Saturn transit २०२३ Effect: जानेवारी २०२३ पासून काही राशींना शनिच्या साडेसाती पासून सुटका मिळण्याची शक्यता आहे. ज्योतिष शास्त्रानुसार १७ जानेवारी २०२३ च्या रात्री शनि मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करेल. शनीच्या या राशी परिवर्तनामुळे काही राशींचे शनि दोष दूर होतील. म्हणजेच या लोकांना शनीच्या प्रकोपापासून मुक्ती मिळेल आणि अनेक समस्यांपासून मुक्ती मिळेल.
शनिच्या संक्रमणामुळे ३ राशींना होईल प्रचंड लाभ
शनि संक्रमणामुळे ३ राशींना लाभ होण्याची शक्यता आहे. जानेवारी २०२३ मध्ये जेव्हा शनि कुंभ राशीत प्रवेश करेल तेव्हा तूळ आणि मिथुन राशीच्या लोकांना शनिच्या साडेसातीपासून सुटका होईल. तसेच धनु राशीच्या लोकांनाही शनि साडेसातीपासून मुक्ती मिळेल. शनिच्या संक्रमनामुळे या तीन राशींना शनिच्या साडेसातीतून सुटका मिळाल्यानंतर या राशींचे चांगले दिवस सुरू होतील. तसंच या राशींना प्रचंड धनलाभाची संधी मिळू शकेल. या काळात या राशीच्या लोकांच्या मन सन्मानात देखील वाढ होईल. एकंदरीत हा काळ त्यांच्यासाठी खूप अनुकूल असेल.
( हे ही वाचा: डिसेंबर २०२२ पर्यंत ‘या’ ३ राशींना होणार प्रचंड धनलाभ; सूर्यदेवाच्या कृपेने सुरू होतील ‘अच्छे दिन’)
‘या’ राशींना शनिचा त्रास होईल सुरू
ज्योतिषीय गणनेनुसार, शनिच्या संक्रमणानंतर मीन राशीसाठी शनिच्या साडेसातीचा पहिला टप्पा जानेवारी २०२३ पासून सुरू होईल, जेव्हा शनि कुंभ राशीत प्रवेश करेल. यासोबतच मकर आणि कुंभ राशीत शनिची साडेसाती राहील. दुसरीकडे कर्क वृश्चिक राशीच्या लोकांसाठी शनिची धैय्या सुरू होईल.