Vrishchik Rashi Varshik Bhavishya 2023 in Marathi: नवीन वर्ष २०२३ सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. येणारे नवे वर्ष प्रत्येकासाठी नवीन आशा, नवीन स्वप्ने, नवीन उद्दिष्टे आणि आव्हानांना सामोरे जाण्याचे वर्ष असणारे असून गेल्या वर्षभरात अपूर्ण राहिलेली कामे येत्या नवीन वर्षात पूर्ण झाली पाहिजेत, असे सर्वांना वाटते. येणारे नवीन वर्ष आपल्यासाठी काय चांगले घेऊन येईल, असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण होणे साहजिक आहे. या नव्या वर्षात शनि परिवर्तनामुळे विविध ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीत बदल होणार आहेत. ज्योतिषशास्त्रात शनीला विशेष स्थान आहे. वृश्चिक राशी ही राशीचक्रातील आठवी राशी आहे. या राशीचे चिन्ह विंचू असून ही जलतत्त्वाची राशी आहे. या राशीचा स्वामी मंगळ आहे.

वृश्चिक या राशीमध्ये विशाखा नक्षत्राच्या चारापैकी चौथा चरण (भाग), आणि अनुराधा व ज्येष्ठा ही संपूर्ण नक्षत्रे येतात. या राशीवर मंगळ (ज्योतिष) ग्रहाचा अंमल आहे. वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे आणि तो तुमच्या सातव्या घरात विराजमान आहे. तो शुक्राच्या राशीत म्हणजेच वृषभ राशीत आहे. देव गुरु बृहस्पति पाचव्या भावात विराजमान आहे, जे अत्यंत शुभ स्थान आहे. तर शनिदेव पराक्रमाच्या घरात विराजमान आहेत आणि या घरात शनि आणि शुक्राचा संयोग आहे. यासोबतच केतू तुमच्या १२व्या भावात आहे आणि चंद्रासोबत राहू वर्षाच्या सुरुवातीला तुमच्या सहाव्या भावात ग्रहण दोष निर्माण करत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार येणारे नवे वर्ष वृश्चिक राशीसाठी कसे असेल ते जाणून घेऊया.

Grah Gochar 2025 shukra gochar purva bhadrapad nakshatra
Grah Gochar 2025 : १ फेब्रुवारीपर्यंत फळफळणार ‘या’ राशीच्या लोकांचे नशीब; शुक्राच्या नक्षत्र बदलाने संपत्तीत होईल प्रचंड वाढ, नांदेल सुख समृद्धी
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Surya transit in kumbh
पुढील २८ दिवसानंतर सूर्य करणार मालामाल; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार पद, प्रतिष्ठा अन् पैसाच पैसा
sun shani and shukra grah yuti
पैसा, प्रेम अन् प्रसिद्धी मिळणार; ३० वर्षानंतर सूर्य, शनी आणि शुक्र निर्माण करणार ‘त्रिग्रही योग’; ‘या’ तीन राशींची होणार चांदी
Samsaptak RajYog in kundli
आता नुसता पैसा! सूर्य-मंगळ निर्माण करणार समसप्तक राजयोग; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना होणार आकस्मिक धनलाभ
Mangal rashi parivrtan 2024
येणारे ७० दिवस मंगळ करणार कृपा; ‘या’ तीन राशींची होणार चांदी
Khashaba Jadhav, Olympic , Bronze Medal ,
खाशाबा आज हयात असते तर…
Kark Rashi mata lakshmi
कर्क राशीमध्ये निर्माण होईल डबल लक्ष्मी राजयोग! ‘या’ ३ राशीचे भाग्य उजळणार, माता लक्ष्मीच्या कृपेने प्रत्येक काम मिळणार अपार यश

Yearly Horoscope 2023 : जानेवारी ते डिसेंबर या १२ महिन्याचं वार्षिक राशीभविष्य; जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसं असणार आगामी वर्ष

वृश्चिक राशीच्या लोकांचे करिअर (Career Of Scorpio Zodiac In 2023)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी वर्षाची सुरुवात चांगली होण्याची शक्यता आहे. तुमच्या करिअरमध्ये तुम्ही तुमच्या प्रयत्नांमुळे यश मिळवू शकाल. वृश्चिक राशीतील लोकांसाठी येणारे नवे वर्ष नोकरी आणि व्यवसायासाठी शुभ असू शकते. हे वर्ष तुमच्यासाठी प्रगतीचे नवीन मार्ग उघडू शकेल. तुमच्या समोर येणाऱ्या नव्या वर्षात काही आव्हाने असतील पण फारशी अडचण येणार नाही. हे वर्ष व्यवसायाच्या दृष्टीनेही चांगले जाण्याची शक्यता आहे. व्यवसायात तुमचा संवाद चांगला राहील. तुम्ही तुमचे विचार इतरांसमोर चांगल्या पद्धतीने मांडू शकाल, ज्याचा तुम्हाला फायदा होण्याची शक्यता आहे.

