Shani Dev Margi in October: कर्मफल देणारा शनिदेव २३ ऑक्‍टोबरला मार्गी झाला आहे. जेव्हा जेव्हा शनिदेव आपली चाल बदलतात तेव्हा त्याचा परिणाम संपूर्ण जगावर परिणाम होतो. तसेच, त्यांच्या हालचालीचा सर्व राशींवर प्रभाव पडतो. शनिदेव व्यक्तीला कर्मानुसार फळ देतात. तर दुसरीकडे ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेवाने मार्गी होत ‘षष्ठ’ नावाचा राजयोग निर्माण केला आहे. त्यामुळे ३ राशीच्या लोकांना व्यवसायात लाभ आणि करिअरमध्ये प्रगती होत आहे. चला जाणून घेऊया या राशींबद्दल…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वृषभ राशी

शनिदेवाचे मार्गी होणे तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकते. कारण तुमच्या संक्रमण कुंडलीतील नवव्या घराचा स्वामी शनिदेव आहे. ज्याला भाग्याचे स्थान म्हणतात. त्यामुळे यावेळी तुम्हाला प्रत्येक कामात नशिबाची साथ मिळताना दिसत आहे. तसेच शनिदेव हे भाग्य आणि कर्माचे स्वामी आहेत. त्यामुळे तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. दुसरीकडे, जर तुमचा व्यवसाय शनिदेव म्हणजेच लोह, दारू आणि पेट्रोलशी संबंधित असेल तर तुम्हाला चांगले पैसे मिळण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, बृहस्पति म्हणजेच गुरू ग्रह तुमच्या लाभाच्या ठिकाणी स्थित आहे. त्यामुळे तुमचे उत्पन्न वाढू शकते. यावेळी केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे.

( हे ही वाचा: नोव्हेंबर महिन्यात पुन्हा एकाच राशीत भेटणार शुक्र आणि बुध; ‘या’ ४ राशींचे लोक अचानक होऊ शकतात मालामाल)

तूळ राशी

शनिदेवाची उलटी चाल सुरू होताच तुम्हाला कार्यक्षेत्रात आश्चर्यकारक यश मिळू शकते. यासोबतच उत्पन्नाचे स्रोतही वाढू शकतात. दुसरीकडे, शनिदेव तुमच्या संक्रमण कुंडलीतील पाचव्या आणि चौथ्या घराचा स्वामी आहे. त्यामुळे तुमच्या कुंडलीत शश नावाचा राजयोग तयार होत आहे. त्यामुळे दीर्घकाळापासून कर्ज आणि उधारीत अडकलेले पैसेही परत मिळण्याची शक्यता आहे. तसेच यावेळी लांबचा प्रवास फायद्याचा ठरेल. प्रॉपर्टीमध्ये गुंतवणुकीसाठी वेळ अनुकूल आहे. दुसरीकडे, जर तुमची करियर बँकिंग क्षेत्राशी संबंधित असेल, तर हा काळ तुमच्यासाठी चांगला आहे.

मकर राशी

शनिदेव मार्गी झाल्याने तुम्हाला करिअर आणि व्यवसायात चांगले यश मिळू शकते. वरिष्ठ सहकाऱ्यांशी चांगले संबंध प्रस्थापित होऊ शकतात. यासोबतच तुमची प्रतिष्ठा देखील या काळात वाढेल. बेरोजगारांना नवीन नोकरीची ऑफर मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुम्ही आर्थिकदृष्ट्याही मजबूत असाल. त्याचबरोबर तुमच्या राशीवर शनिदेवाचे राज्य आहे. त्यामुळे शनिदेवाचा मार्ग लाभदायक ठरू शकतो.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saturn margi 2022 shanidev made shash rajyog these zodiac sign get more profit gps