Chandra Grahan 2025: ज्योतिषशास्त्रात चंद्रग्रहणाला खूप खास मानले जाते. २०२५ चे पहिले चंद्रग्रहण खूप खास मानले जात आहे. हे चंद्रग्रहण १४ मार्च रोजी म्हणजेच धुलिवंदनाच्या दिवशी असेल. कारण, यादिवशी पौर्णिमा असल्याने हा अद्भूत संयोग निर्माण होत आहे. तसेच चंद्रग्रहणामध्ये शनीदेवदेखील शश योग निर्माण करत आहेत. शनी त्याची स्वराशी असलेल्या कुंभ राशीत राहून हा योग निर्माण करत आहे. त्यामुळे चंद्रग्रहणाच्या दिवशी शनीची काही राशींच्या व्यक्तींवर विशेष कृपा असेल. ज्याच्या शुभ प्रभावाने त्या राशीच्या व्यक्तींना प्रत्येक कामात यश मिळेल.
तीन राशींवर शनीची विशेष कृपा
मेष
मेष राशीच्या व्यक्तींसाठी चंद्रग्रहणाच्या दिवशी निर्माण होणार हा संयोग अत्यंत लाभदायी ठरेल. या काळात या व्यक्तींचा साहस, पराक्रम वाढेल. या काळात त्यांची आर्थिक स्थिती उत्तम राहून, कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. वैवाहिक जीवन सुखमय असेल. आत्मविश्वासही वाढेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींच्या मेहनतीचे कौतुक होईल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. केवळ कामात कोणताही हलगर्जीपणा करू नका.
मिथुन
चंद्रग्रहणाच्या दिवशी निर्माण होणार हा शुभ संयोग मिथुन राशींच्या व्यक्तींसाठी खूप फायदेशीर ठरेल. आर्थिक स्थैर्य लाभेल. तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. आयुष्यात आलेल्या अडचणी दूर होईल. करिअरमध्ये चांगली प्रगती होईल. वैवाहिक जीवन सुखमय राहिल. या काळात तुम्हाला भौतिक सुखाची प्राप्ती होईल. तुमच्या आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल आणि गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल.
कुंभ
कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी चंद्रग्रहणाच्या दिवशी निर्माण होणार हा संयोग खूप शुभ फळ देणारा ठरेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवी नोकरी मिळेल. स्पर्धा परिक्षेची तयारी करत असलेल्यांना यशाचे गोड फळ लाभेल. आर्थिक स्थैर्य लाभेल. तुमच्या आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल आणि गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. प्रत्येक कामात यश मिळेल. हवी ती गोष्ट साध्य करण्यासाठी कठोर प्रयत्न करावे लागतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. आरोग्य उत्तम राहिल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. अचानक धनलाभ होईल.
(टीप: सदर लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)