Daily Astrology in Marathi : आज २६ डिसेंबर २०२४ रोजी मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षाची एकादशी तिथी आहे. एकादशी तिथी रात्री १२ वाजून ४४ मिनिटांपर्यंत राहील. तसेच आज सुकर्म योग रात्री १० वाजून २३ मिनिटांपर्यंत राहील. तर स्वाती नक्षत्र संध्याकाळी ६ वाजून १० मिनिटांपर्यंत जागृत असेल. राहू काळ दुपारी १ वाजता सुरु होईल ते दुपारी ३ वाजेपर्यंत असणार आहे.

याशिवाय आज सफला एकादशी आहे. सफला एकादशीचे व्रत केल्याने भक्तांना त्यांच्या सर्व कार्यात यश मिळते, असा विश्वास आहे. तसेच खास गोष्ट अशी की, आज मार्गशीर्ष गुरुवारचे शेवटचे व्रत असणार आहे. तर आज भगवान विष्णूसह लक्ष्मी कोणाला आशीर्वाद देणार, कोणाला कोणत्या कार्यात यश मिळणार हे आपण जाणून घेऊया…

surya arun gochar 2025
२४ तासांनंतर ‘या’ राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ! सूर्य-अरुण ग्रहाची युतीने करिअरमध्ये प्रगती अन् मिळणार भरपूर पैसा
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
11 February 2025 Horoscope In Marathi
११ फेब्रुवारी राशिभविष्य: पुष्य नक्षत्रात माघ पौर्णिमा आल्याने ‘या’ ४ राशींना मिळणार भरपूर सुख; तुमची रास असेल का भाग्यवान?
shani dev uday saturn planet will rise in meen these zodiac sign get more profit
३० वर्षांनतर शनी देव गुरुच्या राशीमध्ये करणार प्रवेश! ‘या’ राशींच्या लोकांचे सुरू होणार चांगले दिवस, नव्या नोकरीसह मिळेल अपार धन
10 February 2025 rashibhavishya panchang in Marathi 10 February horoscope mesh to meen zodiac signs
10 February 2025 Horoscope: कामात यश ते अनपेक्षित रूपात धनलाभ; मेष ते मीन पैकी तुमच्या राशीचा कसा जाईल सोमवार? वाचा आजचे राशिभविष्य
saturn rise in meen
‘या’ तीन राशींना शनी देणार बक्कळ पैसा; मीन राशीतील उदय दुर्भाग्य करणार दूर अन् देणार प्रमोशनसह प्रत्येक कामात यश
Mesh To Meen Zodiac signs Daily Horoscope In Marathi
६ फेब्रुवारी राशिभविष्य: सूर्याच्या नक्षत्र परिवर्तनाने मेष, सिंहच्या कुंडलीत होणार मोठे बदल; पंचांगानुसार तुमच्या राशीचे भाग्य कसे उजळणार?
Ketu mangal yuti 2025 today horoscope
Ketu Mangal Yuti 2025 : जूनमध्ये खुलणार ‘या’ राशींचे भाग्य; केतू-मंगळाच्या युतीने मिळणार भरपूर पैसा अन् संपत्ती

२६ डिसेंबर पंचांग व राशिभविष्य :

मेष:- शारीरिक दृष्ट्‍या सक्षम राहाल. आजचा दिवस व्यस्त असेल. जवळचा प्रवास घडेल. उत्साहाने व जोमाने कामे तडीस न्याल. आर्थिक प्रश्न सुटेल.

वृषभ:- शैक्षणिक क्षेत्रातील लोकांना दिवस लाभदायक असेल. धार्मिक कामात मदत नोंदवाल. इतरांना मदत केल्याचा आनंद मिळेल. थोरांचे आशीर्वाद घेता येतील. उत्कृष्ट कल्पनाशक्ती लाभेल.

मिथुन:- कोणतीही चर्चा जास्त वेळ ताणू नका. अन्यथा वादाचे प्रसंग उद्भवू शकता. आरोग्याबाबत निष्काळजीपणा करू नका. कौटुंबिक समस्यांकडे लक्ष द्यावे. मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यावे.

कर्क:- जोडीदाराबरोबर चांगला वेळ घालवाल. संयमी भूमिका घ्यावी लागेल. नवीन योजनांवर अंमल करू शकाल. अचानक मूड बदलू शकेल. छोट्या छोट्या गोष्टींनी निराश होऊ नका.

सिंह:- नवीन आव्हानांना सामोरे जावे लागेल. सहकार्‍यांशी संयमी भूमिकेतून वागावे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. विरोधकांकडे विशेष लक्ष द्यावे. गुप्त शत्रूंकडे दुर्लक्ष करू नका.

कन्या:- पूर्वी शिकलेल्या गोष्टीतून लाभ मिळू शकेल. तज्ञ लोकांकडून मार्गदर्शन मिळेल. मनातील प्रेमभावना व्यक्त करता येईल. नवीन पुस्तक खरेदी करू शकता. नवीन गोष्टीत रस घ्याल.

तूळ:- कौटुंबिक जीवनात सकारात्मक बदल घडून येतील. घरातील थोरांच्या मतांचा आदर करावा. आपले विचार प्रभावीपणे मांडावेत. घेतलेल्या मेहनतीचे फळ मिळेल. मनातील चिंता दूर होतील.

वृश्चिक:- पराक्रमात वाढ होईल. आत्मविश्वासाने कामे पूर्ण कराल. सहकार्‍यांशी असणारे संबंध सुधारतील. भावंडांना मदत कराल. अति उत्साहात नसते उद्योग करू नका.

धनू:- कौटुंबिक कामात सक्रिय सहभाग घ्याल. घाईने कोणतेही काम करायला जाऊ नका. दिवस आनंदात जाईल. बोलण्यात माधुर्य राखाल. चांगला आर्थिक लाभ संभवतो.

मकर:- कौटुंबिक जीवनात सौख्य लाभेल. नवीन विचारांना चालना द्यावी. जोडीदारासोबत मन मोकळ्या गप्पा होतील. जुन्या मित्रांच्या भेटीने मन प्रसन्न होईल. भविष्याची चिंता करत बसू नका.

कुंभ:- काही खर्च अचानक सामोरे येतील. आपल्या मतावर ठाम राहावे. आध्यात्मिक कार्यात सहभाग घ्याल. कोर्ट कचेरीची कामे वेळ घेतील. मानसिक व्यग्रता टाळण्याचा प्रयत्न करावा.

मीन:- कौशल्याने वागाल. व्यापार्‍यांना उत्पन्नात वाढ होईल. नवीन खरेदी करता येईल. जुने सहकारी भेटतील. मोठ्या भावंडांची मदत होईल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Story img Loader