Shani Asta In Kumbh: २०२३ च्या सुरुवातीला शनिदेवाचे वर्षातील सर्वात महत्त्वपूर्ण गोचर होणार आहे. १७ जानेवारीला शनि कुंभ राशीत गोचर करणार आहे तर यानंतर एका महिन्यातच म्हणजे ३ फेब्रुवारीमध्ये शनिचा अस्त होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा कोणताही ग्रह मार्गक्रमण करतो तेव्हा साहजिकच त्याचा परिणाम हा १२ राशींवर दिसून येतो. शनि हा सर्वात शक्तिशाली ग्रह मानला जात असल्याने शनिच्या कोणत्याही हालचालीला ज्योतिष शास्त्रात विशेष महत्त्व आहे. यंदा फेब्रुवारी २०२३ मध्ये शनि अस्त होताच ३ राशींच्या नशिबाचे दार उघडू शकते. या तीन राशींना अर्थाजनाचे नवनवीन स्रोत उपलब्ध होणार असून येत्या काळात त्यांना खऱ्या अर्थाने अच्छे दिन अनुभवता येऊ शकतात. चला तर मग पाहुयात या नशीबवान तीन राशी कोणत्या व त्यांच्यावर शनि अस्ताचा नेमका काय परिणाम होणार आहे…

Shani Asta 2023 : मकर

मकर राशीत शनि गोचर करून प्रभावकक्षेत दुसऱ्या स्थानावर स्थिर होणार आहे व फेब्रुवारीत याच स्थानी शनि अस्त होईल. यामुळे मकर राशीच्या मंडळींसाठी अनपेक्षित धनलाभाचे योग तयार होत आहेत. तुम्ही दिलेल्या उधारीचे पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. तसेच आपल्याला अर्थाजनाचे नवे मार्गही उघडू शकतात. नोकरदार व व्यावसायिक मंडळींना आर्थिक लाभाच्या प्रबळ संधी आहे. तसेच ज्यांचे काम बोलण्याशी संबंधीत आहे म्हणजेच मीडिया, फिल्म, मार्केटिंग किंवा अन्य क्षेत्र त्यांना हा काळ सुखाचा ठरू शक्ती. शनि देव आपल्या राशीचे स्वामी मानले जातात त्यामुळेच शनि गोचर आपल्यासाठी शुभ ठरू शकते.

Grah Gochar 2025 shukra gochar purva bhadrapad nakshatra
Grah Gochar 2025 : १ फेब्रुवारीपर्यंत फळफळणार ‘या’ राशीच्या लोकांचे नशीब; शुक्राच्या नक्षत्र बदलाने संपत्तीत होईल प्रचंड वाढ, नांदेल सुख समृद्धी
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Surya transit in kumbh
पुढील २८ दिवसानंतर सूर्य करणार मालामाल; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार पद, प्रतिष्ठा अन् पैसाच पैसा
sun shani and shukra grah yuti
पैसा, प्रेम अन् प्रसिद्धी मिळणार; ३० वर्षानंतर सूर्य, शनी आणि शुक्र निर्माण करणार ‘त्रिग्रही योग’; ‘या’ तीन राशींची होणार चांदी
Mangal rashi parivrtan 2024
येणारे ७० दिवस मंगळ करणार कृपा; ‘या’ तीन राशींची होणार चांदी
shani budh yuti 2025 saturn and mercury conjunction today horoscope
Shani-Budh Yuti 2025 : १२ फेब्रुवारीपासून ‘या’ राशींच्या लोकांचे झटक्यात पालटणार नशीब; शनी-बुध संयोगाने मिळणार बक्कळ पैसा अन् जबरदस्त यश
Makar Sankranti 2025
आता नुसता पैसा! मकर संक्रांतीच्यापूर्वी निर्माण होतोय पावरफुल राजयोग, ‘या’ तीन राशींना सूर्यदेव लाखो रुपयांचा धनलाभासह देऊ शकतात आयुष्यभराचे सुख
In 17 days, these three zodiac signs will live a life of luxury and comfort
१७ दिवसांनी ‘या’ तीन राशी जगतील ऐशो-आरामाचे आयुष्य! शुक्र करणार मीन राशीत प्रवेश, नवीन नोकरीमुळे प्रगतीचा योग

Shani Asta 2023 : तूळ

शनिदेवाचे गोचर व अस्त आपल्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकते. तूळ राशीच्या प्रभाव कक्षेत शनिदेव गोचर करून पाचव्या स्थानी विराजमान होणार आहेत, हे स्थान शिक्षण व संतती प्राप्तीशी संबंधित मानले जाते. येत्या काळात या दोन बाबींमध्ये आपल्याला शुभ वार्ता मिळू शकतात. तसेच आपल्याला कार्यस्थळी मान प्राप्तीची संधी आहे. प्रेम संबंध व वैवाहिक समस्या दूर होऊन येणारा काळ आपल्यासाठी मानसिक शांती घेऊन येऊ शकतो. आपल्याला धनप्राप्तीच्याही प्रबळ संधी आहेत, त्यामुळे तूळ राशीच्या मंडळींसाठी येत्या फेब्रुवारीत खऱ्या अर्थाने सुखाची सुरुवात होऊ शकते.

हे ही वाचा>> २०२३ मध्ये ‘या’ ३ राशींना श्रीमंतीचे प्रबळ योग; शनि साडेसातीने उजळू शकते नशिबाचे दार, तुमची रास काय सांगते?

Shani Asta 2023: वृषभ

शनि देव कुंभ राशीत गोचर करतानाच वृषभ राशीत मंगळाचे गोचर होणार आहे, त्यामुळे सुरुवातीचा एक महिना आपल्याला किंचित समस्या जाणवू शकतात मात्र शनि अस्त होताच आपल्या नशिबाचे दार उघडू शकते. शनिदेव आपल्या राशीत दहाव्या भावी स्थिर होणार आहे, वृषभ राशीच्या मंडळींना नोकरीचे नवे प्रस्ताव मिळू शकतात.

हे ही वाचा>> ४७ वर्षांनी मंगळ वक्रीने तयार झाला अत्यंत अशुभ योग; महिनाभर ‘या’ ४ राशींनी ‘धन’ व ‘भान’ जपले नाहीतर…

कामाच्या ठिकाणी तुम्ही सर्वात विश्वसनीय ठरू शकता, नव्या जबाबदाऱ्यांसह आपल्याला नव्याने आर्थिक लाभ मिळण्याची संधी आहे. फेब्रुवारीच्या ३ तारखेपासून आपल्याला शुभ काळ सुरु होऊ शकतो.

(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीच्या आधारे देण्यात आला आहे)

Story img Loader