Saturn Nakshatra Transit: ज्योतिषशास्त्रामध्ये कर्माचा दाता आणि वय प्रदान करणाऱ्या शनिदेवाचे संक्रमण आणि नक्षत्र परिवर्तन अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. तसेच शनीची हालचाल अतिशय मंद मानली जाते. शनिदेव एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी सुमारे ३० महिने लागतात. सन २०२२ मध्ये शनीच्या राशीतही बदल होणार आहे. मात्र याआधी शनिदेव नक्षत्र बदलणार आहेत. ज्याचा सर्व राशींवर परिणाम होईल, पण ४ राशी आहेत, ज्याचा विशेष फायदा होऊ शकतो. चला ज्योतिषी आदित्य गौर यांच्याकडून जाणून घेऊया या ४ राशी कोणत्या आहेत.
जाणून घ्या शनिदेव कधी नक्षत्र बदलतील
वैदिक कॅलेंडरनुसार शनी सध्या श्रवण नक्षत्रात भ्रमण करत आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, २२ जानेवारी २०२१ रोजी शनिदेवाचे श्रवण नक्षत्रात संक्रमण झाले. तसेच शनिदेव १८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत श्रवण नक्षत्रात राहतील. त्याच वेळी, १८ फेब्रुवारीपासून शनिचे धनीष्ठ नक्षत्रात संक्रमण होईल. पुढील वर्षी म्हणजे १५ मार्च २०२३ पर्यंत शनि ग्रह जिथे बसेल.
(हे ही वाचा: Astrology: ‘या’ ३ राशींचे लोक असतात खूप नम्र!)
‘या’ राशीच्या लोकांना होईल आर्थिक लाभ
ज्योतिषानुसार धनिष्ठा नक्षत्राचा स्वामी मंगळ आहे. धनिष्ठा नक्षत्राच्या पहिल्या दोन टप्प्यात जन्मलेल्या व्यक्तीचे जन्म चिन्ह मकर आहे आणि जर शेवटच्या दोन टप्प्यात जन्मले असेल तर ती राशी कुंभ आहे. तसेच या नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तीवर शनि आणि मंगळाचा विशेष प्रभाव असतो. त्यामुळे मेष, वृश्चिक, मकर आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी शनि राशीतील बदल शुभ असू शकतो. यावेळी तुम्हाला व्यवसायात चांगला नफा मिळेल. करिअरच्या दृष्टीनेही हा काळ चांगला जाणार आहे.
(येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.)