Chanakya Niti Secretes: आचार्य चाणक्य हे अर्थशास्त्रज्ञ असण्याबरोबरच एक कुशल रणनीतीकार आणि धोरणकर्तेदेखील होते. त्यांनी त्यांच्या जीवनातील अनुभवांवर आधारित एक पुस्तक लिहिले, जे चाणक्य नीती म्हणून ओळखले जाते. या पुस्तकात त्यांनी राजकारण, समाज, शिक्षण, धर्म आणि वैयक्तिक जीवनाशी संबंधित विविध पैलूंवर सविस्तर चर्चा केली आहे. ही धोरणे माणसाला जगण्याची कला शिकवतातच, पण त्याला मार्गदर्शनही करतात. आचार्य चाणक्य यांनी नीतिशास्त्रात सांगितले आहे की, कधी कधी माणसाच्या आयुष्यात अशा काही गोष्टी येतात, ज्या कोणाला सांगू नयेत. तुमच्या आयुष्यातील कोणत्या गोष्टी आहेत ज्या कोणालाही सांगू नयेत, अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते, काय सांगते चाणक्य नीती? जाणून घेऊ या.
चाणक्य म्हणतात, ‘या’ गोष्टी कधीच कोणालाही सांगू नका?
वैयक्तिक गोष्टी
चाणक्य सांगतात की, कधी चुकूनही कुणाला आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी सांगू नये. विशेषत: पती-पत्नीने आपल्या नात्यातील चढ उतार कधीच कुणाजवळही शेअर करू नये. या अत्यंत वैयक्तिक गोष्टी नेहमी गोपनीय ठेवाव्यात. इतर कोणालाही तुम्ही या गोष्टी सांगितल्या तर ते लोक भविष्यात याचा गैरफायदा घेऊ शकतात. पती-पत्नीचं नातं विश्वासाच्या जीवावरच तरलेलं असतं, त्यामुळे एकमेकांमध्ये ठरलेल्या, बोललेल्या गोष्टी तिसऱ्या व्यक्तीला शेअर करू नका.
गुप्त दान
चाणक्य नीतीनुसार, जर तुम्ही एखादे गुप्त दान केले असेल तर त्याविषयी कुणालाही सांगू नका. दान करणे पुण्याचे काम आहे, त्यामुळे या गोष्टी कुणालाही सांगू नये, नाहीतर तुम्ही केलेले दान व्यर्थ जाणार. त्याचप्रमाणे तुमच्याकडे किती पैसा आहे हे चुकूनही इतरांना सांगू नका, यामुळे शत्रू निर्माण होण्याचा धोका असतो. आचार्य चाणक्य म्हणायचे की, जर गुरुने एखाद्या व्यक्तीला काही विशेष मंत्र किंवा ज्ञान दिले असेल तर त्याने ही गोष्ट गुप्त ठेवावी. ते कोणाशीही शेअर करू नये, कारण अडचणीच्या वेळी ते त्याला उपयोगी ठरू शकते.
वय
चाणक्य नीतीच्या मते, खरे वय कुणालाही सांगू नये. असे केल्याने तुम्ही इतरांच्या तुलनेत आणखी निरोगी आणि तरुण दिसणार आणि कुणीही तुम्हाला कमकूवत समजणार नाही. वय लपवून ठेवल्याने अनेकप्रकारे फायदा होतो. काही गोष्टी अशा आहेत, ज्या लपवूनच ठेवल्या पाहिजेत.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे.)