(हे ही वाचा : कन्या राशीसाठी २०२३ हे वर्ष कसे असणार? शनिदेवाच्या कृपेने आर्थिक भरभराटीची संधी, प्रेम साथ देणार का? )

वृश्चिक राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती कशी असणार? (Financial Of Scorpio Zodiac In 2023)

शनिदेव तुमच्या कुंडलीतील चौथ्या भावात प्रवेश करेल. म्हणूनच यावेळी तुम्हाला सर्व सुखे मिळू शकतात. तसेच, कोणत्याही जुन्या गुंतवणुकीतून नफा मिळू शकतो. व्यवसायात चांगला फायदा होऊ शकतो. पण व्यवहार करताना काळजी घ्या. आर्थिक दृष्टिकोनातून हे वर्ष तुमच्यासाठी संमिश्र असण्याची शक्यता आहे. तुमची मिळकत वाढण्याची शक्यता असून पण त्याच वेळी तुम्ही अनावश्यक खर्चामुळे त्रस्त होऊ शकता. नोकरी-व्यवसायात तुम्हाला प्रगती, पैसा आणि पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात.

वृश्चिक राशीच्या लोकांचे वैवाहिक जीवन आणि प्रेम

कौटुंबिक दुष्टीकोनातून या वर्षाच्या सुरुवातीपासून शनिचे संक्रमण चौथ्या घरात आहे. यामुळे काही समस्या उद्धभवू शकतील. प्रेम प्रकरणांसाठी हे वर्ष चांगले जाण्याची शक्यता आहे. विशेषत: एप्रिलपर्यंतचा काळ खूप छान असण्याची शक्यता आहे. या वर्षी या राशीच्या लोकांचे लग्न होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, जे विवाहित आहेत, त्यांच्या वैवाहिक जीवनात काही चढ-उतार येऊ शकतात. काही काळासाठी, तुमच्या नात्यात राग आणि दुरावण्याची परिस्थितीही असू शकते. अशा परिस्थितीत तुम्हाला शांततेत काम करावे लागणार आहे.

(हे ही वाचा : वृषभ राशीसाठी २०२३ वर्ष कसे असणार? शनिदेवाच्या कृपेने होऊ शकता श्रीमंत, प्रेम व आरोग्य कसे राहणार?)

वृश्चिक राशीच्या लोकांचे शिक्षण (Education Of Scorpio Zodiac In 2023)

शैक्षणिक क्षेत्रात वृश्चिक राशीच्या लोकांसाठी वर्षाची सुरुवात चांगली राहू शकते. परीक्षेत यश मिळू शकतो. तसेच तुमच्या इच्छित महाविद्यालयात तुम्हाला प्रवेश मिळण्याचीही शक्यता आहे. तुमचा निकाल चांगला लागण्याचीही शक्यता आहे. तथापि, एप्रिल नंतर तयार होणारा गुरु-चांडाळ योग स्थानिकांना गोंधळात टाकेल, ज्यामुळे तुम्ही स्वतःसाठी चुकीचे निर्णय घेऊ शकता. अशा वेळी कोणतेही काम करण्यापूर्वी विचार करणे तुमच्यासाठी योग्य ठरु शकते.

वृश्चिक राशीच्या लोकांचे आरोग्य कसे राहणार? (Health Of Scorpio Zodiac In 2023)

येणारे नवे वर्ष हे तुमच्यासाठी आरोग्याच्या दृष्टीने गेल्या वर्षीच्या तुलनेत खूप चांगले जाऊ शकते. गुरुदेव पाचव्या घरात विराजमान आहेत. सहाव्या भावात राहू आणि चंद्राचा संयोग असल्याने जीवनात किरकोळ समस्या येऊ शकतात, परंतु तुमचे एकंदर आरोग्य चांगले राहण्याची शक्यता आहे. याशिवाय तुम्हाला तुमच्या आहाराकडेही लक्ष द्यावे लागेल. जर तुमचा आहार चांगला असेल तर तुम्ही किरकोळ समस्या सहज टाळू शकता. या राशीच्या लोकांना उच्च रक्तदाब आणि रक्तातील साखरेसारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते, त्यामुळे सकस आहार घ्यावा.

(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader