Shani Vakri Effect 2023: ज्योतिष शास्त्रानुसार शनी हा सर्वात संथ गतीने चालणारा ग्रह मानला जातो. शनीचे एक गोचर किमान अडीच वर्षांनी पूर्ण होते. यंदा १७ जानेवारीला ३० वर्षांनी कुंभ राशीमध्ये शनीने प्रवेश घेतला आहे. तर आता तब्बल सहा महिन्यांनी म्हणजे १७ जून ला कुंभ राशीतच शनिदेव वक्री होणार आहेत. या अवस्थेत शनिदेव ४ नोव्हेंबरपर्यंत राहणार आहेत. या कालावधीत शनीदेव केंद्र त्रिकोण राजयोग तयार करणार आहेत. ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार, जेव्हा कुंडलीमध्ये ३, ४, ७, १० व १, ५, ९ मध्ये त्रिकोण स्थानी शनिदेव सक्रिय होतात तेव्हा केंद्र त्रिकोण राजयोग तयार होत असल्याचे मानले जाते.

केंद्र त्रिकोणात माता लक्ष्मी ही त्रिकोण देवी व भगवान विष्णू हे केंद्रीय देवता मानले जातात यामुळेच ज्या व्यक्तीच्या कुंडलीत असा राजयोग तयार होतो, त्याचे भाग्य रातोरात उजळण्याची शक्यता असते. येत्या महिन्याभरात या केंद्र त्रिकोण राजयोगाने नक्की कोणत्या राशीला धनलाभ होण्याची संधी आहे हे पाहूया…

Anna Sebastian Perayil, EY,
शहरबात… ॲनाच्या मृत्यूच्या निमित्ताने…
china biggest dam in the world
चीनमधील ‘या’ अवाढव्य धरणामुळे पृथ्वीचा वेग मंदावला? धरणाचा…
9 out of 10 people make losses in F&Os according to a report by capital markets regulator SEBI
‘एफ अँड ओ’मध्ये १० पैकी ९ जण तोट्यात; भांडवली बाजार नियंत्रक सेबीच्या अहवालातून धक्कादायक वास्तव उघड
transplant artificial limb for injured cow in mumbai
जखमी गायीला कृत्रिम पाय; प्रत्यारोपणाची पहिली आणि यशस्वी शस्त्रक्रिया
shukra gochar 2024 after 4 days Venus enter in Libra
४ दिवसांनंतर नुसता पैसा; शुक्र करणार तूळ राशीत प्रवेश ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींवर असणार देवी लक्ष्मीची कृपा
illegal migration in parts of Jharkhand
Bangladeshis marrying Jharkhand tribal women: बांगलादेशी नागरिक झारखंडच्या आदिवासी महिलांशी लग्न करतायत? भाजपाच्या दाव्याला केंद्रीय गृहखात्याची चपराक
contract teachers, agitation ,
कंत्राटी शिक्षक नियुक्तीच्या निर्णयावर टीकेची झोड, निर्णय रद्द न केल्यास आंदोलनाचा इशारा
Trigrahi Yog 2024
Trigrahi Yog 2024 : ५० वर्षानंतर कन्या राशीमध्ये बनतोय त्रिग्रही योग, ‘या’ तीन राशीच्या लोकांना मिळणार अपार पैसा

शनीदेव ‘या’ राशींना बनवणार का करोडपती?

वृषभ रास (Taurus Zodiac)

ज्योतिष शास्त्रानुसार शनी कुंभ राशीत वक्री होताच नोकरीमध्ये सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे, या काळात आपल्याला उत्तम नोकरीच्या संधी मिळू शकतात. तसेच सुख समृद्धी, व राजेशाही थाट अनुभवता येऊ शकतो. या महिन्याभरात आपलायला गुंतवणुकीबवर भर देण्याची गरज आहे. ऑफिसमध्ये तुमच्या खांद्यावर एक नवी जबाबदारी टाकली जाऊ शकते. मिळकतीत वाढ होण्याची संधी आहे.

मिथुन रास (Gemini Zodiac)

शनीचा कुंभ राशीत वक्री मार्ग हा मिथुन राशीला भाग्योदयाचा काळ अनुभवण्याची संधी देऊ शकतो. आपल्या कुंडलीत नवव्या स्थानी केंद्र त्रिकोण राजयोग तयात होत आहे. यामुळे आपल्याला नशिबाची साथ मिळू शकते. आपल्या कुंडलीत लांबच्या प्रवाशाची चिन्हे दिसत आहेत. भविष्यामध्ये फायदेशीर यथारतील असे काही निर्णय आपल्याला या काळात घ्यावे लागू शकतात. तुम्हाला एखाद्या नव्या विषयाचा अभ्यास करावा लागू शकतो.

हे ही वाचा<< बुधदेव पाच दिवसांनी ‘या’ राशींना संपत्तीने करतील समृद्ध? बक्कळ धनलाभाची संधी, त्याहून जास्त ‘हा’ फायदा…

सिंह रास (Leo Zodiac)

ज्योतिष शास्त्रानुसार सिंह राशीला शनी वक्री अत्यंत फायदेशीर ठरू शकते. तुम्ही सातत्याने घेतलेल्या कष्टाचे गोड फळ आपल्याला या काळात मिळू शकते. आपल्या कुंडलीत सहाव्या स्थानी शनीचे स्वामित्व आहे. येत्या काळात तुम्ही शक्य तितकी बचत करणाऱ्यावर भर द्यायला हवा. प्रदीर्घ काळ त्रास देणाऱ्या आजारातून सुटका मिळू शकते. नोकरदार मंडळींना पगारवाढीचे संकेत आहेत.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)