Shani Sade Sati In 2023: ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा एखादा ग्रह इतर राशींमध्ये प्रवेश करतो तेव्हा त्या राशीतील इतर ग्रहांच्या युतीने अनेक योग बनायला सुरुवात होते. याचा थेट प्रभाव मानवी जीवनावर दिसून येतो. सर्व ग्रहांमध्ये शनिचे संक्रमण अत्यंत महत्त्वाचे मानले जाते, कारण शनिच्या चालीवरून कोणत्या राशीची साडेसाती सुरु होईल याविषयी माहिती मिळते. ज्योतिषशास्त्रानुसार अशा तीन राशी आहेत ज्यांच्यावर शनिच्या साडेसातीचा वाईट परिणाम अनेकदा सकारात्मक होतो. या राशी शनिच्या आवडत्या राशी म्हणूनही ओळखल्या जातात. येत्या नववर्षात शनि गोचरसह काही राशींची साडेसाती सुरु होणार आहे यावेळी तुमच्या राशिवर परिणाम होणार का हे जाणून घ्या.

मकर

ज्योतिष शास्त्र सांगते की, शनिदेव हे मकर व कुंभ या दोन राशीचे स्वामी आहेत. शनि गोचरासह नववर्षात मकर राशीच्या व्यक्तींना शनिच्या साडेसातीचा लाभ होण्याचे संकेत आहेत.

Malavya rajyog in meen
शुक्र देणार गडगंज श्रीमंती! मालव्य राजयोगाच्या प्रभावाने ‘या’ तीन राशींवर होणार देवी लक्ष्मीची कृपा
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
sun shani and shukra grah yuti
पैसा, प्रेम अन् प्रसिद्धी मिळणार; ३० वर्षानंतर सूर्य, शनी आणि शुक्र निर्माण करणार ‘त्रिग्रही योग’; ‘या’ तीन राशींची होणार चांदी
Samsaptak RajYog in kundli
आता नुसता पैसा! सूर्य-मंगळ निर्माण करणार समसप्तक राजयोग; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना होणार आकस्मिक धनलाभ
Mangal rashi parivrtan 2024
येणारे ७० दिवस मंगळ करणार कृपा; ‘या’ तीन राशींची होणार चांदी
Budh, Shani & Surya Align After 100 Years!
१०० वर्षानंतर बुध, शनि अन् सूर्याचा एकत्र संयोग, या तीन राशींना प्रचंड धनलाभ, मिळणार अपार पैसा
shani budh yuti 2025 saturn and mercury conjunction today horoscope
Shani-Budh Yuti 2025 : १२ फेब्रुवारीपासून ‘या’ राशींच्या लोकांचे झटक्यात पालटणार नशीब; शनी-बुध संयोगाने मिळणार बक्कळ पैसा अन् जबरदस्त यश
Makar Sankranti 2025
आता नुसता पैसा! मकर संक्रांतीच्यापूर्वी निर्माण होतोय पावरफुल राजयोग, ‘या’ तीन राशींना सूर्यदेव लाखो रुपयांचा धनलाभासह देऊ शकतात आयुष्यभराचे सुख

कुंभ

जेव्हा शनी एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये तिसऱ्या, सहाव्या, आठव्या आणि बाराव्या घरात आणि उच्च स्थानी असेल तरी शनि प्रदोष आपल्याला धोक्याचे ठरण्याची शक्यता नसते. शनि सध्या कुंभ राशीतच विराजमान आहेत त्यामुळे येत्या काळात साडेसाती असूनही कुंभ राशीच्या व्यक्तींना लाभ होण्याची चिन्हे आहेत.

तूळ

शनि देवांचा प्रभाव तुळ राशीत सकारात्मक दिसून येतो. कारण ही शनिची उच्च रास मानली जाते. तूळ राशीतील ग्रह-नक्षत्रांची दशा पाहता या राशीच्या मंडळींवर शनीचा वाईट प्रभाव पडण्याची शक्यता कमी आहे.

हे ही वाचा>> Vastu Shastra: पती पत्नीने एका ताटात का जेवू नये? भीष्म पितामह यांनी महाभारतात दिलेलं उत्तर पाहा

शनि हा अत्यंत कमी वेगाने संक्रमण करणारा ग्रह आहे. याच कारणामुळे शनिचा प्रभाव हा किमान अडीच ते साडेसात वर्षांपर्यंत कायम राहतो. एखाद्या राशीत जेव्हा शनी संक्रमण होते तेव्हा शनिदेव निदान अडीच वर्ष तिथे स्थिर असतात अशा प्रकारे १२ राशींचे संक्रमण पूर्ण करण्यासाठी शनिला ३० वर्षांचा काळ लागतो. येत्या १७ जानेवारी पासून शनि संक्रमण होऊन काही राशींचा भाग्योदय होणार आहे तर काहींना संकटांच्या झाला सोसाव्या लागू शकतात.

(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीच्या आधारे देण्यात आला आहे)

Story img Loader