Dwidwadash Yog: ज्योतिषशास्त्रामध्ये प्रत्येक ग्रहाच्या राशी परिवर्तनाला आणि नक्षत्र परिवर्तनाला अत्यंत खास मानले जाते. या महिन्यामध्ये बऱ्याच ग्रहांच्या नक्षत्र परिवर्तनामध्ये बदल होईल. त्याचा प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर विविध प्रकारे पाहायला मिळेल. शनीच्या राशी आणि नक्षत्र परिवर्तनालाही खूप खास मानले जाते. शनीची चाल बदलल्यामुळे शनी बुध ग्रहापासून ३० डिग्रीवर असतील, त्यामुळे द्विद्वादश योग निर्माण होईल. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा दोन ग्रह एकमेकांपासून दुसऱ्या किंवा बाराव्या घरात किंवा एकमेकांपासून ३० डिग्रीवर असतात. तेव्हा द्विद्वादश योग निर्माण होतो. या योगाच्या प्रभावाने काही राशींच्या व्यक्तींना खूप चांगले परिणाम पाहायला मिळतील.

ज्योतिषशास्त्रामध्ये शनी आणि बुधाला एकमेकांचे मित्र मानले जाते. सध्या शनी कुंभ राशीमध्ये आणि बुध मकर राशीमध्ये विराजामान आहे. ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ३ वाजून २५ मिनिटांनी शनी आणि बुध एकमेकांपासून ३० डिग्रीवर असतील.

7 February 2025 Mesh To Meen Horoscope
७ फेब्रुवारी राशिभविष्य: इंद्र योगात कर्क, कन्यासह ‘या’ राशींचे बदलणार नशीब? कामात मिळेल भरपूर यश; वाचा तुमचा कसा असेल दिवस
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Mangal Margi 2025
१८ दिवसानंतर बदलणार ‘या’ तीन राशींचे नशीब, मंगळच्या सरळ चालीमुळे धनाने भरेल झोळी; तुमची रास आहे का नशीबवान?
us deportetion of illegal migrants to india
US Deported Indians: अमेरिकेनं परत पाठवलेल्या भारतीयांच्या व्यथा; तरुणी म्हणते, “मी तर लंडनला गेले होते, मेक्सिको बॉर्डरवर…”!
RBI Monetary Policy: RBI cuts repo rate by 25 bps
Good news: गृहकर्ज, वाहनकर्ज स्वस्त होणार; ५ वर्षांनी RBI ची व्याजदर कपात
Aries To Pisces 8th November Horoscope
८ नोव्हेंबर पंचांग : उत्तराषाढा नक्षत्रात रवि योगाचा शुभ संयोग! मेष, वृषभसह ‘या’ ५ राशींना मिळेल प्रत्येक कार्यात भरघोस यश; वाचा तुमचे राशिभविष्य
After Diwali Transit of Venus in Sagittarius will be a sign of prosperity in astrology
दिवाळीनंतर धनाचा दाता शुक्र ग्रह बदलणार चाल! ‘या’ राशींचे उजळणार भाग्य, बँक बॅलन्समध्ये मोठी वाढ होण्याचा योग
Daily Horoscope On 30 October
३० ऑक्टोबर पंचांग: दिवाळीआधीच येईल सोनेरी संधी, आर्थिक बळ वाढेल; कसा जाईल १२ राशींचा बुधवार?

शनी आणि बुध देणार प्रत्येक कामात यश

वृषभ

या राशीच्या दहाव्या घरात शनी आणि नवव्या घरात बुध विराजमान आहे. त्यामुळे या राशीवा द्विद्वादश योग खूप अनुकूल सिद्ध होईल. आयुष्यात आनंदी आनंद येईल. या राशीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धेत यश मिळेल. अचानक धनलाभ संभवतो. कामाच्या ठिकाणी दिले गेलेले लक्ष्य पूर्ण कराल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. या काळात तुम्हाला प्रत्येक कामात हवे तसे यश मिळेल. आयुष्यात मानसन्मान आणि कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल. व्यापारी वर्गाला प्रत्येक कामात यश मिळेल. आरोग्य चांगले राहील.

कुंभ

कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हा योग खूप लकी ठरेल. या काळात तुमच्या भौतिक सुखात वाढ होईल. समाजात मान-सन्मान वाढेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. कुटुंबातही आनंदी आनंद असेल. त्याशिवाय तुम्ही त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लानदेखील कराल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीदेखील हा उत्तम काळ आहे. या काळात करिअरमध्ये यश मिळेल; तसेच प्रमोशनही मिळेल.

मीन

मीन राशीच्या व्यक्तींसाठी द्विद्वादश राजयोग खूप सकारात्मक सिद्ध होईल. तुमच्या भौतिक सुखात वाढ होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. आयुष्यात आनंद निर्माण होईल.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

Story img Loader