित लोकांसाठी या वर्षीची शेवटची एकादशी फायद्याची ठरू शकते. लक्ष्मी आणि श्री हरिची कृपा प्राप्त होऊ शकते. धन लाभाची दाट शक्यता आहे. व्यवसायामध्ये आर्थिक प्रगती होईल. वैवाहिक जीवनात सुख समृद्धीचा अनुभव येईल. अचानक धन लाभ होऊ शकतो.
मीन राशी
मीन राशीच्या लोकांसाठी सफला एकादशी अत्यंत शुभ फळ देणारी ठरणार आहे. या एकादशी पासून मीन राशीच्या लोकांसाठी अच्छे दिन सुरू होऊ शकतात. कुटुंबात वडील किंवा भावापासून आर्थिक सहकार्य मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगला धनलाभ मिळू शकतो. आरोग्य उत्तम राहीन. नोकरी करणाऱ्या लोकांना शुभ बातमी मिळू शकते. प्रतिस्पर्धी परीक्षेशी संबंधित लोकांना शुभ समाचार मिळू शकतो. विष्णु आणि माता लक्ष्मीची असीम कृपा प्राप्त होते.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)