Shani Transit 2025: ज्योतिषशास्त्रात शनीला खूप महत्वपूर्ण ग्रह मानले जाते. शनीला कर्मफळदाता आणि न्यायप्रिय देवता देखील म्हटलं जातं. शनी नेहमीच चांगले कर्म करणाऱ्या व्यक्तीना शुभ फळ प्रदान करतो. तर इतरांना विणाकारण त्रास देणाऱ्या आणि वाईट कर्म करणाऱ्यांवर शनीचा नकारात्मक प्रभाव पडतो. याव्यतिरिक्त शनीचे राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तनही खूप खास मानले जाते. शनी सर्वात मंद गतीने चालणारा ग्रह आहे; त्यामुळे त्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी अडीच वर्षाचा कालवधी लागतो. तसेच वेळोवेळी तो नक्षत्र परिवर्तनही करतो. सध्या शनी त्याच्या मूळ त्रिकोण राशीत उपस्थित असून तो २०२५ मध्ये मीन राशीत तब्बल ३० वर्षानंतर राशी परिवर्तन करणार आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार शनीने डिसेंबर महिन्याच्या शेवटी गुरू ग्रहाच्या पूर्वाभाद्रपद नक्षत्रामध्ये प्रवेश केला असून तो पुढील काही दिवस याच नक्षत्रामध्ये असेल. शनीचे हे नक्षत्र परिवर्तन काही राशींसाठी शुभ तर काही राशींसाठी अशुभ फळ प्रदान करेल.

Guru Margi 2025
४ फेब्रुवारीपासून ‘या’ तीन राशींचे भाग्य चमकणार; गुरूची चाल देणार पैसा आणि प्रतिष्ठा
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Mangal rashi parivrtan 2024
पुढील ८४ दिवस मंगळ करणार मालामाल; ‘या’ तीन राशींचे लोक कमावणार बक्कळ पैसा
Shatgrahi Yog in meen 2025
आता नुसता पैसा; मार्चपासून मीन राशीत निर्माण होणार तब्बल सहा ग्रहांची युती, ‘या’ तीन राशींच्या आयुष्यात पडणार पैशांचा पाऊस
baba Vanga Predictions 2025 astrology in marathi
Baba Vangas Predictions 2025 : २०२५ मध्ये ‘या’ पाच राशी होणार अफाट श्रीमंत! नवीन वर्षात प्रचंड धनलाभाची संधी; बाबा वेंगांची भविष्यवाणी
Gajakesari and Malvya Raja Yoga
१० वर्षानंतर निर्माण होणार गजकेसरी आणि मालव्य राजयोग; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना होणार आकस्मिक धनलाभ
Shukra Nakshatra Gochar 2025 astrology
शनिच्या नक्षत्रात शुक्राचा प्रवेश, ४ जानेवारीनंतर ‘या’ राशींचे लोक होतील मालामाल,कमावतील चिक्कार पैसा
Mother Lakshmi loves people of these five zodiac signs
माता लक्ष्मीला प्रिय असतात ‘या’ पाच राशी! गरीब कुटुंबात राहूनही होतात कोट्याधीश-अब्जाधीश

शनीचे नक्षत्र परिवर्तनाने ‘या’ राशींवर पडणार नकारात्मक प्रभाव

कर्क

शनीचे नक्षत्र परिवर्तन कर्क राशीसाठी फारसे अनुकूल सिद्ध होणार नाही. या काळात शत्रूंपासून सावध राहा आणि मनातील गोष्टी इतरांना सांगण्याआधी विचार करा. तणाव, वादविवादाचा सामना करावा लागले. आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे वायफळ खर्च करू नका. तसेच कुठेही गुंतवणूक करण्यापासून दूर रहा. कामाच्या ठिकाणी विणाकारण वाद घालू नका. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा. या काळात धार्मिक कार्यात मन रमेल.

सिंह

शनीचे नक्षत्र परिवर्तन सिंह राशीच्या व्यक्तींसाठी फारसे फायदेशीर ठरणार नाही. हा काळ तुमच्यासाठी अनेक अडचणी निर्माण करणारा असेल. तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या, वाणीवर नियंत्रण ठेवा. आव्हानांना सामोरे जाल. या काळात कोणत्याही कामाकडे दुर्लक्ष करू नका. वाहन चालवताना सांभाळून चालवा. तसेच या काळाता कुटुंबात कोणतेही वाद होणार नाहीत याची काळजी घ्या. कुटुंबीय आणि मित्रांबरोबर वाद होऊ शकतात. त्यामुळे या काळात सांभाळून राहा.

हेही वाचा: १० वर्षानंतर निर्माण होणार गजकेसरी आणि मालव्य राजयोग; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना होणार आकस्मिक धनलाभ

मकर

शनीचे नक्षत्र परिवर्तन मकर राशीच्या व्यक्तींसाठी तितके लाभदायी सिद्ध होणार नाही. या काळात तुमच्या प्रेमसंबंधांमध्ये दूरावा निर्माण होण्याची शक्यता आहे. तुमच्या कुटुंबातील वरिष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या. आयुष्यात अडचणी निर्माण होतील. कामाच्या ठिकाणी मन लागणार नाही त्यामुळे वरिष्ठ तुमच्यावर नाराज असतील. तणावाचा सामना करावा लागेल. तसेच व्यर्थ पैसे खर्च होतील. त्यामुळे या काळात शांत राहून प्रत्येक निर्णय घ्या, कोणत्याही कामाच घाई करू नका. स्वार्थी लोकांपासून दूर रहा.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

Story img Loader