Ardhakedra Yog: ज्योतिषशास्त्रामध्ये शनी आणि शुक्र ग्रहाला खूप महत्वपूर्ण मानले जाते. शनी न्यायप्रिय असून तो व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतो. तर शुक्र ग्रहाला भौतिक सुखाचा कारक ग्रह म्हटले जाते. ज्या व्यक्तींच्या कुंडली शुक्र शुभ स्थितीत असतो अशा व्यक्तीला आयुष्यात कधीच आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागत नाही. शनी आणि शुक्र हे दोन्ही ग्रह एकमेकांचे मित्र आहेत. शनी सध्या कुंभ राशीत विराजमान असून शुक्र मकर राशीमध्ये विराजमान आहे. त्यामुळे हे दोन्ही ग्रह एकमेकांबरोबर अर्धकेंद्र योग निर्माण करतील.

पंचांगानुसार, ५ डिसेंबरपासून (आज) शुक्र आणि शनी संध्याकाळी ७ वाजून ७ मिनिटांनी ४५ डिग्रीवर असतील. ज्यामुळे अर्धकेंद्र योग निर्माण होईल, हा योग खूप शुभ मानला जातो. यामुळे काही राशींना चांगला फायदा होईल.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

शनी-शुक्र ‘या’ तीन राशींना करणार मालामाल

मेष

मेष राशीत शुक्र दहाव्या घरात तर शनी अकराव्या घरात असेल. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींना प्रत्येक क्षेत्रात हवे तसे यश मिळेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. या काळात तुमची अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. तुमची आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. समाजात मान-सन्मान वाढेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल.

कन्या

अर्धकेंद्र योग कन्या राशीच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. वैवाहिक जीवन सुखमय होईल. प्रेमसंबंधात गोडवा निर्माण होईल. आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. त्यांच्यासोबत दूरचे प्रवास घडतील. आरोग्य चांगले राहील. गुंतवणूक करणं फायदेशीर ठरेल.

हेही वाचा: १२ डिसेंबरपासून नुसता पैसा; बुध ग्रहाचा उदय ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना देणार धन-संपत्तीचे सुख

मकर

मकर राशीच्या व्यक्तींवर शनी-शुक्र ग्रहाची विशेष कृपा होईल, या काळात तुम्हाला कुटुंबीयांची साथ मिळेल. तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल. जोडीदाराकडून आनंदी वार्ता मिळेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी चांगले यश मिळेल. तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. विद्यार्थ्यांसाठीदेखील हा उत्तम काळ आहे. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

Story img Loader