6th January Horoscope Marathi: आज ६ जानेवारी शनिवारी तुमच्या राशीच्या कुंडलीत ग्रहमान कसे आहे.त्याच्या प्रभावाने तुम्हाला आजचा दिवस कसा जाणार आहे याविषयी एक आढावा घेऊया..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मेष:-मनाची चलबिचलता जाणवू शकते. लहान प्रवास चांगला होईल. भावंडांची उत्तम साथ मिळेल. आरोग्याची काळजी घ्यावी. हातापायाच्या दुखण्यांकडे दुर्लक्ष करू नका.

वृषभ:-आवडीचे पदार्थ खाल. कौटुंबिक वातावरण खेळकर राहील. विचारांना अधिक चालना देऊन पहावे. मित्रांशी वादाचे प्रसंग टाळावेत. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका.

मिथुन:- उगाच कोणाच्या भरवश्यावर राहू नका. आवश्यक त्या गोष्टी समजावून घ्या. कार्यालयीन सहकार्‍यांची मदत मिळेल. नवीन ओळख भविष्यात उपयोगी पडेल. व्यावसायिक गोष्टीत याच उपयोग होईल.

कर्क:-जुन्या दुखण्यांना गांभीर्याने घ्या. सामाजिक क्षेत्रात नवीन ओळखी होतील. भावनेला आवर घालावी लागेल. घरगुती प्रश्न सामोपचाराने सोडवा. कामातील निर्णय योग्य ठरतील.

सिंह:-अनोळखी लोकांशी व्यवहार टाळा. इतरांच्या मनीचे गुज जाणून घ्या. संमिश्र घटना घडू शकतात. मनातील इच्छा पूर्ण होईल. कौटुंबिक वातावरणात रमाल.

कन्या:-काही गोष्टी नरमाईने घ्या. भडक मत दर्शवू नका. तडजोडीने मार्ग काढावा. कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवा. कामाची धांदल उडू शकते.

तूळ:-अहंकाराला खतपाणी घालू नका. बोलतांना इतरांच्या भावनेचा विचार करावा. पित्त विकाराचा त्रास जाणवेल. मदतीला मागे हटु नका. कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल.

वृश्चिक:-क्रोधवृत्तीला आवर घालावी. अचानक धनलाभ संभवतो. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका. मौल्यवान वस्तु जपून ठेवा. अति विचार करू नका.

धनू:-पराक्रमाला वाव आहे. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. कामातून इतर गोष्टींकडे लक्ष जाऊ शकते. तरूणांकडून नवीन विचार जाणून घ्याल. अधिकारी वर्गाचा पाठिंबा मिळेल.

मकर:-कामातून समाधान लाभेल. नातेवाईक भेटतील. तुमची प्रतिष्ठा वाढीस लागेल. कमिशन मधून लाभ कमवाल. वडीलांचे सहकार्य मिळेल.

कुंभ:-जुगारातून लाभ संभवतो. कौटुंबिक समस्या जाणून घ्याव्यात. नवीन मित्र जोडण्याचा प्रयत्न करावा. मुलांच्या खोडकरपणात रमून जाल. दिवस खेळीमेळीत जाईल.

हे ही वाचा<< Aries Yearly Horoscope 2024: मेष राशीच्या लोकांचे अच्छे दिन यंदा कोणत्या महिन्यात? धनलाभ ते आरोग्य, कसं असेल वर्ष?

मीन:-काहीशी मानसिक शांतता लाभेल. कोणतीही गोष्ट अविचाराने करू नका. घरगुती वातावरण हसते-खेळते राहील. जोडीदाराची चंगाली साथ मिळेल. भागीदारीत फार विसंबून राहू नका.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saturday 6th january panchang daily horoscope mesh to meen rashi bhavishya what precautions shall you take health astrology svs