ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा जेव्हा एखादा ग्रह आपली राशी बदलतो. त्यामुळे त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर होतो. तसेच हा बदल काहींसाठी शुभ तर काहींसाठी अशुभ आहे. ग्रहांचा न्यायकर्ता शनिदेव ५ जून रोजी कुंभ राशीत वक्री होणार आहे. वक्री म्हणजे कोणत्याही ग्रहाची विरुद्ध दिशेने होणारी हालचाल, ज्याचा प्रभाव सर्व राशींवर पडेल. परंतु अशा ३ राशी आहेत, ज्यांना यावेळी विशेष आर्थिक लाभ होऊ शकतो. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या ३ राशी.

वृषभ : तुमच्या गोचर कुंडलीतून शनिदेव दहाव्या भावात, ज्याला कर्मक्षेत्र आणि नोकरीचे घर म्हणतात, त्या घरामध्ये वक्री होणार आहे. त्यामुळे या काळात तुमची प्रतिष्ठा आणि सन्मान वाढेल. तसेच यावेळी तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते किंवा तुम्हाला बढती आणि अप्रेजल मिळू शकते. या काळात तुम्ही व्यवसायात चांगली कमाई करू शकता. यासोबतच या काळात तुमची कार्यशैलीही सुधारेल. त्यामुळे कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होऊ शकते. बॉस तुमच्यावर आनंदी असू शकतात. तसेच यावेळी तुम्हाला राजकारणात यशही मिळू शकते. वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे आणि ज्योतिष शास्त्रानुसार शनिदेव आणि शुक्र यांच्यात मैत्रीची भावना आहे. त्यामुळे शनिदेवाची वक्रदृष्टी तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकते.

आणखी वाचा : Budh Uday: ३ जूनला बुधाचा उदय होईल, या ३ राशींचे भाग्य चमकू शकते, लाभाची प्रबळ शक्यता

मकर : शनिदेव मागे वळताच तुमच्यासाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. कारण शनिदेव तुमच्या द्वितीय स्थानात वक्री होणार आहेत. ज्याला पैसा आणि वाणीचा भाव म्हणतात. त्यामुळे या काळात तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. तसेच या काळात तुम्हाला अडकलेले पैसे मिळू शकतात. ज्यांचे करिअर भाषणाशी निगडीत आहे, त्यांच्यासाठीही हा काळ फायदेशीर असणार आहे. त्याचबरोबर वाहन आणि जमीन, मालमत्ता यांच्या खरेदी-विक्रीसाठी काळ चांगला आहे. यावेळी तुम्ही मालमत्ता आणि वाहन खरेदी करण्याचा निर्णय घेऊ शकता. तसंच यावेळी तुम्हाला राजकारणात यश मिळू शकते आणि कोणतेही पद मिळू शकते. जर तुमचा व्यवसाय गुरु ग्रहाशी संबंधित असेल तर तुम्हाला या काळात विशेष लाभ मिळू शकतो. मकर राशीवर स्वतः शनिदेवाचे राज्य आहे. त्यामुळे हा काळ तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. यावेळी तुम्ही लाजवर्त परिधान करू शकता.

आणखी वाचा : Surya Gochar: सूर्य देव करणार मिथुन राशीत प्रवेश, या राशींच्या व्यक्तींचे चांगले दिवस सुरू होतील, प्रत्येक कामात यशाचे योग

मेष: तुमच्या राशीतून ११ व्या भावात शनिदेव वक्री होणार आहेत. ज्याला उत्पन्न आणि नफाचे स्थान म्हणतात. त्यामुळे या काळात तुमचे उत्पन्न चांगले वाढू शकते. यासोबतच उत्पन्नाचे नवे स्रोतही निर्माण होतील. व्यवसायात नवीन नातेसंबंध निर्माण होऊ शकतात. तसंच आपण व्यवसायात नवीन सौदे अंतिम करू शकता. ज्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होऊ शकतो. तसेच व्यवसायात नफाही चांगला राहील. दुसरीकडे जर तुमचा व्यवसाय किंवा करिअर गुरु ग्रहाशी संबंधित असेल तर हा काळ तुमच्यासाठी फायदेशीर आहे. यावेळी तुम्हाला परदेशातूनही चांगले पैसे मिळू शकतात. तसंच जर तुम्ही व्यवसायात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही गुंतवणूक करू शकता. काळ अनुकूल आहे. तुम्ही पुष्कराज घालू शकता, ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल.

Story img Loader