Shani Sade Sati and Shani Dhaiya: २९ एप्रिल २०२२ पासून शनि स्वतःच्या राशीत मकर, कुंभ आणि नंतर मकर नंतर पुन्हा कुंभ राशीत प्रवेश करेल. जिथे तो २९ मार्च २०२५ पर्यंत राहणार आहे. शनि ५ जून रोजी प्रतिगामी झाला आहे, जो २३ ऑक्टोबरपर्यंत या प्रतिगामी स्थितीत होता आणि आता मकर राशीत प्रवास करत आहे. शनिच्या या स्थितीमुळे २०२५ पर्यंत ३ राशीच्या राशीच्या लोकांना काळजी घ्यावी लागेल. चला जाणून घेऊया या राशींबद्दल…
कुंभ राशी
२९ एप्रिल २०२२ रोजी, शनिने कुंभ राशीत गोचर केला होता. त्यानंतर ५ जून रोजी, शनि त्याच राशीत मागे जाईल; त्यानंतर १२ जुलै रोजी प्रतिगामी शनिने मकर राशीत प्रवेश केलाता. आता १७ ते १८ जानेवारी २०२३ रोजी शनि कुंभ राशीत प्रवेश करेल, जिथे तो २०२५ पर्यंत राहील. २०२५ सालापर्यंत तुम्हाला तुमच्या आयुष्यात चढ-उतार दिसतील. यानंतर जीवन सामान्य होईल परंतु २३ फेब्रुवारी २०२८ रोजी तुम्हाला शनिपासून आराम मिळेल.
(हे ही वाचा: 2023 Horoscope: १२ राशींसाठी येणारे २०२३ हे नवीन वर्ष कसे असेल? जाणून घ्या वार्षिक राशीभविष्य)
मीन राशी
२९ एप्रिल २०२२ रोजी जेव्हा शनिने कुंभ राशीत प्रवेश केला होता, तेव्हापासून मीन राशीच्या लोकांवर शनिची साडेसाती सुरू झाली होती. २९ मार्च २०२५ रोजी कुंभ राशीतील शनिच्या संक्रमणापासून तुम्हाला थोडासा दिलासा मिळेल. तसंच ही साडेसती १७ एप्रिल २०३० पर्यंत मीन राशीत राहील. साडेसतीचा पहिला टप्पा तुमच्यासाठी सुरू झाला आहे.
मकर राशी
मकर राशीसाठी २६ जानेवारी २०१७ रोजी शनिची साडेसती सुरू झाली असून, मकर राशीच्या लोकांना २९ मार्च २०२५ रोजी शनिच्या साडेसतीपासून मुक्ती मिळेल. दुसरीकडे, १७ जानेवारी २०२३ रोजी धनु राशीच्या लोकांना शनिच्या साडेसातीपासून पूर्ण मुक्ती मिळेल.
( हे ही वाचा: पुढील ४ महिने ‘या’ राशींसाठी असतील अत्यंत शुभ; २०२३ वर्ष घेऊन येईल प्रचंड धनलाभाची संधी)
साडेसतीचे टप्पे: साडेसतीचा शेवटचा टप्पा मकर राशीत असेल, दुसरा टप्पा कुंभ राशीत आणि पहिला टप्पा मीन राशीत असेल. कुंभ राशीच्या लोकांसाठी तो काळ सर्वात त्रासदायक असेल. कारण ज्योतिषशास्त्रानुसार दुसरा टप्पा सर्वात वाईट मानला जातो.
शनिची धैय्या
Shani In Kumbha Rashi: २९ एप्रिल २०२२ रोजी कुंभ राशीत शनिचे आगमन झाल्यामुळे कर्क आणि वृश्चिक राशीवर शनि धैय्याचा प्रभाव सुरू झाला आहे. २०२४ मध्येच त्यांची यातून सुटका होईल. दुसरीकडे, १७ जानेवारी २०२३ पासून शनि मार्गी असल्यामुळे तूळ आणि मिथुन राशीच्या लोकांवर शनि धैयाचा प्रभाव पूर्णपणे संपुष्टात येईल. २४ जानेवारी २०२० पासून तूळ राशीत शनिची ग्रहस्थिती सुरू आहे.