Saturn And Surya Conjunction 2023: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी राशी बदलून एकमेकांसोबत युती करतात. ज्याचा परिणाम मानवी जीवनावर दिसून येतो. ही युती काहींसाठी शुभ असते तर काहींसाठी अशुभ ठरते. १३ फेब्रुवारीला सूर्यदेव कुंभ राशीत प्रवेश करत आहेत. जिथे तो आधीच विराजमान असलेल्या शनिदेवाला भेटेल. ज्यामुळे शनि- सूर्य युती तयार होईल. १५ मार्चपर्यंत कुंभ राशीमध्ये शनि- सूर्य युती राहील. ज्याचा परिणाम काही राशींवर दिसून येईल. चला तर मग जाणून घेऊया १५ मार्चपर्यंत कोणत्या राशींना शनि आणि सूर्यदेवाची साथ लाभेल..

मेष राशी

मेष राशीसाठी शनि सूर्य युती फायदेशीर ठरू शकते. या काळात तुम्हाला नोकरीच्या ठिकाणी नवीन पदाची जबाबदारी मिळू शकते. तसंच यावेळी तुम्हाला सहकाऱ्यांचे सहकार्य देखील मिळेल. तसंच या काळात तुम्हाला आर्थिक धनलाभ होण्याची शक्यता दिसत आहे ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल.यासोबतच तुम्ही एखादे नवीन वाहन किंवा मालमत्ता देखील खरेदी करू शकता. तसेच कुटुंबीयांसोबत देखील तुम्ही चांगला वेळ घालवाल.

वृषभ राशी

१५ मार्च पर्यंतचा काळ वृषभ राशीसाठी अत्यंत शुभ असेल. यावेळी अनेक सकारात्मक गोष्टी घडतील. शनि सूर्याच्या युतीमुळे १५ मार्चपर्यंत तुम्हाला धनलाभ होण्याची शक्यता दिसत आहे. तसेच या काळात तुम्हाला मित्राची साथ मिळेल. ज्याच्या मदतीने अनेक रखडलेली कामे मार्गी लागतील. तसंच यावेळी तुम्ही लांबचा प्रवास देखील करू शकता.

( हे ही वाचा: डिसेंबर २०२३ पर्यंत ‘या’ राशी होणार धनवान? शनिदेवाच्या कृपेने तुम्हीही होऊ शकता श्रीमंत)

मिथुन राशी

शनि सूर्याच्या युतीमुळे १५ मार्च पर्यंत मिथुन राशीला धनलाभ होण्याची शक्यता दिसत आहे. या काळात तुम्ही ज्या कामात हात घालाल त्यात तुम्हाला यश मिळेल. तसंच समाजात देखील मानसन्मान मिळेल. याकाळात तुम्हाला उत्पन्न वाढीचे नवीन मार्ग उपलब्ध होतील. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी अनुकूल आहे. तसंच तुमचे वैवाहिक जीवन देखील चांगले राहील.

( वरील बातमी माहिती आणि गृहितके यांवर आधारित आहे)

Story img Loader