Saturn and Sun Yuti 2025: ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याला ग्रहांचा राजा मानले जाते. सूर्याचे प्रत्येक महिन्यात राशी परिवर्तन होते. कुंडलीत सूर्य शुभ असेल, तर व्यक्तीला आयुष्यात आत्मविश्वास, यश, मान-सन्मान, पैसा, पद यांसारख्या बऱ्याच गोष्टी प्राप्त होतात. तसेच सूर्य १२ फेब्रुवारी २०२५ रोजी कुंभ राशीमध्ये प्रवेश करेल आणि १४ मार्चपर्यंत याच राशीत विराजमान राहील. कुंभ राशीत सूर्य-शनी एकत्र आल्याने त्यांची युती निर्माण होईल. जी काही राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत लाभदायी सिद्ध होईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शनी-सूर्याची युती करणार कमाल

कन्या

कन्या राशीच्या व्यक्तींसाठी शनी-सूर्याची युती खूप लाभदायी सिद्ध होणार आहे. . या काळात तुमचा भाग्योदय होईल. मेहनत केलेल्या कामात हवे तसे यश मिळविता येईल. आर्थिक परिस्थिती उत्तम होईल. करिअर आणि व्यवसायात मानासारखे यश प्रस्थापित कराल. मनातील सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. या काळात आई-वडील आणि तुमच्या गुरूंचा आर्शीवाद तुमच्या पाठीशी असेल.

सिंह

सिंह राशीच्या व्यक्तींसाठी शनी-सूर्याची युती अत्यंत फायदेशीर ठरेल. या काळात समस्यांपासून सुटका होईल. ताणतणाव दूर होण्यास मदत होईल, मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. तुमची आर्थिक परिस्थितीही उत्तम राहील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी सहकार्यांकडून मदत मिळेल. अचानक धनलाभ होईल. शत्रूंवर विजय मिळवाल. तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळेल.

धनु

शनी-सूर्याची युती धनु राशीसाठी अनुकूल ठरेल. या काळात तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. या काळात भौतिक सुखाची प्राप्ती होईल. नवीन कार्य सुरू करण्यासाठी अनुकूल काळ आहे. वैवाहिक जीवन सुखमय असेल. या काळात आई-वडील आणि तुमच्या गुरूंचा आर्शीवाद तुमच्या पाठीशी असेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नोकरी मिळण्याचे योग आहेत. व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saturn surya yuti in february these three zodiac signs will be earned money and respect sap