Saturn Vakri 2025: २०२५ मध्ये अनेक मोठ्या ग्रहांचे राशी परिवर्तन होईल, ज्याचा शुभ प्रभाव १२ राशींपैकी काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल. २०२५ मध्ये शनीचे राशी परिवर्तनही अत्यंत खास मानले जाईल. शनी जुलैमध्ये उलटी चाल चालेल. तो जवळपास १३८ दिवस मीन राशीमध्ये उलटी चाल चालेल, ज्याचा काही राशींच्या व्यक्तींवर अत्यंत शुभ प्रभाव पाहायला मिळेल.
शनी करणार मालामाल
मिथुन
मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी शनीची उलटी चाल खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. तुमची अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. समाजात मान-सन्मान वाढेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. तुमची आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल.
मकर
मकर राशीच्या व्यक्तींसाठीही शनीची उलटी चाल अत्यंत लाभदायी ठरेल. या काळात तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल. मनातील इच्छा पूर्ण होतील. या काळात तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल. जोडीदाराकडून आनंदी वार्ता मिळेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी चांगले यश मिळेल. तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल.
हेही वाचा: शनीच्या कृपेने येणार गडगंज श्रीमंती; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार प्रेम, पैसा अन् प्रतिष्ठा
कुंभ
कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी शनीची उलटी चाल अनेक लाभ घेऊन येईल. या काळात तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. या काळात तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. प्रेमसंबंध सुखमय होतील आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. त्यांच्यासोबत दूरचे प्रवास घडतील.
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)