Saturn transit in rahu nakshatra: ज्योतिषशास्त्रानुसार शनी सध्या त्याच्या कुंभ राशीत विराजमान असून शनी वक्री चालत आहे. शनीचे राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन नेहमीच खूप खास मानले जाते. २०२५ मध्ये शनी राशी परिवर्तन करणार असून लवकरच शनी नक्षत्र परिवर्तन करणार आहे. शनीचे हे नक्षत्र परिवर्तन काही राशींच्या व्यक्तींसाठी शुभ तर काही राशींच्या व्यक्तींसाठी अशुभ फळ देणाके ठरेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ज्योतिषशास्त्रानुसार, शनी सध्या गुरू ग्रहाच्या पूर्व भाद्रपद नक्षत्रामध्ये असून तो ३ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजून १० मिनिटांनी राहूच्या शतभिषा नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे. तसेच या नक्षत्रामध्ये शनी २६ डिसेंबरपर्यंत राहील. शनीचा राहूच्या नक्षत्रातील शुभ प्रभाव काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल.

शनीचे नक्षत्र परिवर्तन करणार मालामाल

मेष

शनीच्या नक्षत्र परिवर्तनाने मेष राशीच्या व्यक्तींना विशेष लाभ होईल. या काळात तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील. या काळात नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवी नोकरी मिळण्याची शक्यता दाट आहे. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांची मदत मिळेल. प्रत्येक कामात कुटुंबीयांची साथ मिळेल. व्यवसायात चांगली प्रगती होईल. अडकलेली कामे पूर्ण होतील. स्पर्धा परिक्षेची तयार करणाऱ्यांना मेहनतीचे फळ मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत असेल. भौतिक सुख प्राप्त कराल.

सिंह

शनीच्या नक्षत्र परिवर्तनाने सिंह राशीत्या व्यक्तींना भाग्याची साथ मिळेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. भाग्याची साथ मिळेल. प्रत्येक कामात यश मिळेल. अडकलेली कामे पूर्ण होतील. बौद्धिक क्षमतेत वाढ होईल. कर्ज फेडण्यास मदत होईल. धार्मिक कार्यात मन रमेल. अडकलेले पैसे परत मिळतील. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणात येणारे अडथळे दूर होतील. दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. प्रेमसंबंध सुखमय होतील. दूरचे प्रवास घडतील. मनातील इच्छा पूर्ण होतील.

हेही वाचा: नुसता पैसा; शनीच्या राशी परिवर्तनाच्या प्रभावाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींच्या व्यवसायात आणि नोकरीत होणार भरभराट

कुंभ

शनीच्या नक्षत्र परिवर्तनाने राशीच्या व्यक्तींना कुंभ राशीच्या व्यक्तींना अनेक शुभ परिणाम पाहायला मिळतील. या काळात तुमचे मानसिक आरोग्य चांगले राहील. तुमच्या आत्मविश्वासामध्ये वाढ होईल. समाजात मान-सन्मान वाढेल. मोठ्या प्रमाणात धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. वैवाहिक जीवन सुखमय राहील. अविवाहांसाठी लग्नाचे प्रस्ताव येतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. मनातील सर्व इच्छा पूर्ण होईल. तुमच्या आयुष्यात आनंदी आनंद येईल.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saturn transit in rahu nakshatra the persons of these three zodiac signs will get respect and money sap