Saturn and Rahu conjunction: ज्योतिषशास्त्रात राहू ग्रहाला पापी आणि छाया ग्रह म्हटले जाते. इतर ग्रहांप्रमाणेच राहूचे देखील प्रत्येक ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन पाहायला मिळते. या परिवर्तनाचा प्रभाव प्रत्येक राशीच्या व्यक्तींवर विविध प्रकारे पाहायला मिळतो. सध्या राहू मीन राशीमध्ये विराजमान असून शनीदेव २९ मार्च रोजी मीन राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे या राशीत या दोन्ही ग्रहांची युती काही राशींच्या व्यक्तींना खूप लाभदायी सिद्ध होईल.

‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य

मिथुन

मिथुन राशीच्या व्यक्तींना शनी-राहूची युती खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुमचे व्यक्तित्व सुधारेल. कुटुंबीयांबरोबर चांगला वेळ घालवाल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांचा शोध संपेल. अडकलेले पैसे परत मिळतील. स्पर्धा परिक्षेत यश मिळेल. जोडीदाराची प्रत्येक गोष्टीत साथ मिळेल. जुने वाद मिटतील. व्यवसायात आकस्मिक धनलाभ होतील. दूरचे प्रवास घडतील. तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना हवे तसे यश मिळेल.

धनु

या काळात धनु राशींना वडिलोपार्जित संपत्तीत लाभ होतील. कर्ज कमी होईल. नोकरी, व्यवसायात फायदा होईल. आयुष्यातील अनेक अडचणी दूर होतील. प्रत्येक कामात यश मिळेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. पद-प्रतिष्ठा प्राप्त होईल. शारीरिक आणि मानसिक तणावही कमी होईल, वैवाहिक जीवनही सुखमय राहील.

कुंभ

कुंभ राशीच्या व्यक्तींना शनी-राहूची युती अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. अडकलेली कामे पूर्ण होतील, करिअरमध्ये हवे तसे यश मिळविता येईल. मार्चपर्यंत तुमच्यावर शनीची कृपा राहील. मनातील इच्छा पूर्ण होतील. नव्या कामाची सुरुवात होईल. कामातील अडथळे दूर होतील. या राशीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धेत यश मिळेल. यावेळी तुमचे व्यक्तिमत्त्व सुधारेल. कामाच्या ठिकाणी दिले गेलेले लक्ष्य पूर्ण कराल.

(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

Story img Loader