Shani in UttaraBhadraprad Nakshatra: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह वेळोवेळी राशी व नक्षत्र परिवर्तन करत असतात. ज्योतिषशास्त्रानुसार, शनीदेवाला महत्त्वाचा ग्रह मानण्यात आलंय. शनीच्या प्रत्येक हालचालीचा जवळपास सर्व राशींच्या व्यक्तींवर मोठा प्रभाव पडताना दिसतो. सध्या कर्म फळदाता शनी मीन राशीत विराजमान आहेत. आता शनिदेवाने नक्षत्र परिवर्तन केलं आहे. २८ एप्रिल रोजी शनिदेवाने उत्तराभाद्रपद नक्षत्रात प्रवेश केला आहे, तर ७ जून २०२५ रोजी शनिदेव उत्तराभाद्रपद नक्षत्राच्या दुसऱ्या पदावर भ्रमण करतील. शनीच्या या नक्षत्र बदलाने काही राशींच्या लोकांना भरपूर फायदे मिळू शकतात, पाहूयात भाग्यशाली राशी कोणत्या…
शनिच्या नक्षत्र परिवर्तनाने ‘या’ राशींचे सोन्याचे दिवस येणार?
मेष
मेष राशीच्या लोकांसाठी शनीचे नक्षत्र परिवर्तन लाभदायी ठरू शकते. या काळात तुमचं उत्पन्न प्रचंड वाढू शकते. तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. यावेळी तुम्हाला तुमच्या मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. यावेळी कुटुंबातील सदस्यांशी तुमचे संबंध सौहार्दपूर्ण राहू शकतात. तसेच ज्या लोकांचे प्रेमसंबंध आहेत, त्यांना यावेळी यश मिळू शकतं. या राशीच्या लोकांच्या अनेक इच्छा या काळात पूर्ण होऊ शकतात. धार्मिक कार्यात आवड वाढू शकते. समाजात मानसन्मान मिळू शकतो.
मिथुन
शनिदेवाच्या कृपेने मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ शुभ सिद्ध होऊ शकतो. तुम्ही कोणतीही मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी चांगला ठरू शकतो. तसेच यावेळी तुम्हाला गुंतवणुकीचा फायदा मिळू शकतो. या काळात जे लोक निर्यात आणि आयात व्यवसायात आहेत, त्यांना फायदा होऊ शकतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकते. या काळात व्यवसायात चांगला फायदा मिळू शकतो. तसेच जीवनात अनेक नवीन संधी मिळू शकतात. ज्या कामाला तुम्ही हात लावाल, त्यात तुम्हाला यश मिळेल.
कर्क
कर्क राशीच्या लोकांना शनिदेवाच्या कृपेने अचानक मोठा फायदा होऊ शकतो. यावेळी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात. अडकलेली कामं पूर्ण होऊ शकतात. परीक्षेत यश मिळू शकते. नातेवाईकांशी तुमचे संबंध चांगले राहू शकतात. या काळात जुन्या समस्या संपुष्टात येऊन उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. संयमाने काम केल्यास प्रत्येक क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या पालकांचे सहकार्य मिळेल, ज्यामुळे तुम्ही तुमचे ध्येय साध्य करू शकाल. वैवाहिक जीवनातील तणावपूर्ण परिस्थिती संपुष्टात येऊ शकते. आरोग्य चांगले राहील आणि जीवनात आनंद येईल.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)