Saturn Nakshatra Transit 2024: ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या राशी परिवर्तनासोबत त्यांचे नक्षत्र परिवर्तनदेखील होते. शनी ग्रहाला न्याय आणि कर्माची देवता म्हणून ओळखले जाते. शनी सध्या कुंभ राशीत वक्री झाला असून, १९ ऑगस्ट रोजी शनीने पूर्वा भाद्रपद नक्षत्राच्या पहिल्या चरणामध्ये प्रवेश केला आहे. शनी ३ ऑक्टोबर २०२४ पर्यंत याच नक्षत्रामध्ये राहील. दरम्यान, या काळात काही राशीधारकांना त्याचे शुभ परिणाम पाहायला मिळतील. या काळात त्यांना धन-संपत्तीचे सुख लाभेल.

शनी चमकवणार तुमचे भाग्य (Saturn Nakshatra Transit)

वृषभ

शनीचे नक्षत्र परिवर्तन वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुम्हाला करिअरमध्ये चांगले यश मिळेल. नोकरी, व्यवसायात फायदा होईल. तसेच या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. नोकरदार व्यक्तींना पदोन्नती मिळेल. कुटुंबात सुख-शांतीचे वातावरण असेल. सर्वांसोबत चांगले संबंध निर्माण होतील आणि जुने वाद मिटतील. व्यवसायात आकस्मिक धनलाभ होतील. दूरचे प्रवास घडतील. तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना हवे तसे यश मिळेल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल.

मिथुन

शनीचे नक्षत्र परिवर्तन मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुमची अनेक स्वप्ने पूर्ण होतील. या काळात तुम्हाला तुमच्या भाग्याची साथ मिळेल. नव्या कामाची सुरुवात होईल. कामातील अडथळे दूर होतील. या राशीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धेत यश मिळेल. यावेळी तुमचे व्यक्तिमत्त्व सुधारेल. कामाच्या ठिकाणी दिले गेलेले लक्ष्य पूर्ण कराल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील.

हेही वाचा: येणाऱ्या २९४ दिवसांपर्यंत नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार ऐश्वर्य अन् धन-संपत्ती

कुंभ

शनीचे नक्षत्र परिवर्तन कुंभ राशीच्या व्यक्तींसाठीही अनेक चांगल्या गोष्टी घडवून आणेल. या काळात तुमच्या आयुष्यातील अनेक संकटांवर तुम्ही सहज मात कराल, धन-संपत्तीचे सुख मिळेल. तसेच उत्पन्नाचे नवे स्रोत मिळतील. समाजात मान-सम्मान वाढेल. या काळात तुम्हाला आकस्मिक धनलाभ होतील. करिअरमध्ये चांगले बदल पाहायला मिळतील. अडकलेले पैसे परत मिळतील. नव्या नोकरीची ऑफर मिळेल. कामाच्या ठिकाणी दिले गेलेले लक्ष्य पूर्ण कराल.

(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

Story img Loader