Trigrahi Yog in Meen: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह एका ठरावीक काळानंतर भ्रमण करतात आणि त्यामुळे काही योग निर्माण होतात. राशीनुसार हे योग काहींसाठी शुभ, तर काहींसाठी अशुभ ठरतात. आता ७ मे रोजी ग्रहांचा राजकुमार बुध आपली राशी बदलून मेष राशीत प्रवेश करील. अशा परिस्थितीत ७ मेपासून शुक्र, शनी व राहू मीन राशीत राहतील. त्यामुळे मीन राशीमध्ये एक शक्तिशाली त्रिग्रही योग तयार होत आहे. हा योग १८ मेपर्यंत राहील. हा त्रिग्रही योग फार शक्तिशाली असणार आहे. या योगामुळे काही राशींच्या लोकांना सकारात्मक परिणामांचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. त्यांच्या आर्थिक लाभाची चिन्हे दिसत आहेत. जाणून घेऊ कोणत्या राशींच्या व्यक्तींना या राजयोगामुळे लाभ होऊ शकतो.
त्रिग्रही योगामुळे ‘या’ राशींच्या लोकांचा बँक बॅलन्स होणार दुप्पट?
वृषभ
त्रिग्रही योग वृषभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. या काळात तुम्हाला व्यवसायात उत्तम यश मिळू शकतो. करिअरबद्दल बोलायचे झाले, तर तुम्हाला तुमच्या कामात प्रसिद्धी मिळू शकते. नोकरदार लोकांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळू शकते. आर्थिक लाभासोबत उत्पन्नाचे नवे स्रोत उघडू शकतात. अविवाहित लोकांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो. तुम्हाला तुमच्या वडिलांकडून पूर्ण सहकार्य मिळू शकते.
धनू
त्रिग्रही योगाची निर्मिती धनू राशीच्या लोकांसाठी शुभ आणि फलदायी ठरू शकते. या काळात नशीब तुम्हाला साथ देऊ शकते. तुम्ही पैशांची बचत करण्यात यशस्वी होऊ शकाल. स्पर्धात्मक विद्यार्थ्यांना कोणत्याही परीक्षेत यश मिळू शकते. करिअरबाबत तुम्हाला तुमच्या कामात प्रसिद्धी मिळू शकते. या राशीच्या लोकांना अनेक नवीन प्रकल्प मिळू शकतात. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबात धार्मिक किंवा शुभ कार्यक्रम होऊ शकतो. सासरच्या लोकांकडून तुम्हाला खूप आदर मिळेल.
कुंभ
त्रिग्रही योगाची निर्मिती कुंभ राशीच्या लोकांसाठी शुभ सिद्ध होऊ शकते. या काळात नोकरी आणि व्यवसायात चांगली प्रगती होऊ शकते. वडीलधाऱ्यांच्या मदतीने तुम्ही अनेक क्षेत्रांत यश मिळवू शकता. यावेळी तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. नोकरदारांना नोकरीमध्ये यश मिळू शकते. प्रदीर्घ प्रलंबित कामे मार्ग लागणार असून, तुमच्या बँक बॅलन्समध्ये वाढ होऊ शकते. तुम्ही कोणत्याही धार्मिक किंवा सामाजिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून, ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)