Shani Uday 2024: ज्योतिषशास्त्रानुसार, नऊ ग्रहांमध्ये शनिला विशेष स्थान आहे. शनिदेव हा न्याय देवता म्हणून ओळखला जातो. शनि प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतो. हा सर्वात संथ चालणारा ग्रह आहे आणि सुमारे अडीच वर्षे एका राशीत राहतो. शनिदेवाच्या शुभ प्रभावामुळे माणसाच्या जीवनात मोठे आणि चांगले बदल दिसून येतात. प्रत्येक राशीसाठी शनिची स्थिती खूप महत्त्वाची असते. आता येत्या मार्च महिन्यात शनिदेवाचा उदय होणार आहे. फेब्रुवारी महिन्यात शनि अस्त होणार असून त्यानंतर मार्च २०२४ मध्ये शनीचा उदय होणार आहे. त्यामुळे काही राशींना सुख, समृध्दी, अपार धन मिळण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया शनिदेवाच्या उदयामुळे कोणत्या राशींच्या व्यक्तींना फायदा होऊ शकतो.
‘या’ राशींना मिळणार बक्कळ पैसा?
मेष राशी (Aries Zodiac)
ज्योतिषशास्त्रानुसार, शनिच्या उदयामुळे मेष राशींच्या लोकांचे सुखाचे दिवस सुरु होऊ शकतात. करिअर आणि व्यवसायात प्रचंड लाभ मिळण्याची शक्यता आहे. शनिदेवाच्या कृपेने विविध समस्यांपासून मुक्ती मिळू शकते. प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. या काळात बेरोजगारांना नवीन नोकरी मिळू शकते. भागीदारीत केलेल्या व्यवसायात भरपूर यश आणि नफा मिळू शकतो. तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात. अविवाहित आहेत त्यांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. यावेळी तुम्हाला सन्मान आणि प्रतिष्ठा प्राप्त होऊ शकते.
(हे ही वाचा : ५०० वर्षांनी ‘नवपंचम राजयोग’ बनल्याने पैशाच्या बाबतीत अत्यंत भाग्यवान ठरतील ‘या’ राशी? गडगंज श्रीमंती कोणाच्या नशिबात?)
सिंह राशी (Leo Zodiac)
सिंह राशीच्या लोकांसाठी शनिची स्थिती लाभदायक ठरु शकते. तुम्हाला मुलांशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते. तुम्हाला आर्थिक बाबींमध्ये फायदा होऊ शकतो. नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत त्यांना उत्कृष्ट संधी मिळू शकतात. या काळात तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीचा लाभही मिळू शकतो. तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहण्याची शक्यता आहे. मालमत्तेसंदर्भातही आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. जुन्या गुंतवणुकीतून मोठ्या प्रमाणात धनलाभ होऊ शकतो.
कुंभ राशी (Aquarius Zodiac)
ज्योतिषशास्त्रानुसार, शनिच्या उदयामुळे कुंभ राशीच्या लोकांच्या जीवनात मोठे बदल होऊ शकतात. तुमच्या सर्व मनोकामना शनिदेवाच्या कृपेने पूर्ण होऊ शकतात. नोकरी व्यवसायात घवघवीत यश तुम्हाला मिळू शकतो. बरेच दिवस अडकलेले पैसे तुम्हाला या काळात परत मिळू शकतात. उत्पन्नाचे नवे स्रोत तुम्हाला लाभण्याची शक्यता आहे. सुख सुविधांमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला तुमचा इच्छित जोडीदार मिळण्याची शक्यता आहे. समाजात तुमचा मान सन्मान वाढू शकतो.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)