Shani Vakri 2024: ज्योतिष शास्त्रात शनि ग्रहाला विशेष महत्वपूर्ण मानले जाते. असे म्हणतात की, शनिदेव जेव्हा एखाद्यावर प्रसन्न होतात, तेव्हा ते त्याला राजा बनवतात. ज्योतिष शास्त्रात सांगितले आहे की, सर्व ग्रह एका ठराविक काळानंतर आपली चाल चालतात. याचा सर्व राशींवर नकारात्मक किंवा सकारात्मक प्रभाव पडतो. ज्योतिषशास्त्रात शनिला कर्मदेवता म्हटलं आहे. शनि प्रत्येकाला आपल्या कर्मानुसार त्याचे फळ देतो. शनीला एका विशिष्ट राशीत आपला प्रवास पूर्ण करण्यासाठी अडीच वर्षे लागतात आणि म्हणूनच सर्व राशींमध्ये आपला प्रवास पूर्ण करण्यासाठी सुमारे ३० वर्षे लागतात. आता शनि लवकरच आपली चाल बदलणार आहे. जून महिन्यात कुंभ राशीत वक्री होणार आहेत. शनीचं उलट्या गतीने होणारे मार्गक्रमण १३९ दिवस काही राशींसाठी खूप लाभदायी ठरु शकते. चला तर जाणून घेऊया भाग्यशाली राशी कोणत्या…

‘या’ राशींवर शनिदेवाची कृपा?

मेष राशी

मेष राशींच्या लोकांवर शनिदेवाची विशेष कृपा राहू शकते. या राशीच्या लोकांची व्यवसायाच्या क्षेत्रात प्रगती होण्याची शक्यता आहे. व्यापारात वाढ होऊ शकते. बराच काळ अडकलेला पैसा या काळात परत मिळू शकतो. आरोग्याच्या बाबतीत तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहून उत्साही राहू शकता. या काळात तुम्हाला परदेशातूनही आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला नवीन नोकरी देखील मिळू शकेल. तुम्हाला अचानक मोठा धनलाभ होऊ शकतो.

Mangal Rashi Parivartan 2024
४२ दिवसानंतर नुसता पैसा; मंगळाच्या राशी परिवर्तनाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्ती होणार भाग्यवान
Daily zodiac sign horoscope For 17 December 2024
१७ डिसेंबर पंचांग: १२ पैकी ‘या’ राशींचे प्रगतीच्या…
Shani Budh Yuti 2025 astrology
Shani Budh Yuti 2025 : नवीन वर्षात सोन्याचा हंडा घेऊन लक्ष्मी ठोठावेल ‘या’ राशींच्या मंडळींचे दार? शनी-बुधाच्या संयोगाने होऊ शकाल लखपती
Gajakesari Raja Yoga
१३ डिसेंबरपासून ‘या’ तीन राशींना मिळणार भरपूर पैसा; गजकेसरी राजयोगाच्या प्रभावाने आयुष्यात येणार धनसंपत्तीचे सुख
navpancham yog in kundali
शुक्र-गुरू बनवणार नवपंचम राजयोग; ‘या’ तीन राशींना मिळणार पैसाच पैसा
Mars Gochar 2024
पुढील ११० दिवस मंगळ देणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार संपत्तीचे सुख अन् प्रत्येक कामात यश
Saturn-Venus gochar 2024
आजपासून शनी-शुक्र देणार नुसता पैसा ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य
budh uday 2024
१२ डिसेंबरपासून नुसता पैसा; बुध ग्रहाचा उदय ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना देणार धन-संपत्तीचे सुख

(हे ही वाचा : त्रिग्रही योग बनल्याने ‘या’ ५ राशींना होणार अपार धनलाभ? ३ ग्रहांच्या युतीने लक्ष्मी येऊ शकते दारी)

वृषभ राशी

वृषभ राशीच्या लोकांना शनिदेवाच्या कृपेने मोठा फायदा होऊ शकतो. करिअरमध्ये प्रगती होऊ शकते. या राशीच्या लोकांना त्यांच्या व्यवसायात मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला विविध क्षेत्रात चांगल्या संधी मिळू शकतात. आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. विद्यार्थी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढू शकते.

वृश्चिक राशी

वृश्चिक राशींच्या लोकांना शनिदेवाच्या कृपेने मोठा धनलाभ होऊ शकतो. कोणत्याही गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होऊ शकतो. नवीन घर किंवा मालमत्ता खरेदी करण्याचे योग जुळून येऊ शकतात. तुमच्या बँक बॅलन्समध्येही चांगली वाढ होऊ शकते. अविवाहित आहेत त्यांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात. या राशीच्या लोकांची सर्व प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader