जवळजवळ प्रत्येकालाच स्वप्न पडतं. स्वप्न आपल्याला भविष्यात घडणाऱ्या घटनांचे संकेत देतात, असं म्हटलं जातं. ज्योतिष्य शास्त्राप्रमाणेच स्वप्न शास्त्रामध्येही प्रत्येक स्वप्नाचा वेगळा अर्थ सांगितला आहे. त्यानुसार स्वप्नात देवदर्शन होणे हे खूप शुभ मानले जाते. तुम्हाला स्वप्नात गणपती दिसल्यास त्याचा अर्थ काय होतो, हे जाणून घेऊया…
स्वप्नात गणेशाची मूर्ती पाहणे
स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नात श्रीगणेशाची मूर्ती स्वप्नात पाहणे खूप शुभ मानले जाते. याचा अर्थ तुम्हाला चांगली बातमी मिळणार आहे, असाही होतो. तसेच घरात काही शुभ किंवा धार्मिक कार्य होणार असल्याचे ते संकेत आहे. पण स्वप्नात गणेशाची मूर्ती दिसल्याचे स्वप्न कोणाला सांगू नये, नाही तर त्याचं फळ मिळत नाही, असं म्हणतात.
हेही वाचा – पायांच्या तळव्यावरून कळतो व्यक्तिचा स्वभाव अन् भविष्य; सपाट तळवे असणारे लोक….
स्वप्नात भगवान शंकराचे कुटुंब पाहणे
तुम्हाला स्वप्नात भगवान शंकराचे कुटुंब दिसले असेल तर ते देखील शुभ मानले जाते. याचा अर्थ तुम्हाला सर्व संकटांपासून मुक्ती मिळणार आहे, असा होतो. तसेच तुम्हाला तुमच्या कामात नफा होईल आणि अडकलेले पैसे मिळतील, असाही या स्वप्नाचा अर्थ होतो.
हेही वाचा – शुक्र ग्रह करणार सिंह राशीमध्ये संक्रमण; ‘या’ राशींना येणार अच्छे दिन, प्रत्येक कामात यशाचे योग
स्वप्नात गणेशाची पूजा करणे
तुम्ही स्वप्नात स्वतःला गणेशाची पूजा करताना पाहिलं असेल, तर ते शुभ मानलं जातं. त्याचा अर्थ तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत, असा होतो. तसेच तुम्हाला गणेशाचा आशीर्वाद मिळणार असून तुमचे अपूर्ण राहिलेले काम पूर्ण होईल, असे संकेत हे स्वप्न देतं.
हेही वाचा – सामुद्रिक शास्त्र : उजव्या गालावर जन्मखूण असलेल्या तरुणीला मिळतो श्रीमंत पती; तर, कपाळावर जन्मखूण…
स्वप्नात गणेशाचे विसर्जन पाहणे
स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नात गणेशाचे विसर्जन पाहिल्यास ते अशुभ मानले जाते. तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागणार आहे, असा त्याचा अर्थ होतो. तसेच तुमचे आर्थिक नुकसानही होऊ शकते. गणेशजींना स्वप्नात पाहणे शुभ मानले जाते, परंतु हे स्वप्न किती शुभ आहे, ते स्वप्न तुम्ही कोणत्या वेळी पाहिले यावर अवलंबून असते. ब्रह्म मुहूर्तावर स्वप्नात गणपती दिसणे अत्यंत शुभ मानले जाते.
(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)