Shani Rahu Yuti 2025: वर्ष २०२५मधील सर्वात मोठे गोचर पार पडले हे आणि त्यामुळे महायुती निर्माण झाली आहे. २९ मार्चला मीन राशीमध्ये शनी ग्रहाने गोचर केल्याने राहू बरोबर युती निर्माण झाली आहे. ज्योतिष्यशास्त्रात २ पापी आणि क्रुर ग्रहांना शनि आणि राहूची युती अशुभ मानले जाते पण हा महासंयोग काही राशींसाठी खूर फायदेशीर ठरणार आहे.

१८ मेनंतर सर्वात मोठे यश

शनी राहूची युती १८ मे २०२५पर्यंत राहणार आहे. १८ मेला राहू गोचर करणार आहे ज्यामुळे युती समाप्त होईल. पण त्याआधी शनी आणि राहूच्या कृपेने ४राशींना बंपर फायदा होणार आहे.

वृषभ राशी (Taurus Zodiac Sign)

शनी राहूची युती वृषभ राशीच्या लोकांसाठी अत्यंत सकारात्मक असणार आहे. या लोकांना मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो. करिअरमध्ये मोठा बदल होणार आहे जो तुम्हाला पद आणि प्रतिष्ठा देणार आहे. दिर्घकाळ थांबलेले कामे अचानक वेगात पूर्ण होईल.

कर्क राशी (Cancer Zodiac Sign)

शनी आणि राहूची युती कर्क राशीच्या लोकांन मोठा लाभ देणार आहे. कर्क राशीच्या लोकांचे लग्न ठरू शकते. कुटुंबात आनंदाचे वातावरण असू शकते. करिअरमध्ये काही समस्या होऊ निर्माण शकते पण शेवटी परिणाम चांगला होईल.

तूळ राशी (Libra Zodiac Sign)

शनी राहूची युती तूळ राशीच्या लोकांना कित्येक गोष्टींमध्ये लाभ देणार आहे. तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल होईल. राहणीमानाचा स्तर उंचावेल, धन-समृद्धी वाढणार आहे. जुने आजार दूर होणार आहेत. तुम्ही वेगात प्रगती कराल. तसेच हा काळ भविष्यातील मोठ्या यशाची पायरी रचण्याचा आहे.

मकर राशी (Capricorn Zodiac Sign)

मकर राशीच्या लोकांसाठी शनि आणि राहूचा संयोग अत्यंत शुभ आहे. शनीच्या गोचरमुळे मकर राशीच्या लोकांची साडेसाती संपली आहे. यामुळे शनिदेवाच्या वक्र दृष्टीमुळे होणारे त्रास संपतील. तुमच्या कारकिर्दीत प्रगती होईल. प्रलंबित काम पूर्ण होईल. तुमच्या संपत्तीत वाढ होईल. तुम्ही काही मोठे यश मिळवू शकता.