Conjunction of saturn and venus: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन होते. ज्यामुळे अनेकदा दोन किंवा त्याहून अधिक ग्रह एकाच राशीत आल्याने त्यांची मित्र किंवा शत्रू ग्रहाबरोबर युती निर्माण होते. येत्या काही दिवसात कर्मफळदाता शनी आणि धन-संपत्तीचा कारक ग्रह शुक्र यांची युती निर्माण होणार आहे. ज्याच्या प्रभावाने काही राशींच्या व्यक्तींचे भाग्य चमकेल.
शनी-शुक्र करणार सर्व इच्छा पूर्ण
मिथुन
मिथुन राशींच्या व्यक्तींसाठी शुक्र आणि शनीचा संयोग खूप अनुकूल सिद्ध होईल. हा संयोग मिथुन राशीच्या कर्म भावात असेल. त्यामुळे या काळात तुम्हाला नोकरी, व्यवसायात चांगली प्रगती पाहायला मिळेल. उच्च शिक्षण प्राप्त करण्याची संधी प्राप्त कराल. स्पर्धा परिक्षेत हवे तसे यश मिळवता येईल. वडिलांची मदत मिळेल. अनेक इच्छा पूर्ण होतील. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल.
मकर
शुक्र आणि शनीचा संयोग मकर राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत लाभदायी सिद्ध होईल. ही युती मकर राशीच्या तिसऱ्या घरात निर्माण होईल. या काळात तुमच्या साहस आणि पराक्रमात वाढ होईल. व्यवसायात यश मिळेल. खर्चांवर नियंत्रण मिळवाल. भावडांचा सहवास लाभेल. आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे आणि शांतीचे वातावरण राहिल. वाहन, स्थावर मालमत्ता खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होईल. वैवाहिक आयुष्यात गोडवा निर्माण होईल.
कुंभ
शुक्र-शनीचा संयोग कुंभ राशीच्या व्यक्तींसाठीदेखील खूप फायदेशीर ठरेल. या काळात तुमच्या आयुष्यात नवीन लोक येतील. अविवाहितांचे लग्न जुळेल. आरोग्य चांगले राहिल. मानसिक शांती मिळेल, पगारवाढ होईल. गुंतवणूक करणे देखील खूप फायदेशीर ठरेल. कुटुंबीयांसोबतचे नाते अधिक घट्ट होईल. आरोग्य उत्तम राहील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. प्रेमसंबंध सुखमय होतील.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)