Saturn-Jupiter Retrograde: पंचांगानुसार, ३१ ऑक्टोबर रोजी दिवाळी साजरी केली जाईल. ज्योतिषशास्त्रानुसार, या काळात तब्बल ५०० वर्षानंतर शनी आपल्या मूळ त्रिकोण राशी असलेल्या कुंभ राशीमध्ये वक्री असेल. तसेच याकाळात देवगुरू बृहस्पती वृषभ राशीमध्ये वक्री होतील. शनी आणि गुरूची वक्री चाल काही राशींच्या व्यक्तींना खूप फायदेशीर ठरेल. या काळात १२ राशींपैकी काही भाग्यवान राशींना प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल.
‘या’ तीन राशींना मिळणार भरपूर पैसा
मेष
मेष राशीच्या व्यक्तींना शनी आणि गुरूची वक्री चाल खूप अनुकूल ठरेल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा, आकांक्षा पूर्ण होतील. अचानक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. उत्पन्नाचे नवे स्त्रोत मिळतील. या राशीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धेत यश मिळेल. यावेळी तुमचे व्यक्तिमत्त्व सुधारेल. कामाच्या ठिकाणी दिले गेलेले लक्ष्य पूर्ण कराल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. या काळात तुम्हाला प्रत्येक कामात हवे तसे यश मिळेल.
वृषभ
शनी आणि गुरूची वक्री चाल वृषभ राशीच्या व्यक्तींना अत्यंत अनुकूल ठरेल. या काळात तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. आरोग्य चांगले राहील. आयुष्यात मानसन्मान आणि कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल. परदेशी जाण्याचे योग आहेत. उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील. जोडीदाराकडून आनंदी वार्ता मिळेल. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अधिक मजबूत होईल. आयुष्यात आनंदी आनंद असेल. वैवाहिक आयुष्यात आनंदाचे क्षण व्यतीत कराल.
कुंभ
कुंभ राशीच्या व्यक्तींना शनी आणि गुरूची वक्री चाल भाग्यदायी ठरेल. या काळात तुमच्या आत्मविश्वास वाढ होईल. गुंतवणूकीतून नफा होईल. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. व्यवसायात हवी तशी प्रगती पाहायला मिळेल. नव्या कामाची सुरुवात होईल. कामातील अडथळे दूर होतील. या राशीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धेत यश मिळेल. यावेळी तुमचे व्यक्तिमत्त्व सुधारेल. तुमचे प्रेमसंबंध चांगले होतील, नात्यात गोडवा येईल. कामाच्या ठिकाणी दिले गेलेले लक्ष्य पूर्ण कराल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील.
(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)