Sarva Pitru Amavasya 2024: हिंदू धर्मामध्ये सर्वपित्री अमावस्येला खूप महत्वपूर्ण मानले जाते. अनंत चतुर्दशनंतर पितृपक्षाची सुरूवात होते. असे मानले जाते की, या काळात आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येतात. पितृ पक्षात पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याच्या शांती व तृप्तीसाठी श्राद्ध, पिंडदान व तर्पण, असे धार्मिक विधी केले जातात. धार्मिक मान्यतेनुसार पितृ पक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येपर्यंत असतो.

यंदा ०२ ऑक्टोबर २०२४ रोजी पितृपक्षाचा शेवटचा दिवस म्हणजेच सर्वपित्री अमावस्या असेल. तसेच याच दिवशी सूर्यग्रहणदेखील असणार आहे.

uddhav thackeray fact check video
“मी गोमांस खातो, काय माझं वाकडं करायचं ते करा” उद्धव ठाकरेंनी दिली जाहीर कबुली? या खोट्या VIDEO ची खरी बाजू पाहा
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
vasai virar fire news
विरारच्या ग्लोबल सिटी मध्ये इमारतीत बंद सदनिकेला आग
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
tula shikvin changalach dhada zee marathi serial bhuvaneshwari re enters in the show
प्रतीक्षा संपली! भुवनेश्वरी पुन्हा येणार…; अक्षराला दिसणार सासूबाईंची झलक, ‘या’ दिवशी असणार विशेष भाग, पाहा प्रोमो
a friend saved life of his friend by using presence of mind
VIDEO : मित्राच्या प्रसंगावधानाने वाचला तरुणाचा जीव, नेटकरी म्हणाले, “शंभर नातेवाईक असण्यापेक्षा एक असा मित्र हवा”
drunk up man reports potato theft
Video: पाव किलो बटाटे चोरी झाले म्हणून पठ्ठ्याने पोलिसांना घेतलं बोलावून; पोलिसांच्या मजेशीर चौकशीचा व्हिडीओ व्हायरल
avadhoot gupte marathi singer buy new apartment in khar mumbai area
अवधूत गुप्तेने मुंबईत खरेदी केलं आलिशान घर! किंमत तब्बल ‘इतके’ कोटी, १६ व्या मजल्यावर आहे फ्लॅट

सर्वपित्री अमावस्येची तिथी

हिंदू पंचांगानुसार, भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येला सर्वपित्री अमावस्या असेही म्हटले जाते. सर्वपित्री अमावस्या ०१ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री ०९ वाजून ३९ मिनिटांनी सुरू होईल. तर ०२ ऑक्टोबर २०१४ रोजी रात्री १२ वाजून १८ मिनिटांनी अमावस्या तिथी समाप्त होईल. उदय तिथीनुसार , ०२ ऑक्टोबर २०२४ रोजी सर्वपित्री अमावस्या श्राद्ध केले जाईल.

सर्वपित्री अमावस्येला लागणार सूर्यग्रहण

सर्वपित्री अमावस्येला या वर्षीचे दुसरे सूर्यग्रहणदेखील असणार आहे. या दिवशी रात्री ९ वाजून १३ मिनिटांनी हे सूर्यग्रहण ग्रहण सुरू होणार असून ते रात्री ३ वाजून १७ मिनिटांनी समाप्त होणार. या ग्रहणाचा कालावधी ६ तास ४ मिनिटांचा असणार. हे सूर्यग्रहण रात्रीच्या वेळी असल्यामुळे ते भारतात दिसणार नाही. तसेच ग्रहण भारतात दिसत नसल्यामुळे या ग्रहणादरम्यान सुतक कालावधी वैध राहणार नाही आणि सुतक कालावधीचे नियमदेखील पाळणे बंधनकारक असणार नाही.

तसेच शास्त्रानुसार, या सूर्य ग्रहणाचा भारतावर कोणताच परिणाम होणार नाही. त्यामुळे या दिवशी श्राद्ध, पिंडदान अशा कोणत्याच कार्याचा दोष लागणार नाही.

हेही वाचा: Chandra and Surya Grahan : २०२५ मध्ये चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण कधी होणार?, भारतात दिसणार की नाही?

या देशात दिसणार सूर्यग्रहण

दुसरे सूर्यग्रहण भारतात दिसून येणार नाही पण ते दक्षिण अमेरिका, अर्जेंटिना फिजी, चिली, न्यूझीलंड, ब्राझील, मेक्सिको, पेरू आणि पॅसिफिक महासागराच्या उत्तरेकडील भागात दिसणार आहे.