वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा एखादा ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत जातो किंवा युती बनवतो तेव्हा त्याचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येतो. शनिदेवाने आपली राशी बदलून १२ जुलैला मकर राशीत प्रवेश केला आहे आणि सूर्य देखील कर्क राशीत बसला आहे. जुलै २०२३ पर्यंत शनी या राशीत राहील. या स्थितीमुळे संसप्तक योग निर्माण होत आहे. खरं तर आता दोन्ही ग्रह एकमेकांच्या सातव्या भावात बसले आहेत. त्यामुळे या संसप्तक योगाचा प्रभाव सर्व राशींवर राहील. शनिदेवाच्या राशी बदलापूर्वीचा काळ काही राशींसाठी खूप शुभ असणार आहे. तर अशा ३ राशी आहेत ज्यांच्यावर १६ जानेवारी २०२३ पर्यंत शनिदेवाचा आशीर्वाद राहील. तर जाणून घेऊया या भाग्यशाली राशींबद्दल.
१) वृषभ
१६ जानेवारी २०२३ पर्यंत वृषभ राशीच्या लोकांवर शनिदेव दयाळू आहेत. या काळात तुम्ही कौटुंबिक जीवनात आनंदाचा अनुभव घ्याल. जर तुम्ही एखादे वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही वाहन किंवा घर खरेदी करू शकता.
शिक्षण क्षेत्राशी निगडित लोकांसाठी हा काळ वरदानापेक्षा कमी नाही. या काळात तुमची आर्थिक बाजू मजबूत राहील.
कठोर परिश्रम केल्याने तुम्हाला कामात नक्कीच यश मिळेल. नोकरीच्या ठिकाणी तुमचे कौतुक केले जाईल. तसंच आधीपासून एखादे रखडलेले काम या काळात पूर्ण होईल.
( ही ही वाचा: श्रावण महिन्यात या ५ राशींवर सूर्य देवाची कृपा होईल; धन-संपत्तीत देखील होईल वाढ)
२) वृश्चिक
यावेळी वृश्चिक राशीवर शनिदेवाची विशेष कृपा असते. हा काळ तुमच्यासाठी भरभराटीचा असेल. तुम्हाला कामात यश मिळेल. या काळात तुम्हाला तुमच्या कुटुंबियांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. तसंच तुमची आर्थिक बाजू मजबूत राहील. शनिदेवाचा तुमच्यावर आशीर्वाद असल्यामुळे तुम्हाला धनलाभ होण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. त्यामुळे तुमची सर्व रखडलेली कामे पूर्ण होतील. या काळात तुमच्या वैवाहिक जीवनात बदल घडण्याची शक्यता आहे.
३) मीन
शनिदेवाच्या कृपेने मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ वरदानापेक्षा कमी नाही. या काळात तुम्ही शत्रूंवर विजय मिळवाल. शैक्षणिक क्षेत्राशी निगडीत लोकांसाठी काळ चांगला आहे. धन आणि लाभ मिळण्याचीही शक्यता या कालावधीत आहे. जर तुम्ही नोकरी करत असाल, तर कामाच्या ठिकाणी सर्वजण तुमची प्रशंसा करतील. जर तुम्हाला एखादा आजार असेल किंवा आरोग्याशी संबंधित समस्या असतील तर तुम्हाला त्या समस्यांपासून सुटका मिळेल.
(येथे दिलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)